Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले तळगड (रायगड)

 किल्ले तळगड (रायगड)

रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत. त्यापैंकी तळागड हा किल्ला कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. प्राचीन काळी कुंडलिका नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावर जात असे. या व्यापारी मार्गावर बांधलेली कुडा लेणी आणि तळागड , घोसाळगड, अवचितगड हे किल्ले या मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष देत अजूनही उभे आहेत.

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग 

किल्ल्याची ऊंची : १००० फूट 

डोंगररांग : रोहा 

जिल्हा : रायगड 

श्रेणी : मध्यम 


गडावर जाण्याच्या वाटा: मुंबई - गोवा महामार्गावर मुंबई पासून १२८ किमी अंतरावर इंदापूर गाव आहे. इंदापूर गावापासून तळागाव १५ किमी अंतरावर आहे. इंदापूर गावातून रिक्षा किंवा बसने तळा गावात जाता येते. तळागावातूनच किल्ल्यावर जाण्याची मुख्य वाट आहे.गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे. या वाटेने गडावर जातांना पहिल्या टप्प्यावर एक छोटीशी सपाटी लागते. दुसरा टप्पा म्हणजे गडाच्या माचीचा भाग आणि तिसरा भाग म्हणजे किल्ल्याच्या अंर्तभागात असणारे प्रशस्त पठारच होय. पायथ्यापासून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो.


राहण्याची सोय :किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय : गावात भोजनालय आहेत 

पाण्याची सोय : किल्ल्यावर पाण्याची उपलब्धी आहे

पायथ्याचे गाव: तळागांव 

वैशिष्ट्य : किल्ल्याची तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण आहे 

Post a Comment

0 Comments