किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची : १४००
डोंगररांग : डोंगररांग नाही
जिल्हा : पुणे
श्रेणी : मध्यम
गडावर जाण्याच्या वाटा: पुणे जिल्ह्यातील वेल्हे हे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. वेल्हेला जाण्यासाठी मुंबई - बंगलोर हायवे (NH-4) वरील पुण्या पुढील नसरापूर फाटा गाठावा. पुण्या पासून नसरापूर ३६ किमी वर आहे. नसरापूर वरून वेल्हे गावात जाण्यासाठी जीप मिळतात. नसरापूर ते वेल्हे हे अंतर २९ किमी आहे.
राहण्याची सोय : गडावरील मेंगाई देवीच्या मंदिरात १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय : देवीच्या मंदिर समोरच बारमाही असणाऱ्या पाण्याचे टांके आहे
पायथ्याचे गाव: वेल्हे
वैशिष्ट्य : तोरणा किल्ल्याचा विस्तार आणि त्याच बरोबर तेथे असलेल्या लेण्या या वैशिष्ट्यपूर्ण आहे
0 Comments