Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातील लकडी पुलाच्या नावामागे दडलेली गोष्ट || Story Behind Name Lakdi Pul Pune

पुण्यातील लकडी पुलाच्या नावामागे दडलेली गोष्ट || Story Behind Name Lakdi Pul Pune

पुण्यातील झेड ब्रीज तर अनेकांना ओळखीचा… म्हणजे माणूस पुण्यातील असो किंवा नसो सर्वांना तो माहिती असतोच. मात्र त्याच्याच शेजारी असलेला मुख्य पुल देखील अनेकांना त्याच्या नावामुळे आकर्षित करत असतो. 

पुण्यातील लकडी पुलाच्या नावामागील गोष्ट || Story Behind Name Lakdi Pul Pune

पुण्याने महाराष्ट्राला दिलेल्या महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे पहिले तर पु. ल. आणि दुसरे म्हणजे नद्यांवरील पुल… नद्यांवरील या पुलाना नावाच्या मागे अनेक रंजक गोष्टी आणि इतिहास असल्याने पुण्यातील प्रत्येक पुलाला काहीतरी वेगळं नाव तुम्हाला बघायला मिळेल. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यात डेक्कन चौक आणि अल्का चौक या दोन मुख्य चौकाना जोडणारा पूल… लकडी पुल. आज आपण या लकडी पुलाच्या नावा मागील गोष्ट आणि इतिहास जाणून घेणार आहोत. (information about Lakdi Pul Pune in Marathi)

लकडी पुल पुणे - नक्की कुठे आहे? Lakdi Pul Pune is located at

अल्का चौक आणि डेक्कन चौक या पुण्यातील मुख्य दोन चौकांना जोडणारा पूल म्हणजे लाकडी पूल होय. मुठा नदीवर असलेला हा पुल आज मजबूत बनवलेला असला तरी देखील याचे नाव आजही लकडी पुलच आहे. 

आज लकडी पुलाला छत्रपती संभाजी महाराज पुल या नावाने ओळखले जाते. मात्र खूप कमी लोक हे नवीन नाव वापरतात. 


लकडी पुल नावामागील इतिहास - History Behind Name Lakdi Pul Pune

मराठ्यांच्या इतिहासात पानिपत ही घटना अगदी महत्वाची आहे. 1761 मध्ये झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा खूप वेदनादायक होता. नानासाहेब पेशवे म्हणजेच बाळाजी बाजीराव यांना या युद्धातील पराभव जिव्हारी लागला आणि त्यांची प्रकृती बिघडली. 

या काळात पुण्यात प्रवेशासाठी कुंभारवेशीचा एकमेव पुल मुठा नदीवर होता. पुण्यातील कुंभार वेशीच्या जवळचा आज उभा असलेला डेंगळे पुल हाच तो कुंभारवेशीचा पुल असावा अशी शक्यता वाटते. याच पुलावरून त्या काळात पुण्यात विजयी फौजा प्रवेश करत होत्या. 

पराभूत झालेल्या फौजा इथून येऊ नयेत यासाठी नानासाहेबांना वाटले की दुसरा एक पुल असावा. त्यामुळे त्यांनी नवीन पुल लवकरात लवकर बांधण्याच्या आज्ञा दिल्या असे सांगितले जाते. मात्र याला इतिहासात पुरावा नसल्याने हा इतिहास आपण गोष्ट रूपानं घेऊयात. 

इतक्या घाईत दगड चुन्याचा वापर करून पुल बांधणे तसे कठीण असल्याने त्यातल्या त्यात लाकडाचा वापर करून जर पुल बांधला तर तो लवकर होईल म्हणून हा पुल लाकडांचा वापर करून बांधण्यात आला. 

इतिहासाची सांगड घालता असे लक्षात येते की पुण्याच्या दुसऱ्या बाजूला मुठा नदीवर पुण्यात प्रवेश करण्यासाठी आणखी एक पुल असणे गरजेचे होतें त्यामुळेच कदाचित नानासाहेब पेशवे यांनी हा पुल बांधण्याचा निर्णय घेतला असावा. पुलाची निर्मिती पूर्णपणे तेव्हा लाकडात केली असल्याने पुलाला नाव लकडी पुल देण्यात आले. 


लकडी पुलाचा इतिहासातील उल्लेख - Historical mentions about Lakdi Pul Pune 

लकडी पुलाची नोंद पुरंदरे दफ्तर भाग 3 मध्ये आहे ती खालीलप्रमाणे -

"श्रीमंत निघोन वैशाख मासी घरास आले. नडगेमोडीस (आजचा अल्का चौक आणि पूना हॉस्पिटल परिसर) लाकडी पूल बांधवयास काम लावले. नित्य पुलाचे कामावर स्वारी जात असतां तिसा दिवसांत पुल तयार केला."


नडगेमोडी - आज आपण जिथे पुना हॉस्पिटल बघतो आहे आणि अल्का चौक आहे त्याच्या बाजूचा मुठा नदीपात्र हा परिसर नडगेमोडी म्हणून ओळखला जात होता. याच परिसरात नानासाहेब पेशवे यांची समाधी देखील नदीपात्रात आहे. 


लकडी पुलाची रचना आणि इतिहास - History and Structure of Lakdi Pul Pune

लकडी पुल बांधला तेव्हा त्याची रुंदी ही 15 फुटांच्या आसपास होती. पुढे 1840 मध्ये हा लाकडी बनावट असलेला पुल कोसळला. त्याची पुनर्बांधणी देखील लगेच करण्यात आली. 

1950 च्या दरम्यान पुलाचे बांधकाम पुन्हा केले गेले. आता पुलाची रुंदी ही 76 फूट झाली होती. 1950 मध्ये हे काम मोरारजी देसाई यांच्या उद्घाटन समारंभाने सुरू झाले. पुढे 1952 मध्ये हा पुल पूर्ण झाला. 

पानशेत दुर्घटनेत पुलाचे नुकसान झाले मात्र पुणे महानगरपालिकेने पुलाचे पुन्हा बांधकाम केले. 


इतकी वर्ष उलटून सुद्धा आणि बांधणी शैली बदलून देखील आजही हा पुल लकडी पुल या नावानेच ओळखला जातो आहे. 

Post a Comment

0 Comments