Ticker

6/recent/ticker-posts

कल्याणगड (सातारा)

कल्याणगड (सातारा )

कल्याणगड हा सातारा विभागात मोडणारा किल्ला आहे. कल्याणगडाचेच दुसरे नाव म्हणजे ’नांदगिरीचा किल्ला’ असे आहे. सातार्‍यापासून अर्ध्या दिवसात हा किल्ला आपण पाहून येऊ शकतो. या परिसरातील किल्ले हे मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर विराजमान झालेले आहेत. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्यावर असलेली व लांबलचक पसरलेली गुहा होय. फेब्रुवारी - मार्च पर्यंत या गुहेत पाणी असते. गुहेतील मिट्ट काळोखात, गुढगाभर गार पाण्यातून गुहेच्या टोकापर्यंत (दत्त पादुकांपर्यंत) जाण्याचा थरार या किल्ल्यावर अनुभवता येतो

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग 
किल्ल्याची ऊंची : ३५०० फुट 
डोंगररांग : सातारा 
जिल्हा : सातारा 
श्रेणी : मध्यम 

गडावर जाण्याच्या वाटा: किल्ल्यावर जाण्यास एकच वाट आहे. ही वाट पायथ्याच्या नांदगिरी (धुमाळवाडी) गावातून वर येते. सातारा एसटी स्थानकावरून सातारा रोडला जाणारी गाडी पकडावी. सातारारोड ते नांदगिरी हे ३ कि.मीचे अंतर आहे. येथून किन्हईकडे जाणारी बस पकडावी किंवा एकदम सातारा ते किन्हई बसने नांदगिरीला उतरावे. गावातून गडावर जाण्यासाठी ठळक पायवाट आहे. या वाटेने कल्याणगडावरील गुहेपर्यंत जाण्यास ४५ मिनिटे लागतात.

राहण्याची सोय : गडावरील हनुमान मंदिरात राहण्याची सोय होऊ शकते 
जेवणाची सोय : गडाखालील गावात जेवणाची सोय होऊ शकते 
पाण्याची सोय : पाणी उपलब्ध आहे 
पायथ्याचे गाव: नांदगिरी 
वैशिष्ट्य : पाण्याचे दोन खांबी टाक बघण्यासारख आहे 




Post a Comment

0 Comments