Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती म्हणे पुस्तकाविषयी अभिप्राय | Chhatrapati Mhane Book review in Marathi

छत्रपती म्हणे पुस्तकाविषयी अभिप्राय | Chhatrapati Mhane Book review in Marathi


लेखक : प्रथमेश सुभाष राणे (Prathmesh Rane / Roadwheel Rane)
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस (New Era Publishing House Pune)
पृष्ठसंख्या : 112
किंमत : 200 रुपये
छत्रपती म्हणे पुस्तकाविषयी अभिप्राय  Chhatrapati Mhane Book review in Marathi


छत्रपती शिवाजी महाराजांचा आयुष्याशी संबंध जोडताना अनेकदा आपण गफलत करत असतो मात्र शिवाजी महाराज आणि आपले आयुष्य जर एखाद्याला जोडता आले तर नक्कीच तो व्यक्ती आयुष्यात यशस्वी होतो. याच सर्वात उत्तम उदाहरण प्रथमेश राणे स्वतः आहेत. 
छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्व कोणत्याही बंधनात न अडकणार आहे. त्याला आपण एखाद्या सीमेत अडकवून ठेवून त्यांचा अपमान करत नाही ना हे लक्षात घ्यायला हवे. लेखकांनी सांगितलेलं सूत्र "आपण आणि आपले महाराज" हे खूपच साधं आणि सोप्प आहे. यावरून मला तर काही काळापूर्वी महाराजांच्या राज्याभिषेकाला समाधी स्थळी बळीराजा थीम वापरून केलेली सजावट आठवली. अनेकांनी त्यावर धर्माच्या रंगाचा पगडा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र शिवराय हे ज्यांना आत्मसात करता येत नाही ते लोक असेल काहीतरी बरळत असतात हे मात्र ठाम झालं.

Review of Chhatrapati Mhane book written by Roadwheel Rane aka Prathmesh Rane

"प्रसंग असे बाका, मनातून न वाका| हिमतीचा धरावा दोर, परि वाढवा सेनेचा जोर||"

हे लेखकांनी लिहिलेलं सर्वात सुरुवातीचं वाक्य आणि त्यालाच आधरून पुस्तकात एकूण 50 श्लोक दिलेले आहेत. प्रत्येक श्लोकाचा एक समर्पक असे शीर्षक दिलेले आहे. जसं की या वरील श्लोकास "खंबीर नेतृत्व" हे शीर्षक आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वाक्याला एक शीर्षक, संदर्भ देणारी चित्र आणि त्यासोबत महाराजांच्या आयुष्यातील प्रसंगाच्या अनुषंगाने आपल्या आयुष्यात काय करायला हवं याच उत्तर हे लेखकांनी अगदी प्रखर पणे मांडले आहे. 

लेखकांनी स्वतः एका नामांकित वृत्त संस्थेतून नोकरी सोडून स्वतःच्या व्यवसायाला केलेली सुरुवात आणि त्यासाठी छत्रपतींचा आदर्श आपल्याला प्रत्येक ठिकाणी अनुभवता येतो. महाराजांच्या आयुष्यात आणि लेखकांनी सांगितलेल्या गोष्टींमधून काही नमूद कराव्या वाटतं आहे. 
महाराजांच्या कडे देखील जहागिरी करत राहण्याचा एक पर्याय होता मात्र महाराजांनी स्वराज्य हा पर्याय निवडला. यावरून जहागिरी ही गोष्ट नोकरी आणि स्वराज्य हे स्वतःच्या व्यवसायाशी समर्पक पने जोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. आपल्या व्यवसायात आपली कोअर टीम तानाजी, येसाजी, बाजी यांच्यासारखी स्ट्रोंग असायला हवी, स्वराज्याच्या रयतेची महाराजांनी जशी काळजी केली तशी आपल्या ग्राहकांची काळजी करावी यासारख्या अनेक समर्पक गोष्टी उदाहरण सोबत या पुस्तकात असल्याने नमूद कराव्या लागत आहे. 
पुस्तकातून मी एक व्यावसायिक म्हणून एक गोष्ट घेऊन जातो आहे की महाराज हे व्यक्तिमत्त्व माझ्यासाठी प्रत्येक संकटावर प्रेरणा देणारं आहे. इतरांना शक्य नसलेली काहीतरी सुरुवात आपल्याला करायची आहे... म्हणजेच नवनिर्मितीचा ध्यास घ्यायचा आहे!

Post a Comment

0 Comments