Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

रामचंद्रपंत अमात्याने किल्ल्याच्या बांधणीसाठी पुढील सूत्रे सांगितलेली आहेत,

१) स्थळसंशोधन-

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

किल्ले बांधण्याच्या जागेसंबंधी शिवाजी महाराजांनी विशेष काळजीपूर्वक काही गोष्टींच्या वर भर दिलेला दिसून येतो. उदा. किल्ला बांधण्याची जागा ही अवघड ठिकाणी असली पाहिजे व त्या ठिकाणी पाणीपुरवठा ही मुबलक असला पाहिजे.अशा किल्ल्यावर राहून सभोवतालच्या प्रदेशावर देखरेख करता आली पाहिजे.किल्ला हाच राज्याचा मुख्य भाग असल्याने सतत सावध राहिले पाहिजे.अशा हेतूनेच महाराजांनी किल्ले बांधले होते.किल्ल्यांचे महत्व त्या काळी सुद्धा कवी परामनंदानी कसे ओळखले होते हे त्यांच्या शिवभारतामधील या अवतरणावरून दिसून येते. " दुर्गाला केवळ दुर्ग म्हणून लोक दुर्गम मानत नाहीत,तर त्याचा स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता. प्रभुमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू दुर्गम होतो.दोघांच्या अभावी शत्रूच दुर्गम होतो."

शिवकाळात महाराजांना दोनच मोठे शत्रू होते. ते म्हणजे विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचा मोगल बादशहा.या दोन्ही शत्रूंपासून स्वतःचे संरक्षण करून प्रदेश विस्तार करण्यासाठी किल्ल्याचा वापर करावा असे महाराजांचे परराष्ट्र मंत्री सोनोपंत डबीर याने सल्ला दिल्याचा उल्लेख आहे.या संदर्भात शिवभारतकार कवी परमानंद म्हणतात, "शंकराने कैलासाचा, इंद्राने मेरुचा आणि विष्णूने समुद्राचा आश्रय केला आहे. तव्दत आपणही एकाचा दुर्गम अशा स्थळाचा आश्रय करावा." हे राजनीतीचे एक महत्वाचे सूत्र सोनोपंत शिवाजी महाराजांना सांगतात.

दुर्गम स्थळाचे संशोधन कसे करावे याविषयी रामचंद्रपंत अमात्य आपल्या आज्ञापत्रात म्हणतात, "किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असु नये आणि असला तरी सुरुंग लावून पाडून गडाचे आहारी आणावा, असाध्य असेल तर तीही जागा मोकळी न सोडता बांधून मजबूत करावा." पहिल्यांदा अत्यंत दुर्गम अशा डोंगराची निवड करावी , या ठिकाणी किल्ला बांधल्यानंतर त्याच्या भोवती तटबंदी करावी व किल्ल्याची अभेद्यता वाढवावी. हा सल्ला सोनोपंत डबीर आणि रामचंद्र पंत अमात्य यांनी दिला आहे.

पर्वत दुर्गम आहे परंतु जवळच(समीप) इतर पर्वतांची शिखरे आहेत आणि ती सुरुंग लावून फोडता येत नसतील तर किल्ल्याचा अभेद्यपणा टिकवण्यासाठी त्याच्या समोरचा डोंगरही बांधून घ्यावा. उदा. अंकाई-टंकाई, चंदन-वंदन,लोहगड- विसापूर, पुरंदर-वज्रगड,इ.

२)जलसंचय-

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

किल्ल्यांसाठी पाणीपुरवठा हा बारामाही असावा. अमात्य म्हणतात, "गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले, तरी आधी खडक फोडून तळी, टाकी पर्जन्यकाळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल अशी मजबूत बांधावी.गडावरी झराही आहे.जसे तसे पाणीही पुरते, म्हणून तितकीयावरीच निश्चिती न मानावी, उद्योग करावा की निमित्त की, झुंझामध्ये भांड्याचे आवाजाखाली झरे स्वरूप होतात आणि पाणीयाचा खर्च विशेष लागतो, तेव्हा संकट पडते.याकरिता तसे जागी जखिरीयाचे(साठवणीचे) पाणी म्हणून दोन-चार टांकी तळी बांधावी.त्यातील पाणी खर्च होऊन द्यावे.गडाचे पाणी बहुत जतन राखावे."

