Ticker

6/recent/ticker-posts

बलिदान मास म्हणजे काय? ।। Dharmveer Balidan Mas 2022

बलिदान मास म्हणजे काय? ।। Dharmveer Balidan Mas 2022

फाल्गुन अमावस्या म्हणजे हिंदू पातशाहीचे सिंहसनाधिष्ठित  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या आत्मबलिदानाचा दिवस! हिंदुस्थान हा हिंदुस्थान म्हणूनच राहावा असे मनोमन वाटणाऱ्या प्रत्येक हिंदू मनाला मनस्वी दुःख व्हावे असा हा दिवस. कारण आमचा राजा क्रूर आणि दृष्ट अशा औरंगजेबाकडून मारला गेला. महाराजांची हत्या करण्यात आली. 

बलिदान मास म्हणजे काय? ।। Dharmveer Balidan Mas 2022

Dharmveer Balidan Mas 2022 Marathi Information

Chatrapati Sambhaji Maharaj Balidan din 2022 Marathi Status

आपल्याकडे अनेक शूर वीरांच्या आत्मबलिदानाचे किस्से सांगितले जाते मात्र आपल्या स्वराज्यासाठी मराठी रयतेसाठी आणि माय माऊलीसाठी झगडणाऱ्या राजाच्या बलिदानाला आपण विसरून जातो. त्या आत्मसमर्पणाच्या मती गुंग करून टाकतील अशा दैदिप्यमान स्मृती जागविणे आणि त्या सर्व विषयांचे गंभीर आत्मचिंतन करून काहीतरी संकल्प करण्याचे दिवस म्हणजेच धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास होय.


धर्मवीर बलिदान मास 2022 दिनांक (Balidan Mas 2022 Dates)

नेहमी आपण फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा काळ धर्मवीर बलिदान मास म्हणून साजरा करत असतो. 2022 साली इंग्रजी कालनिर्णया नुसार  2 मार्च 2022 ते 1 एप्रिल 2022 हा कालखंड धर्मवीर बलिदान मास म्हणून पाळला जाईल.


धर्मवीर बलिदान दिन 2022 (Balidan Din 2022)

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच 11 मार्च हा दिवस बलिदान दिन म्हणून पाळला केला जातो.


रायगडाच्या माथ्यावरून कडाडला छावा

जणू सह्याद्रीच्या छातीत उसळला लाव्हा

हैराण करी औरंग्याला त्याचा गनिमी कावा

बलदंड ताकदीचा वीर ऐसा जो ना कळला देवा!


घायाळ होई युद्धभूमी ऐसी तळपली तलवार

थरथर काप गनीम असा त्या नजरेचा वार

रक्तपाजे रणांगणा होऊनि शत्रूवर स्वार

वार घेई छातीवर, बोथट होई तलवारीची धार


स्वराज्यासाठी रुळली इथे बलिदानाची प्रथा

झुकेल कसा छावा ज्याचा छत्रपती शिवराय पिता

पत्कारितो मरण, मृत्यू टेकवी माथा

अजिंक्य पराक्रमाची जगी एकच ही गाथा!


छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणाच्या छाताडावर पाय देऊन स्वराज्य निर्माण केले. हेच स्वराज्य पुढे वाढविण्याचे सर्वात महत्वाचे कार्य हे धर्मवीर संभाजी महाराजांनी केले. 

ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा युगपुरुष, धर्मपुरुष जन्माला येतात. आपल्या रक्ताच्या थेंबा थेंबामधून या हिंदू समाजाला जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केले आहे. 

बलिदान मास म्हणजे नेमकं काय?

ज्यावेळी मुकरर्बखानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि औरंगजेबासमोर आणले तिथपासून ते महाराजांचे बलिदान हा संपूर्ण एक महिना म्हणजे बलिदान मास होय. 

औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यानंतर काही प्रश्न केले असे आपल्याला सांगितले जाते. आमचे कोणते सरदार तुम्हाला मिळाले आहेत आणि स्वराज्याचा खजिना कुठे लपवून ठेवला आहे? हे दोन प्रश्न आपल्याला सर्व लोक सांगतात मात्र तिसरा प्रश्न म्हणजेच तु धर्मांतर करतो का? हा प्रश्न का आपल्याला सांगितला जात नाही? महाराजांनी जो पुढे 40 दिवस अत्याचार सहन केला तो फक्त या स्वराज्यासाठी! 

धर्मवीर बलिदान मास का साजरा करावा?

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी, धर्मासाठी जे बलिदान दिले त्याची जाणीव आपल्याला असावी म्हणून हा धर्मवीर बलिदान मास आपण साजरा करावा.

धर्मवीर बलिदान मास कसा पाळावा?

आपण आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या निधनाने आपल्याकडे शोक व्यक्त केला जातो. त्या मृत व्यक्तीला अग्नी देणारा माणूस चपला घालत नाही. दहाव्याच्या दिवशी आपण मुंडन करत असतो. 

आपण संभाजी महाराजांनी दिलेल्या या बलिदानाची आठवण म्हणून 40 दिवस आपली एखादी आवडती वस्तू सोडली पाहिजे. महाराजांवर जे अत्याचार झाले ते आपल्याला अनुभवता येणार नाहीत मात्र आपण एखाद्या गोष्टीचा तरी त्याग करू शकतो.

पंढरीच्या पांडुरंगासाठी आपण वारकरी मंडळी उपवास ठेवत असतो. आपल्याला ज्या वेळी भूक लागेल तेव्हा आपल्याला ते परमेश्वराची आठवण होत असते. त्याच प्रमाणे जर आपण फाल्गुन महिन्यात चप्पलचा त्याग केला आणि आपल्याला ज्यावेळी एखादा खडा टोचला, चटका बसेल तेव्हा मात्र आपल्याला शंभू राजांच्या त्या बलिदानाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. 

Post a Comment

0 Comments