Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा । Chatrapati Sambhaji Maharaj Rajmudra

छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा । Chatrapati Sambhaji Maharaj Rajmudra

संभाजी महाराज राजमुद्रा


3 एप्रिल 1680, मराठा साम्राज्यासाठी आणि स्वराज्यासाठी काळा दिवस! अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे त्या काळी प्रत्येक शत्रूच्या मनात भीती निर्माण करणारे, अवघ्या महाराष्ट्राचे पालक, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून गेले. महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सर्व जबाबदारी ही युवराज छत्रपती संभाजी महाराजांवर आली. 

गणिमाना धडा शिकवण्यासाठी आणि स्वराज्याचे नेतृत्व करण्यासाठी 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. संभाजी राजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले! राज्याभिषेकानंतर नवीन राजाला राज्यकारभार करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा गरजेची असते. छत्रपती श्री शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्याला माहीतच आहे, 


प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।

शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।


त्याच प्रमाणे संभाजी महाराजांची देखील स्वतंत्र राजमुद्रा आहे. 


16 जानेवारी 1681 रोजी शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांनी स्वतःची ही राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत आहे. आपल्याला ठाऊक असेल की महाराज म्हणजे संस्कृतचे गाढे पंडित होते. राजमुद्रा ही पिंपळाच्या पानाच्या आकाराची आहे. या राजमुद्रेला एकूण 16 बुरुज आहेत. या राजमुद्रेवर संस्कृत भाषेमध्ये मजकूर लिहिलेला आहे. 


श्री श्री शंभोः शिवजातस्य मुद्रा घौरिव राजते।

यदं कसेविनी लेखा वर्तते कास्य नो परि ।।


या राजमुद्रेचा मराठी मध्ये अर्थ असा होतो की , छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. 

याच राजमुद्रेच्या आधारावर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याकाळी राज्यकारभार चालवला होता. छत्रपती शिवाजी महाराजानी ज्या प्रमाणे स्वतःच्या राज्याभिषेकानंतर राज्यात स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली त्याच प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी देखील राज्याभिषेकानंतर स्वतःची स्वतंत्र नाणी पाडली. शिवरायांनी पाडलेल्या नाण्यांना शिवराई तर शंभूराजांनी पाडलेल्या नाण्यांना शंभुराई असे संबोधले जात होते.


Post a Comment

0 Comments