महाराजांनी जेव्हा सिद्दी ला शह देण्याचे ठरविले तेव्हा मालवण जवळील एका कुरट्या बेटाकडे महाराजांचे लक्ष गेले.या बेटावर किल्ला बांधण्याचे महाराजानी ठरवले परंतु सर्वात पहिला प्रश्न महाराजांसमोर आला तो पाण्याचा. स्वराज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा असल्याने कदाचित गडावर ३ गोड पाण्याच्या विहिरी आढळल्या आणि महाराजानी किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली , हाच तो सिंधुदुर्ग किल्ला.

उदा. रायगड( गंगा सागर तलाव),राजगड (ब्रह्मऋषींचे तळे, पद्मावतीचे तळे), पन्हाळा(सदोबा तळे, नागझरी, सोमाळ, अंधारबाव), सिंहगड(देवटाके), विशाळगड(भूपाळ तळे), इत्यादी.

३) देखरेख-


नजीकच्या सर्व टापूवर देखरेख करणे हे किल्ल्याचे मुख्य कर्तव्य मानत असत.त्यादृष्टीने त्याची निर्मिती केलेली असे. जुन्नर प्रांतावर देखरेख ठेवण्यासाठी शिवनेरी किल्ला, पुणे प्रांतावर देखरेख ठेवण्यासाठी असलेला सिंहगड, गुजनामावळा व बेळवंड प्रांतावर देखरेख ठेवण्यासाठी बांधलेला तोरणा, उत्तर नगर आणि दक्षिण नाशिक म्हणजेच देशावर लक्ष ठेवण्यासाठी असलेला रतनगड आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील.

४) दरवाजा-

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

किल्ल्याच्या दरवाजासंबंधी काही विशेष खबरदारी बाळगत असत.उदा. किल्ल्याचा एकच दरवाजा न ठेवता एक ते तीन दरवाजे असत. प्रसंगी पळून जाण्यासाठी चोरदिंड्या ही असत.गरज नसेल तेव्हा जादा दरवाजे व चोरदिंड्या बँड असत.रायगड किल्ल्याला एक चोर दरवाजा आहे. गड हा राजधानी चा असल्याने ही व्यवस्था केलेली होती , जर वेळप्रसंगी मुख्य दरवाजावर संकट आले तर त्या चोरदरवाजाने  बाहेर जाण्याची व्यवस्था केलेली होती.परंतु संपूर्ण स्वराज्याच्या कारकिर्दीत कधी अशी वेळ छत्रपतींवर आली नाही.

यासंबंधी अमात्य म्हणतात, "दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकवून पुढे बुरुज देऊन येतो.जाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे." रामचंद्रपंत अमात्य पायथ्याशी दरवाजा असू नये अशी सूचना करतात कारण असा दरवाजा बांधला तर त्या किल्ल्याचे रूपांतर भुईकोट किल्ल्यात होईल.

५) किल्ल्याचे संरक्षण-

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

राज्यव्यवहारकोष या राजनीतीपर ग्रंथात रघुनाथपंत हनुमंते यांनी किल्ल्याचे संरक्षण कसे करावे व त्याची योजना कोणती होती यासंबंधी पुढील माहिती लिहिलेली आहे.

