Ticker

6/recent/ticker-posts

काळा मसाला वाटण (काळा मसाला/ वाटनाचा मसाला)

काळा मसाला वाटण (काळा मसाला/ वाटनाचा मसाला)

काळा मसाला वाटण

वेळ- २० मिनिट

शूरवीर महारथींचा  देश माझा – महाराष्ट्र माझा! शौर्य आणि देशाभिमान नसानसांत भिनलेला ! मिळमिळीतपणा ना वागण्यात  , नाही  जेवणात गावायचा ! काय मंडळी खर आहे कि नाही ?

आपण आज  ५ व्यक्तींची आमटी होईल इतका मसाला बनवणार आहोत. मांसाहारी लोकांनसाठी ही पर्वणी आहेच परंतु शाकाहारी जेवणात देखील काळ्याभाजीला अथवा साराला हा मसाला एक खमंग स्वाद देऊ शकेल.

महाराष्ट्र म्हणाले की येतो वागण्यातील रोखठोकपणा सोबत संस्कारांची जोड! आणि हे सगळं देत आपली जेवणातील चव आणि झणझणीतपणा.... गावांसोबत बदलत जाणारी चव आणि तिखटपणा,याला कारण असतं ते म्हणजे वापरले जाणारे मसाले. यातील एक काळा मसाला म्हणजे नॉन-व्हेज खाणाऱ्यांची मज्जा आणि भाजी खाणाऱ्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारा!

चला तर मग बघूया कसा बनवायचा हा काळा मसाला,


काळा मसाला बनवण्याचे साहित्य-

४ कांदे, पाऊण वाटी खोबर, तेल, १०-१२ लसणाच्या पाकळ्या, एक इंच आल्याचा तुकडा, कोथंबीर, २ टेबल स्पुन  धने


काळा मसाला बनवण्याची कृती-

सर्वप्रथम गॅस वर कमी प्रमाणात गरजेपुरते तेल टाकायचे.तेल घेताना अंदाज घ्यायचा की आपला कांदा परतेल इतकंच घ्यावं. तेलात कांदा टाकून तो लालसर होई पर्यंत परतून घ्यायचा. कांदा काढून घेऊन त्यानंतर खोबरं काळपट रंग येऊ पर्यंत भाजून घ्यायचं. थोडंस काळपट होई पर्यंतच भाजावे. त्यानंतर धणे भाजून घ्यायचे आणि लसूण, आले, कोथिंबीर थोडीशी गरम करून घ्यायचे.

हे सर्व थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यावर यात थोडंस पाणी टाकून हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. आता हे वाटण आमटीसाठी तयार झालेले आहे.

आमटी करताना हे वाटण सुरवातीला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे.आणि आपली काळ्या मसाल्याच्या मदतीने तयार झालीये झणझणीत आमटी!


टिप्स-


  • कांदा तळताना लवकर ब्राऊन व्हावा म्हणून चिरल्यानंतर २-३ तासांसाठी एका ताटात पसरवून उन्हात वाळवून घ्यावा. त्याचे पाणी सुकून जाते आणि विश्वास ठेवा रेकॉर्ड ब्रेकिंग कमी वेळेत चटकन तळून होतो.
  • तिखट आवडत असेल तर २-४ लवंग ,मिरे वाटताना घेऊ शकता, थोडासा झणझणीत पणा वाढेल.

Post a Comment

0 Comments