किल्ले केंजळगड (सातारा)
केंजळगड हा तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगांच्या एका उत्तुंग नाकाडावर उभारलेला आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरतांना नैऋत्य दिशेला लांबवर एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देत असतो. केळंजा व मोहनगड ही केंजळगडाचीच उपनावे आहेत.
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
किल्ल्याची ऊंची : 4269 फूट
डोंगररांग : महाबळेश्वर
जिल्हा : सातारा
श्रेणी : मध्यम
गडावर जाण्याच्या वाटा: भोरहून सकाळी साडेसात वाजता कोर्ले या गावी जाण्यासाठी एस्टी बस येते. तासाभरात बस कोर्ल्याला पोहोचते. तेथून पश्चिमेला केंजळचा मार्ग जातो. तर उत्तरेला रायरेश्वराचे पठार दिसते. भोरहून आंबवड्याला दिवसातून दहा बसेस येतात. आंबवड्याला उतरूनही कोर्ल्याला पायी ( साधारण ६ कि.मी ) जाता येते. चिखलवडे, टिटेघरकडे येणार्या एसटी नेही कोर्ले गाठता येते. कोर्ल्याहून गडावर दोन तासात पोहचता येते.
खाजगी वहानाने कोर्ले गावापुढील केंजळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीतील केंजळीदेवी मंदिरापर्यंत जाता येते. तेथून ठळक पायवाटेने पाऊण तासात गडावर जाता येते.
राहण्याची सोय :गडावर राहण्याची सोय नाही
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी
पाण्याची सोय : गडावर पाण्याची उपलब्धता आहे
पायथ्याचे गाव: खावली
वैशिष्ट्य : गडाची तटबंदी आणि घनदाट जंगल बघण्यासारखे आहे
0 Comments