Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले कोरीगड (पुणे)

 किल्ले कोरीगड (पुणे)


मुळशी धरणाच्या पश्चिमेकडे एक मावळ आहे, त्याचे नावं आहे "कोरबारस मावळ". कोरी हे कोळ्यांच्या एका पोटजातीचे नाव, या कोरी लोकांचा गड तो कोरीगड होय. या मावळ प्रांतात कोरीगड आणि घनगड हे किल्ले येतात. लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असणार्‍या सव्वाष्णी घाटाच्या माथ्यावर कोरीगड आहे. हा किल्ला प्रसिद्ध आहे, त्याच्या सद्य…स्थितीला असलेल्या अखंड तटबंदीमुळे. या किल्ल्याला कोरीगड, कोराईगड या नावाने ही ओळखतात. तर या गडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ शहापूर या गावामुळे या किल्ल्याला शहागड या नावानेही ओळखतात. या भागातील किल्ले पहावयाचे असल्यास तीन ते चार दिवसांची सवड हवी. कोरीगड, घनगड, सुधागड आणि सरसगड यासारखा सुंदर ट्रेकही या भागात आपल्याला करता येतो.पावसाळ्यानंतरचा काळ या भागात ट्रेक करण्यासाठी आदर्श काळ आहे.

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग 

किल्ल्याची ऊंची : ३००० फूट 

डोंगररांग : लोणावळा 

जिल्हा : पुणे 

श्रेणी : मध्यम 


गडावर जाण्याच्या वाटा: कोरीगडला जाण्यासाठी लोणावळ्याला यावे. येथून आयएनएस शिवाजीमार्गे आंबवणे किंवा भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा (ऍम्बी व्हॆली) सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी आणि भुशी धरणाच्या पुढे, (आयएनएस शिवाजीच्या) पुढे १६ कि.मी वरील पेठशहापूर गावात उतरावे. या गावातून सरळ जाणारी पायवाट आपल्याला पायर्‍यांपाशी घेऊन जाते. पायर्‍यांच्या सहाय्याने पाऊण तासात गडावर पोहोचता येते.


पेठशहापूर गाव बाहेर मुख्य रस्त्यावर वहानतळ उभारलेला आहे. या वहानतळच्या पुढे २ मिनिटे चालत गेल्यावर डाव्या बाजूला एक ठळक पायवाट दिसते. या पायवाटेने १० मिनिटे चढल्यावर आपण सपाटीवर येतो. येथून किल्ल्याला वळसा घालून जंगलातील पायवाटेने १० मिनिटात पायर्‍यांपाशी पोहोचता येते. पायर्‍यांच्या सहाय्याने २० मिनिटात गडावर पोहोचता येते.


राहण्याची सोय : गावातील मंदिरांमद्धे राहण्याची सोय होऊ शकते 

जेवणाची सोय : जेवणाची सोय किल्ल्यावर नाही 

पाण्याची सोय : पिण्याच्या पाण्याचा साथ बाळगल्यास उत्तम 

पायथ्याचे गाव: पेठ शहापूर 

वैशिष्ट्य : दोन खांबांवर तोल धरून असलेली गुहा बघण्यासारखी आहे 

Post a Comment

0 Comments