किल्ल्याच्या संरक्षणासाठी तट, बुरुज, चिलखत (बुरुजमागील संरक्षक फळी-भिंत), पडकोट( बाहेरील भिंत), पहारे व मेट (पहारा) यांच्यावर मुख्य भिस्त होती. बहुतेक सर्व किल्ल्यांना तट असे.तटाला विशिष्ट ठिकाणी बुरुज बांधत.जर किल्ला भुईकोट असेल तर त्याच्या भोवती पाण्याचे खंदक खोदत असत. उदा. अहमदनगर, दौलताबाद व सोलापूर किल्ल्यांच्या तटाची बांधणी सुद्धा चिलखती पद्धतीची आहे.ज्या ठिकाणी तट कमजोर आहे त्याठिकाणी एकसमोर एक अशा दोन भिंती बांधत.अशा प्रकारच्या चिलखती तटावरील अंतर जरुरीप्रमाणे कमी जास्त असे.सामान्यतः तटाची रुंदी २ फूट ते ३ हातापेक्षा कमी नसे.किल्ल्याच्या भोवती जो खंदक आहे त्याच्या तटाला रेवणी असे म्हणत. प्रत्येक तटाच्या पृष्ठभागावर एक भिंत बांधत त्याला पडकोट असे म्हणत.पडकोटाला राज्यव्यवहारकोषात प्राकारवलय असे म्हंटले आहे.पडकोट विशेषतः भुईकोट किल्ल्यांना बांधत असत.प्रत्येक किल्ल्याच्या तटावर बुरुज असत.अशा बुरुजाला राज्यव्यवहारकोषात 'कोट्टल्मक' असे म्हटले जाते.बुरुजाचा आकार पायथ्याला जाड व माथ्याकडे निमुळता होत जातं असे.बुरुजांचा उपयोग शत्रूवर हल्ला करण्यासाठी होत असे.बुरुजामध्ये जी उभट छिद्रे दिसतात त्यांना जंग्या म्हणतात. राज्यव्यवहारकोषात त्याला प्राकार-रनघर असे म्हटले आहे. बुरुजावरील सपाट जागा तोफेसाठी वापरत असत.प्रत्येक बुरुजाला वेगळे नाव असे. उदा. हत्ती बुरुज, कोकण्या बुरुज, खुबलढा बुरुज, अफजुल्या बुरुज, रेडका बुरुज, हिरकणी बुरुज, शिवप्रताप बुरुज, इ. बुरुजांच्या पाठीमागे एक भिंत असते.त्या भिंतीला चिलखत असे म्हणत.महाराष्ट्रातील काही किल्ल्यांतील तटांची बांधणी चिलखती पद्धतीची आहे. उदा. रायगड व राजगड

तटाच्या आत गस्त घालण्यासाठी दरवाजे असत . मुख्य दरवाजाच्या माडीवर एक देवडी असे व तेथून खाली पाहण्यासाठी लहान लहान झरोके असत. देवडीवर जाण्यासाठी एक जिना असे.देवडीवर गच्ची बांधत. देवडीची दारे ही मजबूत लाकडाची असत. देवडीला बाहेर व आत कुलुपे लावीत. पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी लहान गटारे असत.

तटाच्या आत लहानमोठ्या इमारती असत त्याला अलंगा म्हणत असत. तटावर देखरेख करणाऱ्या पहारयांना मेट असे म्हणत.राज्यव्यवहारकोषात अशा मेटना परिरक्षा किंवा उपरक्षिक असे म्हणले आहे.मेटकरी हे बहुदा रामोशी, ठाकूर, कोळी व महार असत, यांचा पहारा रात्रंदिवस असे.

६) माची-


हा किल्ल्याचा आणखी एक महत्वाचा भाग.माची म्हणजे तटांनी सुरक्षित केलेली किल्ल्यांवरील जागा. राज्यव्यवहारकोषात माची शब्दाचा अर्थ 'अधित्यका तूं माची रयात' दिला आहे. माचीवर शिबंदी म्हणजे फौज ठेवत असत.ज्या ठिकाणी सपाट जागा असेल किंवा किल्ल्याची उंची कमी असेल तिथे माची बांधत. माचीवर जाण्याची वाट ही मुख्य किल्ल्यातूनच असे. काही माच्या अत्यंत प्रसिद्ध आहेत. उदा. राजगडावरील तिन माच्या - संजीवनी, पद्मावती व सुवेळा, प्रचंडगड उर्फ तोरणा यावरील बुधला व झुंजार माची

