Ticker

6/recent/ticker-posts

आमच्या विषयी

नमस्कार,
सर्वप्रथम आपल्या सर्वांचे वेबसाईट वर स्वागत आहे.गर्वाने मराठी या वेबसाईट वर आम्ही काम करतोय. आम्ही म्हणजे एक व्यक्ती नाहिये हे कळलचंं असेल. आमच्याविषयी पुढे सांगेलच पण सर्वप्रथम या वेबसाईटच्या निर्मिती विषयी जाणुन घेऊया.
गर्वाने मराठी ची सुरुवात एप्रिल २०२० मध्ये झाली. वेबसाईटवर सुरुवातीला इतिहास, भटकंती, संस्कृती, पाककृती आणि साहित्य या गोष्टी आहेत लवकरच बाकी क्षेत्र देखील इथे असतील. वेबसाईट बनवण्यामागे एकच हेतु आहे तो म्हणजे परिपुर्ण आणि सत्य माहिती मराठी भाषेत महाराष्ट्रासमोर नव्हे तर संपुर्ण मराठी वाचकांसमोर ठेवणे.

आमच्याविषयी थोडक्यात- 

सोनार वैष्णवी, अकोले
मी "गर्वाने मराठी" वेबसाईटची फाऊंडर मेंबर आहे. मी महाराष्ट्रातील स्वर्गामधील.... अहो नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील! सुंदरतेने नटलेली पर्वतशिखरे, वेगवेगळ्या संस्कृती, पर्यटन स्थळे आणि मनाला आनंद देनारा सह्य-सातपुडातील वारा...
मी इथे पाककृती व संस्कृती या विषयांंवर लिहिते. पाककले मध्ये मिळणारा आनंद आणि ती पाककला इतर लोकांपर्यंत पोहोचवने हा माझा हेतु आहे. महाराष्ट्र म्हटलं की पुरणपोळी सर्वांच्या समोर येते आणि विविधतेने नटलेल्या भारत देशातील सर्व पदार्थ कसे बनवायचे याची सविस्तर माहिती इथे मी देतच राहिल.
अकोल्याची असल्याने वेगवेगळ्या जाती-जमाती खुप जवळुन बघितल्यात, त्यांचे जनजीवन, सण-उत्सव, परंपरा, इ. समजुन घेतल्यात. यातील विविधता या वेबसाईटच्या माध्यामातुन मी आपल्यासमोर आनन्याचा प्रयत्न करते आहे.
(महिलांंना पुरुषांंच्या बरोबरीचे स्थान आणि सन्मान म्हणुन प्रथम महिला लेखकाला स्थान देत आहोत)

म्हस्के निखिल, शिर्डी
मी"गर्वाने मराठी" वेबसाईटचा फाऊंडर मेंबर आहे. वेबसाईटचे सर्व टेक्निकल कामे मी करतो. इतिहास आणि भ्रमंतीची म्हणजेच भटकंतीची आवड आहे म्हणुन या दोन विषयांवर इथे लिहितो. इतिहासाची पुस्तके जणू मला भुरळ पाडतात म्हणुन पुस्तकांचे काही अभिप्राय देखील मी देतो. पुढे काही काळाने तंत्रज्ञान हा विषय देखील वेबसाईटवर मी मांडेल. इतिहास या  विषयात चुका ह्या होऊ शकता आणि त्या चुका कृपया कमेंट करुन लक्षात आणुन द्या.
भटकंती मध्ये किल्ले फिरण्याची भयंकर आवड आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास जाणून घेत गेलो आणि आता तो या माध्यमातुन आपल्यासमोर आणत आहे. अहमदनगर जिल्हा म्हणजे माझा जिल्हा सर्व विभागांत आहे, म्हणजे इथे ऐतिहासिक स्थळे आहेत, प्रसिद्ध पर्यटन स्थळे, मंदिर, आणि भरपुर काही फिरण्यासारखं आहे. मग भटकंती ही रक्तात असेल तर नवल कसलं!


औटी ऋतुजा, पुणे
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते"
अशी राजमुद्रा असलेल्या शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतून म्हणजेच जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथून मी कु. ऋतुजा गोपीनाथ औटी. "गर्वाने मराठी" या वेबसाईट ची फाऊंडर मेंबर.
 जेव्हा १८ व्या शतकात संत जनाबाई सांगून जातात -
" डोईचा पदर आला खांद्यावर भरल्या बाजरी जाईन मी"
 हे  ऐकल्यानंतर आज २१ व्या शकतात वावरत असताना मला कुठे तरी वाटलं की एक स्त्री देखील पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, विषयांवर बोलू शकते. तीच म्हणणं समजापुढे प्रखर पणे मांडू शकते. आणि मग संत जनाबाई , सावित्रीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन या विषयांवर लिहायला सुरुवात केली. हा सगळा प्रवास इथपर्यंत आणण्यासाठी बरेच अडथळे आले. पण यावर मात करण्यासाठी सुरेश भटांचे शब्द नेहमी लक्षात ठेवले आणि इथून पुढेही नेहमीच ठेवेल-
"विजलो जरी आज मी , तरी हा माझा अंत नाही.. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही.
येतील वादळे खेटेलं तुफान तरी वाट चालते मी .. अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही.."
तुमच्या पर्यंत अजून नवनवीन माहिती पुरवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करेल. हे सगळ लिहीत असताना चुका होतील त्या तुम्ही कमेंट्स द्वारे नक्कीच लक्षात आणून द्याव्यात. त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेल.

Post a Comment

0 Comments