Ticker

6/recent/ticker-posts

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना बंदी का? | No Entry On Eid for Hindu's at Durgadi Fort?

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना बंदी का? | No Entry On Eid for Hindu's at Durgadi Fort? 

बकरी ईदच्या दिवशी कल्याण मधील दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यास बंदी असते. पोलिसांकडून या दिवशी खाली बैरिकेट्स लावण्यात येतात. पोलिस आणि शिव सैनिकांत आजच्या दिवशी राडा झाला आहे. यामागील कारण आहे किल्ल्यावर होणारे नमाज पठण. 


हा प्रकार काही आज घडत नाहीये. 38 वर्षांपासून या गोष्टी घडत आहेत. शिवसेनेत फूट जरी पडली असली तरी आजही हे आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे गडावर असणाऱ्या देवीच्या मंदिरात जाण्यासाठी प्रशासन आज बंदी घालते. आज म्हणजे बकरी ईद दिवशी!


दुर्गाडी किल्ल्याचा इतिहास:

ठाणे जिल्ह्यात कल्याण सुभ्यावर 1657 पर्यंत आदिलशहा चा ताबा होता. शिवरायांनी कल्याण प्रांताचे महत्व ओळखून आदिलशाह चा पराभव करत कल्याण स्वराज्यात सामील झाले. याच भागात महाराजांनी भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेत किल्ला उभारला. याच किल्ल्याच्या भागात आरमाराची स्थापना झाल्याची नोंद आहे. 

किल्ल्याच्या बांधकामात महाराजांना संपत्ती मिळाली. महाराजांनी हा प्रकार दुर्गा देवीचा आशीर्वाद म्हणून समजला आणि तिथे दुर्गा देवीचे मंदिर बांधले. या किल्ल्याचे नाव देखील त्यामुळेच दुर्गाडी ठेवण्यात आले. 


शिवसेना प्रमुख आणि दुर्गाडी किल्ला:

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू केला. नवरात्रात असंख्य भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येवू लागले. 


मुस्लिम समाजाचे मत:

मजलिस-ए-मुषालिनी ट्रस्ट ने या ठिकाणी मंदिराच्या परिसरात मशीद असल्याचा दावा केला होता. त्यामुळे तिथे असलेली एक भिंत इदगाह असून त्या ठिकाणी प्रार्थना स्थळ असल्याचे मुस्लिम समाजाने सांगितले. 

कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत हे प्रकरण वक्फ बोर्डा कडे द्यावे अशी मागणी होती. हे सर्व प्रकरण 1970 मध्ये सुरू होते. जिल्हाधिकारी समिती त्यावेळी स्थापन करून त्यांनी हिंदू मुस्लिम समाजाचे सगळं ऐकून घेऊन अहवाल सादर केला. 

किल्ल्याकडे तोंड करून उभे राहिल्यानंतर डाव्या हाताला असलेल्या भिंतीकडे मुस्लिम समाजाला प्रार्थनेसाठी जागा आणि उजव्या बाजूला हिंदू बांधवांना जागा देण्याचा निर्णय या अहवालात होता. 

22 मार्च 1973 रोजी या किल्ल्यावरील दुर्गा देवी मंदिराच्या विषयी प्रश्न विधान सभेत मांडण्यात आला होता. तत्कालीन महसूल मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी याविषयी माहिती समोर आणली होती. 

दुर्गाडी किल्ल्यावरील वास्तू ऐतिहासिक पुरावा नुसार मंदिर आहे. असे सर्व पुरावे न्यायालयात दाखल केलेले होते. सर्व असून देखील न्यायालयात याचा निर्णय झाला नाही. त्यावेळी कल्याण न्यायालयाने मजलिस-ए-मुषालिनी ट्रस्ट ची याचिका फेटाळली होती मात्र पुढे दोन्ही बाजूंनी येत असलेल्या याचिकांमुळे हा निर्णय आजही प्रलंबित आहे. 

हिंदू मुस्लिम समाजात वाढणारा तणाव लक्षात घेता 80 च्या दशकापासून या मंदिरात ईद च्या दिवशी बंधी घातली जाते. ही बंदी हिंदू बांधवांसाठी असते. या दिवशी तेढ निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन मंदिराची घंटा देखील बांधून ठेवत असल्याचे सांगितले जाते. 


आनंद दिघेंचा पवित्रा:

आनंद दिघे साहेबांनी मंदिरात जाण्यास नमाज पठणा वेळी घातली जाणारी बंदी मोडण्यास आक्रमक पवित्रा घेतला होता. आनंद दिघे यांनी त्यावेळी  1986 सालि घंटानाद आंदोलन सुरू केले. किल्ल्याच्या पायथ्याशी हे आंदोलन होत असे. संपूर्ण शिवसैनिक या वेळी मंदिरात जाण्यासाठी प्रयत्न करत असे. 

ईद च्या दिवशी मंदिर पायथ्याशी आरती करण्याची परंपरा आनंद दिघे साहेबांनी सुरू केली. मात्र आज मितीला आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे सांगितले जाते. मात्र घंटा नाद आंदोलन आजही सुरू आहे.

Post a Comment

0 Comments