७) बालेकिल्ला-

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यातील सर्वात सुरक्षित जागा.किल्ल्यातील जास्तीत जास्त उंच जागेला बालेकिल्ला असे म्हणत.सर्वच बालेकिल्ल्यां भोवती तट नसत. क्वचित काही किल्ल्यांमध्ये दोन बालेकिल्ले आहेत. उदा. राजमाची(वर्धनगड). बालेकिल्ल्याच्या संरक्षणाचे काम स्वतः हवालदार करत असे.त्याठिकाणी स्वतः राजा रहात असे.राजा किल्ल्यात नसताना ते मोकळे ठेऊ नये अशी सूचना रामचंद्रपंतांनी दिलेली आहे.त्यासंबंधी आज्ञापत्रात पुढील खुलासा आहे, "गडकरी यांनी राजमंदिर म्हणून खाली न ठेवावे. सर्वकाळ वस्ती करून धुरे करून घर शाबूत राही, जीवजंतू न राही, ते करावे. धनी गडावर येतात असे कळताच अगोदर दोनचार दिवस मामलेदाराणे येऊन खासा उभा राहून, संपूर्ण घर सावरून, रांगोळी आदिकरून घालून धनी गडावर येईजेपर्यंत त्याच जागा सदर करून बसत जावे."

८) किल्ल्यावरील इमारती-

किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे

किल्ल्यावर महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या राहावयाच्या व कारभाऱ्यांच्या  अनेक इमारती बांधलेल्या असत. सर्व इमारतींची बांधणी मजबूत आणि भक्कम असावी. कोणतीही इमारत पोकळ असू नये असा कडक नियम होता. फक्त राजमंदिर हे चुन्याने बांधलेले असावे बाकी सर्व घरे ही मातीने बांधलेली असावी.किल्ल्यामध्ये दिवाणवाडा(राजमंदिर), सदर(कचेरी किंवा सभा), अंबरखाना(धान्यकोश), कारखाना( संभारगृह), अलंगा(परिरक्षा), घुसळखाना(मंत्रस्थान), राणीवसा(राण्यांचे महाल), अधिकाऱ्यांची इमारती, दारूखाना, पागा, तळघरे, सरदारांची घरठाणी इ. अनेक प्रकारच्या इमारती असत. सर्वच किल्ल्यांवर अशा प्रकारच्या इमारती नसत. त्या किल्ल्यांच्या महत्वावर अवलंबून असत.उदा. रायगड, राजगड, पन्हाळा येथे अशा इमारती होत्या. आजही आपल्याला त्याचे काही भग्नावशेष दिसून येतात.वरील अधिकारी वर्गाशिवाय इतरही अनेक लोक किल्ल्यावर राहत असत.यासंबंधी रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, " ब्राम्हण, ज्योतिषी,वैदिक, व्युत्पन्न,शस्त्रवैद्य, पंचाक्षरी (मांत्रिक), जखमा बांधणारे, लोहार, सुतार, पाथरवट, चांभार यांचाही गड पाहून एक एक, दोन दोन असाम्या करून ठेवावे."

९)अठरा कारखाने (खाती)-

किल्ल्यावरील कारभार व्यवस्थित चालावा म्हणून किल्ल्यावर अठरा कारखाने असले पाहिजे असे संकेत होते. हे सर्व प्रत्येक किल्ल्यावर असतच असे नाही. 
कारखाने म्हणजे खाती.त्यासंबंधी जे खाते असेल त्याबाबतची सर्व व्यवस्था कारखान्याने करावयाची. हे अठरा कारखाने पुढीलप्रमाणे-

१.खजिना (रोकड शिल्लक)
२.जवाहिरखाना (रत्नशाळा)
३.अंबारखाना (धान्यकोश)
४.आबदारखाना (स्नानगृह किंवा जलस्थान)
५.नगारखाना
६.तालीमखाना
७.जामदारखाना(वस्त्रागार)
८.जिरातेखाना (शस्त्रागार)
९.मुदबखाना (पाकालय)
१०.शरबतखाना (औषधालय)
११.शिकारखाना
१२.दारूखाना
१३.शहतखाना (आरोग्यगृह)
१४.पिलखाना (हत्तीशाळा)
१५.फरासखाना (राहुट्या डेरे इत्यादी)
१६.उष्टरखाना (उंटशाळा)
१७.तोफखाना
१८.दप्तरखाना

