Ticker

6/recent/ticker-posts

#BoisLockerRoom : तरुणाईचे धोक्याचे पाऊल

#BoisLockerRoom : तरुणाईचे धोक्याचे पाऊल 

#BoisLockerRoom : तरुणाईचे धोक्याचे पाऊल

एकीकडे पूर्ण जग कोरॉना सारख्या विषाणू पासून लढायचा  प्रयत्न करतंय...तर दुसरी कडे lockdown असलेला माझा भारत देश मानसिक दृष्ट्या अपंगत्व आलेल्या लोकांच्या डोक्यातील व्हायरस काढण्यासाठी झुंज देतोय...

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहत असताना, आम्हा मुलींच्या मनात आज प्रश्न येतोय - 
" भारतात बलात्काराची संस्कृती आहे का? "

        याच कारण - दिल्ली मधे काही अल्पवयीन मुलांनी त्यांच्या मैत्रिणींबद्दल अश्लील संभाषण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम ग्रुप बनवला जातो. तिथे त्यांच्याबद्दल नको-नको ते बोलले जाते, त्यांचे आक्षेपार्ह फोटो टाकले जातात, काही छेडछाड केलेले सुद्धा, आणि अगदी त्यांच्यावर बलात्कार करायची अनेकांनी इच्छाही व्यक्त केली जाते. हे जर घडतंय तर काय आदर त्या जिजाऊ मासाहेबानी उभ्या केलेल्या स्वराज्याच्या विचारांचा आणि परस्त्री मातेसमान म्हणणाऱ्या माझ्या राज्यांच्या विचारांचा?

बॉईज लॉकर रूम काय घडलंय?

बॉईज लॉकर रूम

इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर काही मुले एकत्र येतात आणि ते एक private group सुरु करतात. इन्स्टाग्राम या माध्यमावर जेव्हा private group बनवला जातो तेव्हा त्याचे access हे कोणाला शक्यतो मिळत नाही, admin च्या परवानगी शिवाय!
या ग्रुप वर नक्की घडलं काय? या ग्रुप वर हि सर्व मुले त्यांच्याच शाळेतील काही जुनियर आणि काही सिनियर मुलींचे अश्लील फोटो टाकत होते आणि मुलींच्या शरीराच्या विषयी काहीही आक्षेपार्ह मजकूर टाकत होते. हे मुल इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यातील काही मुलांनी तर या मुलींवर अत्याचार करण्याची देखील चर्चा केलीये.
मुलामुलांच्या या ग्रुप ची लिंक काही मुलांना मिळाली आणि त्यात random पणे मुले जोडली जाऊ लागली. असाच एक मुलगा तिथे जोडला गेला आणि त्याने त्याच्या ओळखीच्या एका मुलीविषयी तिथे चर्चा वाचली. त्याने काहीही विचार न करता या ग्रुप चे screenshot काढून घेतले आणि ते त्या मुलीला पाठवले. त्या मुलीला काय करावे हे काही सुचेना त्यामुळे तिने घरी न सांगता तिच्या एका सायबर सिक्युरिटी हेल्पर मित्राला हे सांगितलं, परंतु तो सरकारी कामात नसल्यामुळे त्याने त्याच्यापरीने शक्य तेव्हड केल, पहिले त्याने जे केल त्याला आमच्याकडून सलाम. त्याने त्या group वर ज्या मुलींविषयी अशा पोस्ट होत्या त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना जागरूक केले. नंतर त्याने त्यांचा एक group बनवून दिला व पुढे कशा प्रकारे लढायचं हे त्यांना सांगितले. 
#BoisLockerRoom : तरुणाईचे धोक्याचे पाऊल

भारतीय नारी हि सर्वात शक्तिशाली आणि कणखर आहे याचा प्रत्यय पुन्हा इथे आला. कुठेही न डगमगता या मुलींनी सायबर पोलिसांकडे याची तक्रार केली आणि या मुलांची नावे screenshot घेऊन सोशल मिडिया वर share करत सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले. 
फक्त मुलामुलांच्या या ग्रुपमध्ये काही जणांनी हॅकिंगद्वारे प्रवेश मिळवला आणि या ग्रुपचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला.
इन्स्टाग्रामच नव्हे तर आता ट्विटर, फेसबुकवरही प्रतिक्रियांचा पूर आला आणि ट्रेड झालं #BoysLockerRoom (#BoisLockerRoom). जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर सोमवारपासून सुरू असलेला हा ट्रेंड तुम्ही पाहिलाच असेल.

