Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले खांदेरी (रायगड) || Khanderi Fort Raigad || Khanderi Marathi Information

 किल्ले खांदेरी (रायगड) || Khanderi Fort Raigad || Khanderi Marathi Information


सह्याद्रीतील भटक्या ट्रेकर्सला ऐकून सुपरिचित असलेली परंतु या सर्व ट्रेकर्सपैंकी अत्यंत कमी जणांनी प्रत्यक्ष पाहिलेली जलदुर्गांची जोडगळी म्हणजेच किल्ले खांदेरी - उंदेरी. समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने उभे असणार्‍या खांदेरी - उंदेरीचे वैशिष्टय म्हणजे मजबूत तटबंदी, उंदेरीवर असणार्‍या १५-१६ तोफा, तर खांदेरीवरच्या अत्यंत दुर्मिळ अशा तोफांना वाहून नेणार्‍या गाड्यासहीत असणार्‍या ३ तोफा होय.

किल्ल्याचा प्रकार :  जलदुर्ग 

किल्ल्याची ऊंची : ० 

डोंगररांग : किल्ल्याला डोंगररांग नाही 

जिल्हा : रायगड 

श्रेणी : मध्यम 


गडावर जाण्याच्या वाटा: खांदेरी - उंदेरी या जलदुर्गांवर जाण्यासाठी आपल्याला अलिबागला जावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ किमी अंतरावर "थळ" नावाच्या गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून २ ते ३ किमी वर "थळ" गाव आहे. अलिबागहून येथपर्यंत येण्यासाठी एसटी बस उपलब्ध आहेत. थळ बाजारपेठे जवळून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात. अलिबागहून थळ आगाराकडे जाणार्‍या एसटी ने ही आपण बाजारपेठेकडे जाणार्‍या फाट्यावर उतरून चालत येथ पर्यंत येऊ शकतो.थळ बाजारपेठे जवळच्या समुद्रकिनार्‍याहून दिसणारी दोन बेटे आपले लक्ष सहज वेधून घेतात. यापैंकी जवळ असणारा किल्ला म्हणजे उंदेरी व डाव्याबाजूला थोड्या लांब असणारा किल्ला म्हणजे खांदेरी होय. खांदेरी किल्ला त्यावर असणार्‍या दिपगृहामुळे लगेच लक्षात येतो. थळ बाजारपेठेच्या ठिकाणी सकाळी लवकर येणे सोईस्कर अन्यथा किनार्‍यावरील बोटी मासेमारी करण्यासाठी सकाळी ६ , ६.३० च्या आत समुद्रात जायला निघतात. उशीरा पोहोचल्यास मासेमारी करून येणाया बोटी आपल्याला मिळू शकतात.


राहण्याची सोय किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.

जेवणाची सोय जेवणाची सोय आपण स्वत: करावी.

पाण्याची सोय खांदेरीवर पिण्याचे पाण्याचे टाके आहे. उंदेरीवर पाणी अजिबात नाही.

पायथ्याचे गाव: थळ 

वैशिष्ट्य : बोटीने जात असताना खांडेरीची बांधणी आणि तटबंदी बघण्यासारखी आहे . 


Post a Comment

0 Comments