Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले तिकोना (पुणे)

 किल्ले तिकोना (पुणे)

मुंबई - पुणे हमरस्त्यावरुन दिसणारे लोहगड आणि विसापूर किल्ले आपल्याला सर्वांना माहीत आहेत. याच किल्ल्यांच्या मागील बाजूस पवन मावळ प्रांतात असणार्‍या तिकोना ऊर्फ वितंडगड याची आपणं ओळख करून घेऊया. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मागे हा किल्ला असल्याने थेट नजरेस पडत नाही. द्रुतगती महामार्गावरून मात्र हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणार्‍या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत. त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. साधारणत: या परिसरातील लेणी ही बौध्द आणि हिनयान पध्दतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग 

किल्ल्याची ऊंची : ३८५० फूट 

डोंगररांग : लोणावळा 

जिल्हा : पुणे 

श्रेणी : मध्यम 


गडावर जाण्याच्या वाटा: अनेक ट्रेकर्स लोहगड, विसापूर ,बेडसे लेणे आणि तिकेना असा ट्रेकही करतात. यासाठी बेडसे लेण्या करुन तिकोनापेठेत जाता येते.


राहण्याची सोय पावसाळा सोडून इतर सर्व ऋतुत १० ते १५ जणांना गुहे मध्ये राहता येते.

जेवणाची सोय गडावर जेवणाची सोय नाही

पाण्याची सोय गडावर बारामही पिण्याच्या पाण्याची टाकं आहेत.

पायथ्याचे गाव: तिकोनापेठ  

वैशिष्ट्य : किल्ल्यावरील महादेवाचे मंदिर ,तटबंदी आणि ध्वज स्तंभाजवळील दृश्य बघण्यासारखे आहे  

Post a Comment

0 Comments