एक लक्षात घ्यायला हवं, की ही सर्व मुलं दक्षिण दिल्लीतल्या उच्चवर्गीय कुटंबांमधून आहेत, उच्चभ्रू शाळांमध्ये शिकलेले. ते ज्या मुलींबद्दल बोलत आहेत, त्याही त्यांच्याच शाळांमध्ये शिकलेल्या आहेत. आणि हे सर्व साधारण 15 ते 19 या वयोगटातले आहेत. म्हणजे अल्पवयीन.

मात्र सोमवारी दिवसभर ही घटना सोशल मीडियावर ट्रेड झाल्यानंतर, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलीवाल यांनी इन्स्टाग्राम आणि दिल्ली पोलिसांना नोटीस धाडली आहे.
'बॉईज लॉकर रूम'शी संबंधित असलेल्यांना तातडीनं अटक करावी, अशी मागणी त्यांनी केल्यानंतर मंगळवारीसुद्धा यावर चर्चा सुरू आहे.
स्वाती मलीवाल यांच्या ट्वीटनंतर तातडीनं पावलं उचलत, दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम विभागानं या प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपींपैकी 15 वर्षीय मुलाला दिल्ली पोलिसांनी अटकही केलीय. स्वाती मलीवाल यांनीच याबाबत ट्विटरवरून माहिती दिली.

यासाठी मानसिकता बदलण्याची आवशयकता-

#BoisLockerRoom : तरुणाईचे धोक्याचे पाऊल

नाण्याला २ बाजू असतात. एक बाजू समजून घेतली. आता दुसरी बाजू समजून घेऊन त्यावर बोलणं देखील तेवढच गरजेचं वाटतं. 
पण या दोन्ही बाजू समजून घेताना हे सगळ "कोणी" केलं या पेक्षा हे सगळ "का" केल ? हा प्रश्न निरुत्तरीतच राहतो....

परवाचीच गोष्ट, या आर्टिकल विषयी लिहिताना एका मुलाने विचारल - या सगळ्या मधे चूक फक्त पुरुषाचीच का? 
       हा प्रश्न मनात घर करून गेला. मुलीचे सोशल मीडिया वर आकर्षित करणारे फोटो पुरुषांच्या मनामधे लैंगिक आकर्षण स्थापित करत असणार. हे सगळ नैसर्गिक आहे. या सगळ्याचा स्वीकार ही केलेला आहे. महत्वाचं म्हणजे पुरुष त्या ग्रुप वर कदाचित थेट बलात्काराचे नियोजन  करतही नसतील किंवा आपल्या ओळखीच्या मुलींचे फोटो शेअर करून बॉडी शेमिंगही करत नसतील पण इंटरनेटवर येणारे अनोळखी स्त्रियांचे तसले फोटो पाहून त्यांच्याही भावना चाळवत असतीलच. या गटांमध्ये बरेचसे पुरुष स्वत: काही पोस्ट करत नसतीलही. पण जे या सगळ्या वर भाष्य करत असतील त्यांना  boys talk’ च्या नावाखाली  स्वीकृतीही मिळालेली असेल. या घटनेबद्दल सोशल मीडियावर बोलणार्‍या आणि ‘Not All Men’ म्हणत स्वत:ला या चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार्‍या सगळ्या पुरुषांनी हे मान्य करायला हवं की ते सगळे सुद्धा अशा एखाद्या तरी गटाचा भाग आहेत. कारण एखादा गुन्हा घडत असताना गप्प बसून तो पाहत राहणं ह्याचा अर्थ त्या गुन्ह्याला मूक संमती देणं असतं आणि अशी मूक संमती देणारा सुद्धा गुन्हेगारच ठरतो हे भान आपल्याला यायला हवंय.

