Ticker

6/recent/ticker-posts

तो फोन......

तो फोन......


तो फोन
     आज सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा नेहमीच दिनक्रम सुरू करण्याआधी काल झालेल्या सीमेवरच्या चकमकीची माहिती पहिले बातम्यांमध्ये बघावी कसं वाटलं. बातम्या लावल्या वर काही जाहिराती सुरू झाल्या कोरोना च्या बातम्या आल्या पण पुढची बातमी जी प्रस्थापित झाली त्याने मला धक्का बसला, "भारताचे वीस वीर जवान शहीद झाले!"हे ऐकून माझे डोळे पाणावले पण ते अश्रू डोळ्यात तितकाही काळ राहिले नाही जितकी ते वीर आपल्यासाठी आपल्या देशासाठी युद्धभूमीवर होते.
       थोड्या वेळ विचार केल्यानंतर मी ती बातमी 'एखादा सैनिक ज्याप्रमाणे देशासाठी संसाराकडे दुर्लक्ष करतो' अगदी तसेच मी ही बातमी नकळतपणे दुर्लक्षित केली व मी "तिला" भेटायला निघून गेले. कारण तिच्या घरी आज नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या बारशाचा कार्यक्रम होता.
      तिच्या घरी जाताच कार्यक्रमाच्या तयारीसाठी चाललेली गडबड लहान मुलांचा कल्ला, व त्या छोट्या परीला पाहून मला खूप आनंद झाला.मग मी "तिला" भेटले तिचे अभिनंदन केले. तिही आज खूप आनंदात होती पण तिला येणाऱ्या तिच्या नवऱ्याची आठवण चेहऱ्यावरून काही लपत नव्हती. मात्र थोडावेळ झाल्यानंतर तिने तिच्या फौजी चे पराक्रमी किस्से सांगायला सुरुवात केली. ती सांगत असताना मला तिच्यात एखादी आपल्यासारखी साधी स्त्री मुळीच दिसत नव्हती कारण आपण आपल्यासारखी माणसे फक्त स्वतःपुरता विचार करतात. आपल्याला वाटते की शिवाजी जन्मावा पण तो आपल्या नाही शेजारच्या घरी.पण तिच्या मात्र बोलण्यातून अस बिलकुलच वाटत नव्हतं ती बोलत असताना मला जणू काही झाशीची राणी माझ्या समोर उभी आहे असं वाटलं..
       एकूणच काय तर सगळ वातावरण आनंदीमय होतं पण जणू काही या आनंदाला कोणाची दृष्ट लागली व पाळणा हलवण्याचा काही क्षण आधीच तो फोन वाजला..
       त्या एका फोन ने जणू पौर्णिमेची अमावस्या झाली, सूकाळातून दुष्काळ अाला व प्रकाशमय वातावरणात अंधकाराने प्रवेश केला कारण तो फोन आर्मी ऑफिस मधून आला होता ज्या फौजीचे ती काही वेळापूर्वी कौतुक करत होती ,त्यांच्या पराक्रमाचे किस्से अभिमानाने सांगत होती तोच फौजी आज या मातीसाठी शहीद झाला होता..
       तिथलं दृश्य पाहून मला माझी आजची सकाळ आठवली ची बातमी मी अगदी काही वेळात दुर्लक्षित केली ती बातमी परत येत माझ्या डोळ्यात साठली. किती सोपं गेलं मला ती बातमी विसरायला पण किती अवघड होतं तिला हे सामोरे जायला!..मनात विचारांचा काहूर माजला होता की खरच किती सोप्प आहे ना आपल्या सगळ्यांना आज बघितलेला जवानांच्या शहीद झालेल्या बातमीला विसरून जायला,काल झालेला रेप केस ला न्यायदेवतेवर सोडायला, आपल्यासाठी असणाऱ्या पोलिसांवर-डॉक्टरांवर हल्ला करायला, काळाबाजार करायला मुक्या प्राण्यांवर हिंसा करायला आणि त्याहूनही आपल्याला सोप्प आहे प्रत्येक होणाऱ्या  गोष्टीवर घरी बसून टीका करायला,चार-पाच हॅशटॅग टाकून ती सोशल मीडियावर व्हायरल करायला आणि सरकारवर सगळं थोपायला. पण आपल्यालाही लक्षात यायला हवं जसे हे सरकार -लोकांकडून लोकांसाठी बनते अशा या लोकशाहीत लोकान प्रतीही कर्तव्य आहेत जी आपण पार पाडायला हवी.असे विचार मनात येत असतानाच मी तिची समजूत कशी काढावी हे मला कळत नव्हतं.वाटत होत आपण तिला जवळ घेऊन रडायला खांदा देऊन तिच्या दुःखाला अश्रू  वाटे यायला वाट देऊ.  पण काही वेळ गेल्यानंतर ती स्वतः सावरली व ज्या नंबर वरून फोन आला होता त्या अधिकाऱ्याला कॉल करून सविस्तर माहिती घेतली व अंत्यसंस्कारासाठी तिच्या मनाची तयारी केली.
       तिने स्वतः प्रमाणे  तिच्या परिवारालाही हिम्मत दिली व तिच्या रडणाऱ्या त्या लेकराकडे जाऊन भिंतीवर लावलेले सर्व त्या वीराचे मेडल्स आपल्या बाळा जवळ ठेवले. बाळाचे नाव ठेवाय- च्या आधी ते बाळ भविष्यात आर्मीत जाणार असल्याचे सांगितल व बोलली की साधं - सूध तर कोणीही जात पण तिरंग्यात लपेटुन जायची शानच वेगळी असते.....
      अशी ही "ती" तिच्या नवऱ्याची ताकत,परिवाराची हिम्मत होती आणि हीच "ती" एका वीर जवानांची वीरपत्नी होती.

लेखक- रुचा सुनिल म्हस्के, राहुरी

Post a Comment

2 Comments