Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातील शिमला ऑफिस या नावामागे दडलेल्या गोष्टी आणि इतिहास || Story behind Name of Shimla Office Pune

पुण्यातील शिमला ऑफिस या नावामागे दडलेल्या गोष्टी आणि इतिहास || Story behind Name of Shimla Office Pune

अनेकांना वाटत असेल की हिमाचल प्रदेश मधील हे सिमला आज पुण्यामध्ये शिमला ऑफिस नावाने कस काय? खरं सांगायचं झालं तर हे शिमला ऑफिस त्या हिमाचल प्रदेश मधील सिमला सोबतच रिलेट करतात. 

पुण्यातील सिमला ऑफिस या नावामागे दडलेल्या गोष्टी आणि इतिहास || Story behind Name of Simla Office Pune

तुम्हाला जर या शिमला ऑफिस नावा मागील दडलेली गोष्ट जाणून घ्यायची असेल तर आजचा हा लेख पूर्णपणे वाचा. 

शिमला ऑफिस नक्की कोठे आहे? - Where is Shimla Office Located? 

जुनं भाम्बुर्डा म्हणजेच सध्याच्या शिवाजीनगर मध्ये पुणे विद्यापीठ रस्त्यावर शिमला ऑफिस स्थित आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानक वर जाण्यासाठी जो मार्ग आहे त्याच चौकात हे ऑफिस स्थित आहे. 


शिमला ऑफिसचा इतिहास - History of Shimla Office

भारतात सवाई जयसिंग यांचे नाव हे हवामान अभ्यासाच्या तंत्रासंबंधित नेहमी घेतले जाते. चेन्नई येते ब्रिटिश काळात भारतात खगोलशास्त्रीय वेधशाळा सुरू करण्यात आली होती.

कोलकाता आणि कुलाबा येथे पुढील काळात वेधशाळा सुरू करण्यात आल्या. आज आपण जे आय एम डी म्हणजेच इंडीयन मीटरोलोजिकल डिपार्टमेंट आहे त्याची स्थापना 1875 मध्ये झाली. आपण याच विभागाला भारतीय हवामान विभाग म्हणून ओळखले जाते. 

सिमला या उत्तर भारतातील ठिकाणावरून हवामान अंदाज तेव्हा येत होते. पुढे जाऊन शिमला हेच ठिकाण आय एम डी चे मुख्यालय झाले.

शिमला हे ठिकाण डोंगराळ होते. कामाचा वाढता व्याप लक्षात घेता त्यावेळी असलेले महासंचालक सर गिल्बर्ट वॉकर यांनी हे ठिकाण पुण्यासारख्या मैदानी प्रदेशात आणण्याची मागणी केली. 

मुंबई सरकारने त्यावेळी सिमलाचा हा विभाग पुण्यामध्ये आणण्यास परवानगी दिली. आजच्या छत्रपती शिवाजीनगर मध्ये या इमारतीसाठी 10 एकर जागा घेण्यात आली.

1 एप्रिल 1928 रोजी भारतीय हवामान विभाग हे दिल्लीला हलविण्यात आले. तोपर्यंत हीच वास्तू हवामान विभागाचे राष्ट्रीय मुख्यालय होते. 


शिमला ऑफिस पुणे बांधकाम - Construction of Shimla Office Pune

वास्तु कशी असावी याची रचना असलेला आराखडा हा मेसर्स स्टिव्हन्स अँड पार्टनर या संस्थेने दिला होता. पालनजी अँड एदुलजी सन या कंपनीने बांधकामाचे कार्य केले. 

1926 मध्ये हे बांधकाम कार्य सुरू झाले. 20 जुलै 1928 रोजी शिमला ऑफिस म्हणजेच पुणे वेधशाळा या ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले. बांधकामाचा खर्च हा 9 लाख 50 हजार रुपये इतका होता. 

मुंबईचे त्या वेळी असलेले गव्हर्नर सर लेल्सी विल्सन यांनी या इमारतीचे उद्घाटन केले. पुणेकरांसाठी ही पुणे वेधशाळा नसून शिमला ऑफिस च आहे कारण शिमला वरून वेधशाळा या इमारतीत आली होती. 


शिमला ऑफिसची रचना - Structure of Shimla Office Pune

शिमला ऑफिसच्या बाहेर सफेद रंगाचे दगड वापरून कमान बनविलेली आहे. आतील वास्तू ही काळा दगड वापरून बांधलेली आहे. शिमला ऑफिस हे गौथिक शैलीत आहे. 

इमारतीच्या मध्ये तुम्हाला एक दिशादर्शक घड्याळ असलेला मनोरा बघायला मिळेल. इमारतीच्या समोरच हिरवाई ने नटलेला सुंदर परिसर आहे. 


शिमला ऑफिस कधी बघता येते? - When can we visit Shimla Office?

28 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि 23 मार्च म्हणजेच राष्ट्रीय हवामान दिवस  या दोन मुख्य दिवशी आपल्याला शिमला ऑफिस आतमध्ये जाऊन बघता येते. 


शिमला ऑफिस जवळ गेल्यानंतर आपल्याला थंडी जरी वाजत नसली तरी देखील इमारतीकडे बघून मात्र आपण हवामानाचा अंदाज नक्की लावू शकतो… (बाहेरील बोर्ड बघून)

Post a Comment

0 Comments