Ticker

6/recent/ticker-posts

#BoisLockerRoom : मुलीदेखील चुकताय का?

#BoisLockerRoom : मुलीदेखील चुकताय का?

#BoisLockerRoom : मुलीदेखील चुकताय का?

स्त्री आणि पुरुष या दोन्ही  मधे ही भिन्नता आहे . आणि आता दोघांची ही  भिन्नता समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. स्त्रियांचा विकास होतोय , पण तो विकास काहीतरी वेगळच रूप घ्यायला लागलाय का? या प्रश्नाकडे निदर्शने लक्ष द्यायची गरज आहे.

      तरुणाईचे धोक्याचे पाऊल या लेखामध्ये आपण बघितल #boislockerroom या इंस्टाग्राम वरच्या ग्रुप वर मुलींबद्दल कशा अश्छिल चर्चा केल्या गेल्या. या चर्चा केल्याचं गेल्या हे आम्ही आजही म्हणतोय.

पण investigation नंतर काहीतरी वेगळच सत्य समोर आलंय. एका मुलीनी सिद्धार्थ या नावांनी fake acoount बनवले. याच fake अकाउंट वरून तिने तिच्याच वयाच्या एका मुलाला snapchat वर मेसेज केला. त्यामध्ये ती स्वतःवरच बलात्कार करण्याच्या गोष्टी करत होती. म्हणजे सिद्धार्थ बनून ती त्या मुलाला सांगत होती की आपण त्या मुलीवर अत्याचार करू हवे असेल तर आणखी २-३ मुलांना यात सामील करून घेऊ. परंतु यावर त्या मुलाने काही प्रमाणात नकार दिले असे माध्यम लिहितात. तिचा हेतू हा त्या मुलाचे चारित्र्य तपासणे हा होता. 
#BoisLockerRoom : मुलीदेखील चुकताय का?


       हे investigation झाल्यावर पोलिसांनी एक गोष्ट स्पष्ट केली की,   
          " मुलीवर किंवा मुलावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदविला जाणार नाही. बनावट आयडी तयार करणे चुकीचे असले तरी तिचा हेतू दुर्भावनायुक्त नव्हता म्हणून आम्ही कोणतीही तक्रार दाखल करीत नाही,”

        ...ही बातमी ऐकल्यानंतर अनेक comments यायला सुरुवात झाली. मुलांनी केला तो गुन्हा आणि मुलीनी केली ती चूक ?  काही काही तर असेही बोलताय मुलीने केला तो पोरखेळाचा प्रकार होता?

          यावर मुलीची चूक होती की नव्हती ? अनेक जनांच अस म्हणणं मुलीची चूक नव्हती. तर काही जण बोलले मुलीची चूक होती.

         त्या मुलीची पूर्णतः चूक आहे अस म्हणणं देखील चुकीचं च ठरेल. कारण ही घटना झाल्यानंतर "८ मे ला बॉईस लॉकर रूमच्या वादावरुन मत व्यक्त करणारे डीसीडब्ल्यू ची प्रमुख स्वाती मालीवाल यांना ट्विटरवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली", मग ती मुलगी जे वागली ते एका बाजूने बरोबर आहे असेही म्हणणं चुकीचं ठरणार नाही. जर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्वाती मालिवाल याना स्त्रीवादी म्हणले गेले. त्यांचा विभागच महिलांच्या सुरक्षेसाठी आहे तर का त्यांनी स्त्रीवादी असू नये? 

त्या मुलीचा म्हणजेच जिने सिद्धार्थ बनून मेसेज केला आणि ज्या मुलाला मेसेज केला ते दोघेही या बॉईस लॉकर रूम ग्रुप मध्ये सहभागी नव्हते. दोघांनी screenshot share नाही केले तर मग कोणी केले. मुलीने प्रूफ म्हणून save केले की त्या मुलाने? याच उत्तर अजून पण सापडले नाहीये. आणि जर तुमची private चॅट कोणीतरी वाचू शकतय तर ये किती धोकादायक आहे याची जाणीव तुम्हा आम्हा सर्वांना झालीच पाहिजे.

     पुरुषप्रधान संस्कृती मधे बंदिस्त असलेली स्त्री त्यातून बाहेर पडण्यासाठी कायद्याची मदत न घेता कायदाच हातात घ्यायला लागली. 

