Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीचे वर्णन - Details about Jagdamba Sword

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा तलवारीचे वर्णन - Details about Jagdamba Sword

जगदंबा तलवारीचे वर्णन

छत्रपती शिवाजी महाराज या नावात जी शक्ती आहे त्यामुळे त्यांच्याशी निगडित सर्व गोष्टींकडे आपण सहज आकर्षित होतो. त्यातील अशीच एक गोष्ट म्हणजे मागील लेखात आपण बघितले ती म्हणजे जगदंबा तलवार! त्या तलवारीचा आपण भारतातून इंग्लंड पर्यंतचा प्रवास बघितला आज आपण या तलवारीचे वर्णन आणि वैशिष्ट्य बघुयात.

कोल्हापूर राजघराण्यात शिलेखाण्यात असलेल्या एका नोंदीवरून ही तलवार महाराजांची आहे हे समजून येते. यातील वर्णन असे आहे की,

"तलवार सडक जगदंबा मेणावर नकीत्यास हिरे 6, माणके 44, पाचा 10 एकूण पक्की परज हिरे 13, पाचा 18, माणके 467 मिळून सबंध तलवार"

प्रिन्स ऑफ वेल्स ला मिळालेल्या महत्वाच्या भेटीची नोंदणी ही ब्रिटिश कॅटलॉग मध्ये आपल्याला बघायला मिळते. रॉयल कॅटलॉग मध्ये याविषयी एक नोंद आपल्याला क्रमांक 201 वर बघायला मिळते. त्यात नोंद अशी आहे की,

खूप कमी लोकांना ही महाराजांची तलवार याची देही याची डोळा बघता आली. यात भारताचे तत्कालीन लंडनमधील राजदूत परशुरामराव पंत प्रतिनिधी, प्रसिद्ध शस्त्र अभ्यासक  गजानन यशवंत माणिक उर्फ प्रा माणिकराव, इतिहासकार वा सी बेंद्रे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले, शरद पवार आणि लंडन स्थित श्रीकृष्ण गमरे यांनी ही बघितली आहे.

श्रीकृष्ण गमरे आणि त्यांच्या सोबत भगवती परिवाराचे श्री भोगिलाल पांचाळ यांनी सप्टेंबर 2000 साली यांनी सेंट जेम्स पॅलेस रॉयल कलेक्शन लंडन इथे भेट देऊन जगदंबा तलवारीचे चित्रीकरण केले. 

बाबासाहेबांना ही तलवार जवळपास पाऊण ते एक तास हाताळायला मिळाली त्यामुळे त्यांनी केलेले वर्णन असे की,

" या जगदंबा तलवारीच्या सरळ पात्याची लांबी 100 सेमी आहे, मूठ आणि मागील कळी यांची लांबी ही 22 सेमी आहे. तलवारीची एकूण लांबी 122 सेमी इतकी आहे. तलवार पूर्णपणे दुधारी नसून तिची खालची बाजू पूर्ण धारेची आहे आणि वरची बाजू 71 सेमी पर्यंत बिन धारेची आणि जाड आहे. पुढील भागास अर्थात धार आहे. पात्यातील टोक म्हणजे अग्रक अगदी थोडेसे बाकदार अथवा वळणदार आहे. एकंदर तलवारीचा ढाळ हा सरळ आहे. घोप बांधण्यासाठी मूठ आणि पाते यांच्या दरम्यान एक कडी असते तर या तलवारिस कडीसाठी छिद्र आहे. कडी इथे नाहीये, कदाचित पडली असावी. तलवारीची मूठ शुद्ध सोन्याच्या जाडसर पत्र्याने बनलेली आहे, त्यावर बाहेरच्या बाजूने सर्व हिरे आणि माणके जडवलेले आहेत. माणके 73 आहेत त्यापैकी 2 माणके पडलेली आहेत. यांची कोंदणे रिकामी दिसतात. तलवारीच्या मुठी मागील कळी सुद्धा जडावाची आहे, या कळीला सुदधा टोकाला सोन्याची शेंडी आहे. तलवारीचे पाते मुठीजवळ 3 सेमी रुंद आहे. तलवारीचे वजन घेता आले नाही परंतु ते अंदाजे एक किलो असेल असे वाटते. संपूर्ण मुठीवर असलेल्या हिऱ्यांची संख्या नेमकी सांगता येणार नाही , मला ते मोजणे जमले नाही परंतु अंदाजे हे पांढरे खडे 350 ते 375 असावे असे मला वाटते. या मुठीचे सौंदर्य व तेज अतिशय विलोभनीय आहे. तलवारीच्या पात्याला दोन्ही बाजूस दोन खोलगट पन्हाळे आहेत आणि पात्याच्या एका बाजूला I.H.S. ही अक्षरे तीन वेळा कोरलेली आहेत."

जगदंबा तलवारीचे काही फोटोग्राफ्स










Post a Comment

0 Comments