Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले खैराई(नाशिक)

 किल्ले खैराई(नाशिक)त्र्यंबकेश्वर हा घाटांचा प्रदेश. कोकणातून जव्हारमार्गे गुजरातेत जाणाऱ्या घाटांवर लक्ष ठेवण्यासाठी खैराई आणि सोनगीर या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. खैराई पासून जव्हारकडे उतरणारा घाट हा साधारण १५ किमी आहे. प्रामुख्याने या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी खैराई किल्ल्याचा वापर केला जात असे. इसवीसन १६७६ मध्ये छ. शिवाजी महाराजांनी खैराई किल्ला जिंकून घेतला.

किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग 
किल्ल्याची ऊंची : २२९६ फूट 
डोंगररांग : पेठ , नाशिक 
जिल्हा : नाशिक 
श्रेणी : कठीण 

गडावर जाण्याच्या वाटा: किल्ल्यावर जाण्यासाठी पायथ्याच्या साट्याचा पाडा या गावात यावे लागते. साट्याचा पाड्यात जाण्यासाठी नाशिक मार्गे हरसूल या गावी जावे. हे अंतर साधारण ५२ किलोमीटरचे आहे. हरसूल पासून १० किमी वरील खैरपाली गाव गाठावे. हे अंतर १४ किलोमीटर आहे. येथे वाहन ठेवून आपण चालत १० मिनिटात साट्याचा पाडा या गावी पोहोचतो. या भागात एसटी आणि खाजगी गाड्यांची सोय कमी असल्याने शक्यतो प्रवास खाजगी वाहनाने करावा.

राहण्याची सोय : किल्ल्यावर राहण्याची सोय नाही 
जेवणाची सोय : जेवणाची सोय किल्ल्यावर नाही 
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे 
पायथ्याचे गाव: साट्याचा पाडा 
वैशिष्ट्य : पाण्याची ३ टाकी वैशिष्ट्यपूर्ण आहे 


Post a Comment

0 Comments