ते फोटो पाहून त्या सगळ्या गोष्टीचं फक्त आकर्षण असण आणि ती गोष्ट मिळवण्याचा अट्टाहास करण या दोन्ही मधे फरक आहे आणि तो फरक समजून घेणं जास्त गरजेचं वाटतं. कोणतीही मुलगी सोशल मीडिया वर फोटो टाकते त्याचा अर्थ असा होत नाही की ती मुलांना म्हणते , मुलांनी येऊन तिचा बलात्कार करा किंव्हा तिच्या शरीरावर मालकी दाखवण्याचा प्रयत्न करा. हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे. जो पर्यंत पुरुषी मानसिकतेला मूठमाती घातली जात नाही, तोपर्यंत ह्या घटनेचा रिपोर्ट करणारी एक मुलगी.. तिची आई तिला बोलते इंस्टाग्राम वापरणं बंद कर, आणि या विषयी लिहीत असताना माझे वडील मला बोलतात सोशल मीडिया वरचे फोटो काढून टाक ..हे सगळ मुलींना सांगणं बंद होणार नाही. 

आजही नाईट शिफ्ट करताना भावाला नाहीतर वडिलांना सोडवायला यावं लागत.  तिला ' स्वतंत्र ' नव्हे तर ' सह ' म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने स्थान हवे आहे. तिला ५०% आरक्षण नकोय. फक्त स्वतच्या देशात , स्वतच्या राज्यात, स्वतच्या शहरात, स्वतःचा गावात रात्री १२ वाजता फिरताना देखील मनात भीती नकोय. आणि जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे होण ही शक्य नाही. 

एक twitter वापरकर्ता म्हणतो , "कठोर कायदा होणं आवश्यक आहे. लोकांची मानसिकता बदलण्याचीही गरज आहे. महिलांना वस्तू म्हणून पाहणं बंद केलं पाहिजे. तरुणांना समजावूनच बदलली जाऊ शकते."

तर एका महिलेच मत असे आहे  की , "#BoysLockerRoom ची घटना पाहून मला भीतीच वाटली. 16 वर्षांची मुलं बलात्काराची धमकी देतायेत. ते नक्की काय शिकतायेत? महिलांना वस्तूसारखं पाहणाऱ्या, कमीपणा दाखवणाऱ्या आणि महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांबाबत काहीतरी केलं पाहिजे."

     स्त्रीकडे सध्या फक्त एक वस्तू म्हणून बघितल जात. लहानपापासूनच मुलांवर तिच्याकडे व्यक्ती म्हणून बघण्याचा दृष्टीकोनच ठेवत नाहीत. 
मग त्या ११ वर्षीय मुलीचा भाषणातील प्रश्न आठवतो- " अहो, सौंदर्य पुढे लाचार होणारा माणूस बघितला, सौंदर्याकडे शिकार म्हणून बघणारा माणूस बघितला, काल पर्यंत जीला आय म्हणत होता आज तिलाच बाय म्हणणारा माणूस बघितला अहो पण त्या आठ महिन्यांचा बालीकेकडे बघणारा माणूस कोण? नव्हे, नव्हे तो राक्षस कोण?
मग या बद्दल आज बोलावं वाटतं. या सगळ्याची सुरुवात #boyslockerroom पासून होत असेल का? पण हा एक ग्रुप समोर आलाय. असे अजून अनेक ग्रुप फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप, वर आहेत ज्यामध्ये पुरुषांनचां देखील सहभाग आहे.

