Ticker

6/recent/ticker-posts

सुक चिकण व चिकण कोरमा (sukha chicken & Chicken Korma)

सुक चिकण व चिकण कोरमा (sukha chicken & Chicken Korma)

सुक चिकण (sukha chicken / simple spicy chicken)

लॉकडाऊन जरी असला तरी मनामध्ये हॉटेलमध्ये मिळणारे पदार्थ खाण्याची इच्छा कायम असते आणि त्यात जर नॉनव्हेज खाणारे असाल तर हमखास हॉटेलमध्ये मिळणाऱ्या सुक्या चिकन ची आठवण हि येतेच.
चमचमीत जेवण हे जणू जिभेवर आपोआपच पाणी आणत आणि आपल्या मनाला पूर्णपणे त्या पदार्थाचा विचार करायला भाग पाडत.
माझे बाबा हे सुक चिकन एकदम हॉटेल सारखे घरी बनवतात. असे एकदा lock-down मध्येच त्यांनी सुक चिकन बनवले होते. बनवण्याच्या वेळेस तो सुटलेला खमंग वास आणि कोणाचाही विचार न करता त्यावर मारलेला ताव आठवून आजही जिभेला पाणी सुटते. ज्या गोष्टीने जिभेला पाणी सुटते ती गोष्ट तर शिकलीच पाहिजे आणि आपल्याला बनवताच आली पाहिजे म्हणून मी देखील या lockdown मध्ये त्यांच्याकडून सुक चिकन बनवायचे शिकले आणि विचार केला का नाही आपल्या वाचक वर्गापर्यंत हि पाककृती पोहोचवू नये!

चला तर मग आज जाणून घेऊया हे सुक चिकन घरच्याघरी बनवायचं कसं ?

साहित्य-
चिकण१ किलो, कांदे ५०० ग्राम, आल लसुन पेस्ट, दही २५० ग्राम, १ लींबु, Everest मटणमसाला, लाल तिखट चवी नुसार, हळद, काळा मसाला (खोबर व कांदा भाजुन पेस्ट) १ वाटी, गरम मसाला, ५ काळे मिरे, ५ लवंग, दालचिनी, वेलची काळी २, वेलची हिरवी ५, कढी पत्ता, कोथींबीर, पुदीना, टोमॅटो २, तेल २०० ग्राम, तेज पान, जावीत्री व चक्री फुल आवडत आसतील तर टाकणे

कृती-
सुक चिकण (sukha chicken / simple spicy chicken)

प्रथम चिकण स्वच्छ करुन घ्यावे. जेव्हा आपण चिकन आणतो ते मिठाच्या कोमट पाण्यात धुवून घेतल्यास त्याचा वास येत नाही.
आता एका भांड्यात धुतलेले चिकण घेवुन त्यात  दही, बारीक चिरलेली कोथींबीर , बारीक चिरलेला पुदीना, हळद, लाल तिखट, गरम मसाला, १ लींबाचा रस बिया काढुन टाकायचा. या मिश्रणात चवी नुसार हव तेव्हड मीठ देखील टाकायचे.
( यात काळ्या मसाल्याच वाटण टाकु नये व आल लसुन पेस्ट पण टाकु नये )
वरील मेरीनेशन केलेल चिकण २ तास फ्रीज मधे मुरायला ठेवुन द्यायचे. मॅरीनेट केल्यामुळे चिकन ला एक वेगळाच स्वाद येतो व ते काही प्रमाणात सोफ्ट देखील होते.

२ तास झाल्यानंतर आपण काहीवेळापूर्वी मॅरीनेट केलेल चिकण फ्रीज मधुन बाहेर काढुन घ्यावे.
आता गॅसवर चिकण शिजवण्यासाठी मोठी कढई किंवा भांड ठेवावे.
भांड्यात तेल टाकून, तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा. नंतर त्यात आले लसुन पेस्ट टाकावी.बारीक चिरलेला टोमॅटो टाकून हे चांगल परतुन घ्यावे. आता काळ्या मसाल्याच वाटण यात टाकावे (काळ्या मसाल्याचे वाटण कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा). तेल सुटे पर्यन्त कढईतील सर्व परतुन घ्यायचे.  नंतर कढीपत्ता टाकून  परतुन घ्यावे.  आता मटण मसाला, धणेपावडर,  खडे मसाले हळद,लाल तिखट,गरम मसाला टाकुन परतून घ्यायचे. खमंग वास सुटल्यावर मुरवलेल चिकण त्यात टाकावे  व नंतर चवीनुसार थोडेसे मिठ टाकावे.  थोडस पाणी टाकणे हे पाणी संपे पर्यंत शिजवुन घ्यावे.
आता तुमच्यासमोर तयार आहे चमचमीत सुक चिकन!  

आता बघूया चिकन कोरमा कसा बनवायचा,

साहित्य-
२५० ग्राम चिकन, ७ कांदे, २ टोमटो, खडा मसाला, दालचिनी, कोथंबीर, जिरे, १० पाकळ्या लसून, ७ इंच आले,तेल, चिकन मसाला, धना पावडर,  मिरची पावडर, हळद, मीठ, दही अर्धी वाटी  

कृती-
सुक चिकन बनवताना आपण ज्याप्रमाणे चिकन आधी धुवून घेवून त्याला दही लावून १० ते १५ मिनिट मेरीनेट करण्यासाठी ठेवले त्याप्रमाणेच आता देखील हि कृती करावी.
आपल्याला पाणी न टाकता चिकन शिजवायचे आहे त्यामुळे तेल भरपूर प्रमाणात घेऊ. त्यात अगोदर खडा मसाला टाकून ते तळून घेऊ. त्यातच कांदा उभा कापून तांबूस रंग येईपर्यंत परतून घेवूयात. या मध्ये tomato टाकून कोथिंबीर, लसून, आले, जिरे यांची पेस्ट बनवून घेऊन ती टाकावी.धनापावडर, चिकन मसाला, हळद, मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व आपल्या मसाल्यात तेल सुटे पर्यंत परतून घ्यायचे.
त्यानंतर यात चिकन टाकून देऊन त्यावर झाकण ठेवून शिजवावे.
शिजल्यानंतर आपला चिकन कोरमा तयार आहे.

आस्वाद घेण्याअगोदर आम्हाला तुम्ही बनवलेल्या चिकन चे फोटो पाठवायला विसरू नका. (www.instagram.com/garvanemarathi)

टीप-
बॉयलर चिकण असेल तर शिजवतांना पाणी टाकु नका, गॅस कमी ठेवा, दह्याच्या व चिकणच्या पाण्यातच ते शिजत.
दह्यात टाकलेले चिकन बाहेर काढताना त्यातील पाणी नितळून घ्यावे. आणि शिजवताना गॅस मंद ठेवावा.

Post a Comment

0 Comments