Ticker

6/recent/ticker-posts

महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडला कशी गेली? । Jagdamba Sword of Chatrapati Shivaji Maharaj

महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडला कशी गेली? । Jagdamba Sword of Chatrapati Shivaji Maharaj

महाराजांची जगदंबा तलवार इंग्लंडला कशी गेली? । Jagdamba Sword of Chatrapati Shivaji Maharaj

सध्या एक विषय गाजतोय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीचा! इंग्लंडच्या राणीच्या वयक्तिक संग्रहालयात म्हणजे रॉयल संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार आहे आणि ती भारतात आणण्यासाठी जनआंदोलन सुरू झाले आहे.
कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी लिहिलेले पुस्तक "शोध भवानी तलवारीचा" देखील आपल्याला हीच माहिती देते की ती जी तलवार आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. 


कोल्हापुरातून डिसेंबर जानेवारी 1875-76 दरम्यान लंडनच्या राजपुत्र ज्याला प्रिन्स म्हणले जाते तो भारतभेटीला आला होता. हाच प्रिन्स पुढे जाऊन 7वा एडवर्ड राजा म्हणून प्रसिद्ध झाला. त्याला ऐतिहासिक गोष्टी गोळा करण्याचा वेगळाच छंद होता. त्याने भारतात येण्यापूर्वी जवळपास 500 हुन अधिक संस्थानिकांकडे कोणकोणत्या ऐतिहासिक वस्तू आहेत याचा शोध घेतला. त्यावेळी त्याला असे आढळून आले की शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली जगदंबा नावाची तलवार ही करवीर छत्रपती घराण्याच्या शिलेखाण्यात म्हणजेच संग्रहालयात आहे. त्यावेळी कोल्हापूर गादीवर चौथे शिवाजी महाराज जे केवळ 11 वर्षाचे अल्पवयीन होते ते बसलेले होते. तलवारीची अवस्था अशी होती की यातील हिरे माणिके पडलेली होती आणि त्याच म्यान देखील नव्हते. त्या सर्व गोष्टी दुरुस्त केल्या गेल्या, यात हिरे बसवण्यात आले व म्यान देखील बनवून घेण्यात आली. (जी माहिती देतोय याचा सर्व संदर्भ कोल्हापूरच्या पुरालेखागारात आहेत)


हीच शिवाजी महाराजांची तलवार घेऊन 1875-76 ला चौथे शिवाजी महाराज मुंबई मध्ये गेले. प्रिन्स ऑफ वेल्स मुंबई मध्ये आल्यावर मोठा दरबार भरला. याच वेळी चौथे शिवाजी महाराज यांनी एक कट्यार जीचा संदर्भ नसल्याने आपण ती शिवाजी महाराजांची होती का हे सांगू शकत नाही आणि त्याजोडीला जगदंबा तलवार भेट म्हणून दिली. त्यानंतर तो प्रिन्स ती तलवार घेऊन गेला.


इतिहास हा मौखिक पुरावे ग्राह्य धरत नसतो, त्यासाठी लेखी पुरावे लागतात. प्रिन्स ऑफ वेल्स ज्यावेळी तिकडे तलवार घेऊन गेला तेव्हा त्यांनी एक कॅटलॉग बनवला आहे. हा कॅटलॉग त्यावेळीच छापलेला असून त्याची सध्याही उपलब्धता आहे. त्यातील 201 क्रमांकावर वर्णन केलेले आहे की ही तलवार कुठली आहे, कशी आहे, त्यावर काय लिहिलेले आहे, त्यावर हिरे किती आहेत, माणिक मोती किती आहेत, ही सर्व माहिती आहे. 


यातील एक वाक्य खूप महत्वाचे आहे जे आम्ही सांगतोय
"ही तलवार कोल्हापूरच्या चौथ्या शिवाजी महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्सला भेट दिली, की जी तलवार मराठा राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज्यांच्या वापरातील आणि त्यांच्या मालकीची होती. त्यांची आठवण म्हणून ही तलवार प्रिन्स ला भेट दिली."


मालब्रो हाऊस मध्ये त्या काळी ही तलवार इंडियन रूम मध्ये होती. त्यानंतर रॉयल कलेक्शन ट्रस्ट नावाच्या ट्रस्ट स्थापनेनंतर त्यात ही तलवार गेली. जेव्हा कधी त्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जातो तेव्हा ते अधिकारी ही भवानी तलवार नाहीये आणि ही शिवाजी महाराजांची तलवार नाही अशी उत्तरे देतात. भवानी तलवार ती नाहीच कारण भवानी तलवार तर साताऱ्यात आहे. त्यांनीच तयार केलेल्या कॅटलॉग मध्ये ही तलवार शककर्ते शिवाजी महाराजांची आहे असे सांगितले आहे.

अनेकांनी ही तलवार शिवाजी महाराजांची नाही असे सांगितले आहे परंतू आज त्या सर्व काही शंका सध्या संपल्या आहेत. आपल्या पंतप्रधानांचे संपर्क आणि कार्य चांगले आहेत त्यामुळे आजही आशा आहे की ही तलवार भारतात येऊ शकेल. राजकीय इच्छाशक्ती असेल तर ते आजही लगेच होऊ शकेल. कोल्हापूर घरण्यातून ही तलवार गेली आहे आणि सध्याचे वारस व इतिहासप्रेमी खासदार संभाजीराजे यांनीही घोषणा केली होती की ही तलवार मी परत आणेल.
बाकी संस्थानांपैकी गुरू गोविंद सिंगांची शस्त्रे आजच्या घडीला पुन्हा आणण्यात यश आलेले आहे. केरळ मधील नटराजाची मूर्ती देखील पुन्हा आणली आहे.

जगदंबा तलवारीचे वर्णन इथे वाचा. 

तुम्हाला हा कॅटलॉग वाचायचा असेल तर तुम्हाला त्यांची लिंक देतो आहे.

कॅटलॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शोध भवानी तलवारीचा पुस्तक आपल्याला इथे मिळेल.

शोध भवानी तलवारीचा

Post a Comment

0 Comments