मग निर्भया ते हैद्राबाद सगळा फ्लॅशबॅक समोर येतो. न दिल्लीतल्या निर्भया प्रकरणावर बीबीसी या वाहिनीने केलेला ‘इंडियाज डॉटर’ या माहितीपट आणि त्यातील आरोपींची बाजू लावून धरणारे वकील महाशय आठवतात. ते म्हणतात, रात्री मित्रासोबत निर्भया बाहेर फिरली नसती तर बलात्कार झालाच नसता. मुलींनी छोटे कपडे घातले म्हणून, त्या सोशल मीडिया वापरायला लागल्या म्हणून, सोशल मीडियावर स्वत:चे फोटो अपलोड केले म्हणून, मुलांशी मैत्री केली म्हणून, रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहिल्या म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात, म्हणून त्या हिंसेला बळी पडतात, म्हणून त्यांना बाहेरच्या वातावरणात असुरक्षित वाटतं. प्रत्येकवेळी असा एखादा हिंसेचा अनुभव आल्यानंतर आधी चूक मुलीचीच असेल असं म्हणून त्या चुकीवरचा इलाज करत तिच्यावर बंधनं लादणं आपण कुठेतरी थांबवायला हवं. मुलींचं इन्स्टाग्राम वापरणं बंद करून असले ग्रुप्स बंद होणार नाही. कारण मुलगी जीन्स , शॉर्ट्स, साडी, नव्वारी, बुरखा, या कशा मध्येही ही दिसली तरी मुलांचा पाहण्याचा दृष्टिकोन तोच राहणार.मग या साठी आपल्याला काही शाश्वत मार्ग शोधावे लागतील. ते अंगिकारण्यासाठी तयारी दाखवावी लागेल.

         मुलींनी आपले कुठलेही फोटो सोशल मीडिया वर टाकताना त्या फोटोंनी आपल्याला काही त्रास होणार नाही याचाही विचार करून फोटो टाकावेत. त्यांनी मानसिक दृष्ट्या सक्षम असण्या बरोबर च शारीरिक दृष्ट्याही सक्षम व्हावं. कोणी ही गैरवर्तवणूक करत असेल तर ठोस पाऊले उचलण्याची हिमत दाखवली पाहिजे. कोणत्याही धमकी ला बळी पडण्याची अवशक्यता नाही. किंव्हा प्रेमात आंधळ होण्याची ही गरज नाही. सायबर क्राईम अशाच गैरवर्तवणुक, धमक्या मिटवण्यासाठी आहे ,त्यावर निःसंकोच पणाने विश्वास ठेवायला पाहिजे. आम्ही तुम्हाला एकच सांगू कधीही तुम्हाला अशा गोष्टीना सामोर जावे लागले तर आमच्या "गर्वाने मराठी" चे सर्व लेखक, आमची टीम आणि आमच्यातील एक सायबर हेल्पर सदैव आपल्या मदतीला उभा असेल.

कायदा -

#BoisLockerRoom : तरुणाईचे धोक्याचे पाऊल

'BoysLockerRoom'सारख्या प्रकरणामागे दोन हेतू असू शकतात - एक म्हणजे मुलींना फसवणं आणि दुसरा म्हणजे मुलींची प्रतिमा मलीन करणं.
असे गुन्हे भारतीय दंडसंहितेच्या कलम 468 आणि 469 अंतर्गत येतात. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी असतील तर त्यांना बालसुधारगृहात पाठवलं जाण्याची शक्यता आहे.
पोलिसांना आता इन्स्टाग्रामकडून माहिती घ्यावी लागेल, जी पुरवणं इन्स्टाग्रामला तंत्रज्ञान कायद्यान्वये बंधनकारक आहे.

सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल यांच्या म्हणण्यांनुसार, "लॉकडाऊनच्या काळात मुलं घराबाहेर पडत नाहीत आणि घरात राहून आई-वडिलांशीही बोलत नाहीत. अशा वेळी इंटरनेटवरच ते अधिक काळ घालवतात. गेल्या 40 दिवसात मुलं डार्क वेबसाईटवर वारंवार गेल्याची शक्यता अधिक आहे."