    लैंगिक व्यभिचारसाठी तरुणीला भर गावात चाबकाच्या फटक्याची शिक्षा दिली जाते ही बातमी आपण ऐकतो, न आज मुलगी च स्वतःवर अत्याचार व्हावा म्हणून संभाषण करताना दिसते...  मग जेव्हा या विषयाच्या खोलात जाऊन विचार करतो तेव्हा अस वाटत , की त्या मुलांनी केलं त्या गोष्टीला आपण चूक म्हणतो मग त्या मुलीच्या वागण्याला चूक का म्हणत नाही? ती मुलगी जर अल्पवयीन असेल तर ते मुलंही अल्पवयीन च होते.त्या मुलीचा हेतू चांगला असेल तर तिच्याकडे खूप मार्ग ही होते मुलांचं character जाणून घेण्यासाठी. ती हीच गोष्ट पोलिसांच्या मदतीने किंव्हा सायबर क्राईम च्या मदतीने समोर आणू शकत होती.पण तिने कायदा हातात घ्यायला प्राधान्य दिले त्यामुळे तिने केली तीही चूक च आहे. जसं चूक झाल्यानंतर अल्पवयीन मुलांना शिक्षा झाली मग तसच तिला ही शिक्षा होणे तेवढच गरजेचं आहे.

ती एक मुलगी आहे आणि मुलगी म्हणून अस वागली त्यामुळे ज्या मुलींवर खरच  अन्यान झाला ,त्याच्यावर देखील खरच अन्यान झाला का? हा प्रश्न निर्माण झालाय. 

त्या मुलीने एक सगळ्यात मोठी चूक केली, कोणत्याही सोशल अकाउंट वर fake अकाउंट open करणे हे चुकीचे आहे आणि या गोष्टीवरून तिला शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. आणि ती झाली नाही तर भारतीय कायदा व्यवस्थेवर खूप प्रश्नचिन्ह उपस्थित होणार हे नक्कीच!

         ती मुलगी जे वागली मग त्यामागे खूप कारणे असू शकतात. पहिलं तर त्या मुलाला तिला बदनाम करायचं असू शकते त्यामुळे ती असे वागून त्याचे पुरावे गोळा करत असेल.

          दुसर म्हणजे मुलांची मूल्ये आणि चारित्र्य तपासण्यासाठी मुलांबरोबर लैंगिक अत्याचाराची योजना आखण्याची chat केली असेल. पण कारण काही ही असल तरीही एखादी तरुण स्त्री सामूहिक बलात्कार बद्दल बोलते  ते ही इतक्या हलक्या पणाने ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. मुलांनी केलेला तो विचार जितका गांभीर्याने घेतला गेला तितकाच हा देखील घेतला गेला पाहिजे. जर माझ्या बहिणी अशा विचार करत असतील तर ती किती खेदजनक बाब आहे? आता राजकारण वगळता मला म्हणावं वाटतंय कुठे वाटचाल करतोय भारत देश माझा?

         बलात्कार हा अक्षम्य गुन्हा आहे.  आपल्या देशातील एक गंभीर आणि दु: खद वास्तव आहे, त्याच गोष्टीला जर मुलगी म्हणून तुम्हीच खत पाणी घालत असाल तर सगळा दोष मुलांना देऊन काहीच उपयोग नाही. मग जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यावर प्रश्न निर्माण होतो या सगळ्याला कुठेतरी मुली देखील कारणीभूत आहेत का? याच उत्तर आज खूप जणांना मिळून जात. आणि हे असं उत्तर मिळण्याचे कारण देखील तुम्ही मुली आहात असच म्हणणार!

  तरुण मुलींना त्यांच्या शरीरावर नाकारल्या गेलेल्या गोष्टींबद्दल बोलणे आणि लैंगिक हिंसाचाराचे आकर्षण वाटणे सामान्य वाटत असेल तर ते खूप भयानक आहे. भारतात लैंगिक शिक्षणाचा अभाव किती पडतोय हे तुम्हाला विचारावं वाटतंय.

 मुलांना सगळा दोष देत असताना आता स्वतः आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मुलांना जे योग्य आणि चुकीचे, अनुज्ञेय आणि परवानगी नसलेले, चांगले आचरण आणि उल्लंघन यांच्यात फरक करण्यास शिकवणे  समाज म्हणून आपली सामुहिक अपयश का? यावर देखील विचार करावा लागणार.

     आधुनिक काळात वावरत असताना मुलांना घरातूनच एक स्त्री म्हणजे काय असत? हे समजवून सांगणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच एक पुरुष म्हणजे काय? हे ही मुलींना समजून सांगायची गरज आहे का?मुलींना देखील आता या गोष्टी सांगायची गरज भासत आहे. 

सोशल मीडिया वापरताना आता काळजी घेण्याची गरज भासतेय. सुजग नागरिक तुम्ही बनले पाहिजे, तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा याची जाणीव आता प्रत्येकाला व्हायला पाहिजे.

यावरून शेवटी आम्ही एकच तात्पर्य सांगू, मुलीची देखील चूक होती पण मुलांची देखील चूक होती हे आम्ही देखील मान्य करायला पाहिजे. आता चूक कोणाची होती,काही मुलीला दोष देतील काही तिला योग्य म्हणतील. पण वाचकांना मी सांगेल की आता यावर चर्चा थांबवूया आणि पुढच्या भागात आपण मुलीला आणि मुलांना काय शिकवायची गरज आहे हे समजून घेऊया आणि आता हीच काळाची गरज बनली आहे.

Post a Comment

1 Comments