या अठरा कारखान्यांपैकी काही कारखान्यांची म्हणजे खात्यांची माहिती आपण पाहू,

अ) दारूखाना -

दारुखाना म्हनजे बंदूका  व तोफा यांची ठेवण्याची जागा. ही कोठारे टताच्या एका बाजूला असत. दरूखान्याच्या कोठेही लकडाचा वापर करत नसत्. दारूखाण्याभोवती निरगुडिसरख्या झाडाचे दाट कुसु (भिंत) असावे असे अद्धपत्रकार म्हनतात. आजही रायगडावर दरूखानायाच्या आसपास निरगुंड दिसून येते. दअरुखन्याकड़े जाणारा मार्ग सुलभ नसवा असे अमात्य म्हनतात. 

ब) अंबार खाना-

किल्या वरील दूसरा महत्त्वचा कारखाना म्हणजे अंबरखाना किवा धन्याची कोठारे, जी किल्ले शिवजी माहाराजनी बांधले त्यामधे  अश्या इमारति स्वः त बंधल्या व जे किल्ले प्राचीन आहेत त्यामधे मोठमोठ्या गृहानचा वापर केलेला असायचा. उदा. सिहागडावर व लोहागडावर अश्या गृह आहेत. अंबार खण्यात किल्याच्या पंचक्रोशीतिल गवांतुन धान्य जमा करून त्यांचा साठा केला जात असे. अंबरखाण्याच्या इमारटींची बांधनि ककश्या प्रकारे असवी यासंबधिच्या प्रचलित कल्पना(चुन्याच्या बंधकामाची) ही सकल ही अग्नि, उंदिर, किडा, मुंगी , वालवि याचा उपद्रव न बाधे अशी भूइस  दगड़चि छावनी करुन गच्ची बांधवी ज्या किल्यास काला खड़क दरजे विरहित असेल तरी गच्च लावून पाझर न फुटेल असे करावे. 

१०) इतर वैशिष्टे-

किल्याच्या इतर व्यवस्थे बरोबर च  आणखी दोन वैशिष्ट पूर्ण भाग दिसून येतात. ते म्हणजे अंधार कोठाड्या व कड़े लोट हे होय. 

अ) अंधार कोठाड्या-

 महत्त्वचे किल्ले असतील तिथे अंधार कोठाड्या असत. विस ते पंचविस हात लांबी ची एक खिड़की असलेली अशी अंधारी खोली असते. या खोलीत कैदी कीवा  त्रासदायक व्यक्तिला ठेवत असत. कैद्याला दोराने अन्न व पानी  पुरवत असत . रायगडावर अश्या तीन अंधार कोठाड्या दिसून येतात. सध्या त्या मोडकलिस अल्या आहेत. 

ब) कडेलोट-

बहुतेक प्रतेक किल्यात दरिच्या तोंडाला जे ठिकान असे त्याचा वापर कैद्याना शिक्षा देण्यासाठी करत असत. अश्या ठिकाना अनेक नाव आहेत. उदा. रायगड चे टकमक टोक राजधानी रायगड या ग्रंथाचे लेखक वि . वा. जोशी म्हनतात की, कडेलोटची शिक्षा केलेले अपराधी या टोकावारून लोटुन देत . ही शिक्षा होताना लोक टकमक बघत राहत म्हनुन या टोकाला टकमक टोक हे नाव पड़ले असावे. 

किल्ले (भाग १): इतिहास, महत्व आणि प्रकार
किल्ले (भाग ३) : बांधकाम आणि दुरुस्ती
किल्ले (भाग ४): किल्ला बांधण्याची सूत्रे



Post a Comment

0 Comments