शिक्षा-

"Boys Locker Room शी संबंधित मुलं अल्पवयीन असल्याचे दिसतायत. पण ते प्रौढही असू शकतात. आणि प्रौढ असतील तर अशावेळी कायद्याचा अडसर नसतो. ज्यावेळी इंटरनेटवर महिलांच्या फोटोवरून अश्लील कंटेट तयार केला जातो, तेव्हा ते प्रकरण माहिती तंत्रज्ञान कायदा 67 च्या अंतर्गत येतं. यात तीन वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड अशी शिक्षा आहे."

माहिती तंत्रज्ञान कायदा 67 आणि 67A अनुसार या 27 जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यासोबत ज्यांनी फक्त ग्रुप जॉईन केला होता त्यांच्यावर देखील कलम 120B नुसार गुन्हे दाखल करता येतील. माहिती तंत्रज्ञान कायदा 67B अनुसार अल्पवयीन मुलींचे असे फोटो टाकले असतील तर 5 वर्षाची कारावास आणि 10 लाख रुपये दंड भरावा लागू शकतो.
भारतीय दंड संहितेनुसार असे गुन्हे करणाऱ्यांविरोधात कलम 345A आणि कलम 292 अन्वयेही कारवाई होऊ शकते. असे गुन्हे मोठ्या कटाचा भाग मानल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्याद्वारेही कारवाईचा मार्ग आहे. Pocso कायद्या अंतर्गत देखील यांच्यावर कठोर कारवाई करता येऊ शकते फक्त पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करायला हवेत.
(वाचकहो तुम्हाला काय वाटत काय शिक्षा करायला पाहिजे यांना? यांचे वय जास्त असते आणि आज महाराज असते तर त्यांनी यांचा रांझ्याचा पाटील केला असता )


#girlslockerroom -

#BoisLockerRoom : तरुणाईचे धोक्याचे पाऊल

आता #girlslockerroom याचाही ट्रेड सुरू झालंय. यावर देखील मुलांच्या शरीरातील खाजगी अवयवांबद्दल चर्चा केली जाते. हे सगळ मुली देखील करायला लागल्यात मग या मागचं कारण , त्या मुलांपेक्षा जास्त strong आहेत हे दाखवण्यासाठी," every action there is equal reaction "मुलं जसं  वागतात तस मुलीही वागू शकतात हे दाखवण्यासाठी, मुलींना justice मिळावं म्हणून किंव्हा peace मिळावं म्हणून...हे शोधन देखील तितकाच गरजेचं आहे.

विषयाच्या शेवट पोहोचलो आहे तर आता काही काळजी तुम्ही घेतली पाहिजे त्याविषयी सांगत आहोत.
१) कितीही जवळचा व्यक्ती असेल तरी खासकरून मुलींनी त्याला कुठल्याच सोशल मिडिया वरून आपले फोटो पाठवू नका. तो जरी चांगला असेल तर हे असे डार्क वेब वर तुमचे फोटो चोरून टाकले जाऊ शकतात आणि त्यांचा असा वापर होऊ शकतो.
२) Instagram वापरत असाल , Facebook वापरत असाल तर वापरा पण एक खबरदारी घ्या, account private ठेवा आणि ज्यांना follow केलंय किंवा जे followers आहेत ते ओळखीच्या व्यक्तीच आहेत की नाही याची खात्री करून घ्या.
३) two step verification सारख्या गोष्टी सुरु करा आणि password जपून ठेवा.
४) कोणी असल्या वायफळ धमक्या देत असेल तर आई वडिलांना सांगा आणि त्यांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल करा. महाराष्ट्र सायबर पोलीस सदैव आपल्या सेवेत हजर आहेत. आणि जर एखादा पोलीस अधिकारी तक्रार दाखल करून घेत नसेल तर आमच्या संघटनेशी किंवा इतर संघटनाशी संपर्क करा ते आपल्याला नक्की मदत करतील.
५) जेव्हड तुमी सोशल लाइफ मध्ये सक्षम बनताय तेव्हडाच शारीरिकदृष्ट्या सक्षम बना.
६) सर्वात महत्वाच म्हणजे sex education आता खूप गरजेचे आहे त्यावर विचार व्हायलाच हवा.

गरज भासली तर संपर्क करा:



Post a Comment

0 Comments