Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नावामागे दडलेली गोष्ट आणि इतिहास || Story Behind the Name Fergusson College Pune

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नावामागे दडलेली गोष्ट आणि इतिहास || Story Behind the Name Fergusson College Pune

फक्त पुण्यातील नव्हे तर भारतातील उच्च दर्जाच्या शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या यादीत एक महत्वाचं नाव म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय होय. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याच्या बाजूला असलेलं हे कॉलेज… काय सांगता हा रस्ता तुम्हाला माहितीच नाही? 

एफ सी रोड माहीत आहे का? हा तर मग हाच आहे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता! चला तर मग आज याच एफ सी रोडच्या बाजूला असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयच्या नावामागे दडलेली गोष्ट आणि इतिहास जाणून घेऊयात. 

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या नावामागे दडलेली गोष्ट आणि इतिहास || Story Behind the Name Fergusson College Pune

फर्ग्युसन कॉलेजच्या सुरुवातीचा इतिहास - History Behind Start of Fergusson College Pune

सध्याच्या ए बि सी मध्ये 1 जानेवारी 1880 रोजी मोरोबा दादा फडणीस यांच्या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू झाले. यासाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, महादेव बल्लाळ नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर या मंडळींनी पुढाकार घेतला. 

यातूनच पुढे जाऊन 14 ऑक्टोबर 1884 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आता एक स्वायत्त विद्यापीठ बनत आहे तिची स्थापना झाली. याच संस्थेच्या माध्यमातून पुढे अनेक महाविद्यालय निर्माण केले गेले. आजही पुण्यात DES कडून चालविली जाणारी विद्यालये आणि महाविद्यालये उत्तम प्रकारे कार्यरत आहेत.

त्यावेळी मुंबई भागाचे गव्हर्नर हे सर जेम्स फर्ग्युसन हे होते. खाजगी संस्थांना उत्तेजन देण्याचे ध्येय त्यावेळी त्यांच्यासमोर होते. त्यामुळे नवीन महाविद्यालय उभारण्यासाठी मुंबई विद्यापीठाने लगेच मान्यता दिली. फर्ग्युसन महाविद्यालय चे सर फर्ग्युसन हेच पहिले आश्रयदाते असल्याने त्यांचे नाव डेक्कन एड्युकेशन सोसायटीच्या पहिल्या महाविद्यालयास देण्यात आले. 


फर्ग्युसन महाविद्यालय ची सुरुवात - Start and Establishment of Fergusson College Pune

आपण आज जिथे फर्ग्युसन महाविद्यालय बघतो आहे तिथे ते आधी नव्हते. 2 जानेवारी 1885 रोजी महाविद्यालयाची सुरुवात ही गद्रे वाड्यात झाली. विद्यालयाचे उद्घाटन देखील ब्रिटिश अधिकारी आणि मुंबई मधील एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य कवी वर्डस्वर्थ यांचे नातू असलेल्या विल्यम वर्डस्वर्थ यांच्या हस्ते झाले. 

फर्ग्युसन महाविद्यालय चे पहिले प्राचार्य हे वामन शिवराम आपटे हे होते. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची सूत्रे सांभाळली. आपण नामदार गोपाळ कृष्ण गोखले आणि महर्षी धोंडो केशव कर्वे ही नवे नक्की ऐकलेली असतील. या दोन थोर व्यक्ती देखील प्राध्यापक म्हणून सुरुवातीच्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयात कार्यरत होत्या. 


फर्ग्युसन महाविद्यालयाची सध्याची इमारत - Current Building of Fergusson College Pune

सध्याचे छत्रपती शिवाजीनगर म्हणजेच त्याकाळी असलेले भांबवडे गावाच्या पाटलांनी महाविद्यायासाठी मदत केली. राजाराम नारोजी शिरोळे असे त्यांचे नाव. त्यांनी महाविद्यालयासाठी 36 एकर जागा ही करार तत्वावर 99 वर्षांसाठी दिली. त्याच जागेवर आज फर्ग्युसन महाविद्यालय ही इमारत उभी आहे. 

रावबहाद्दर वासुदेव बापूजी कानिटकर यांनी आज उभ्या असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे बांधकाम केले आहे. इमारत बांधण्यासाठी तेव्हा निधी गोळा केला जात होता. त्यामध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मोलाचे योगदान आजही आपल्याला विसरता येत नाही. त्याकाळी बांधकामासाठी 87 हजार 500 रुपये इतका खर्च आल्याची नोंद आजही आपल्याला इतिहासात सापडते. 

आज आपण मेन बिल्डिंग नावाने महाविद्यालयाची जी इमारत बघतो आहे तिचे उद्घाटन हे 27 मार्च 1895 रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. 


फर्ग्युसन महाविद्यालय पोस्ट तिकीट - Post Ticket of Fergusson College Pune

वर्ष 1995 म्हणजे फर्ग्युसन महाविद्यालय ची शंभरी! भारत सरकार आणि भारतीय डाक सेवा यांनी गौरव म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे चित्र असलेले पोस्ट तिकीट सुरू केले. 


फर्ग्युसन महाविद्यायातील अँफी थियेटर - Amfi Theater of Fergusson College Pune

मुख्य इमारतीच्या बांधकामात महाविद्यालयात असलेले अँफी थियेटर बांधण्यात आलेले नव्हते. 1912 साली अँफी थियेटर बांधले गेले आणि आज हे ठिकाण अनेक ऐतिहासिक व्याख्यानांची साक्ष देत सुरूच आहे.


फर्ग्युसन महाविद्यायातून शिक्षण घेऊन अनेक थोर विचारवंत, लेखक, अभिनेते, खेळाडू , वैज्ञानिक आपापल्या क्षेत्रात उच्च स्थानांवर कार्यरत आहेत. आजही हे महाविद्यालय विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य करत आहे. 

फर्ग्युसन महाविद्यालय आता स्वायत्त विद्यापीठ झाले असून ते आता पुणे विद्यापीठाच्या संलग्न न राहता स्वायत्त पने कार्यरत असण्यास तयार आहे…

Post a Comment

0 Comments