Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यातील अप्पा बळवंत चौक या नावामागे दडलेली गोष्ट आणि इतिहास || Story Behind the Name Appa Balwant Chowk (ABC) Pune

पुण्यातील अप्पा बळवंत चौक या नावामागे दडलेली गोष्ट आणि इतिहास || Story Behind the Name Appa Balwant Chowk (ABC) Pune

पुणे शहरामध्ये चौकांची नावे आणि त्या चौकांमध्ये असलेल्या गोष्टी यावरून त्या परिसराची ओळख तयार झालेली आहे. यातील अनेक चौकांमध्ये पुणे शहराचे केंद्र समजल्या जाणाऱ्या एबिसी चे स्थान मोलाचे आहे. जवळच असलेला दगडूशेठ, वाटेत असणारी तांबडी जोगेश्वरी ग्रामदेवता यामुळे तर हा चौक मुख्य आकर्षण आहेच मात्र पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात असलेल्या स्पर्धा परीक्षा आणि वाचन वेड्यांसाठी एबीसी म्हणजे पुस्तकांचा खजिनाच!

पुण्यातील अप्पा बळवंत चौक या नावामागे दडलेली गोष्ट आणि इतिहास || Story Behind the Name Appa Balwant Chowk (ABC) Pune

आज आपण याच एबिसि म्हणजेच अनेकांसाठी असलेला ABC चौक (चुकीचं असल तरी अनेक लोकांच्या तोंडात FC कॉलेज प्रमाणे ABC चौक हमखास ऐकायला मिळते) म्हणजेच अप्पा बळवंत चौक या नावामागील गोष्ट आणि इतिहास जाणून घेणार आहोत. 


अप्पा बळवंत चौक विषयी माहिती - Information about Appa Balwant Chowk in Marathi

पुण्याकडून म्हणजेच अलका चौक कडून जेव्हा आपण दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला वाटेमध्ये तांबडी जोगेश्वरी च्या आधी जो चौक लागतो तो म्हणजे आप्पा बळवंत चौक. 

एकदा या वाटेवरती तुम्हाला पुस्तकांची स्टेशनरीचे दुकाने दिसायला लागले की समजून जायचं तुम्ही अप्पा बळवंत चौकाच्या जवळपास पोहोचला आहात. चौकातून पुढे गेलं की तुम्हाला पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरीच्या मंदिराचे दर्शन होईल. पुढे गेलात तर पुण्यातील महत्वाचे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर देखील बघायला मिळेल. 

या परिसरात हुजूरपागा, नूतन मराठी विद्यालय या पुण्यातील मुख्य वास्तू देखील बघता येतील.


अप्पा बळवंत नक्की कोण होते - Who was Appa Balwant?

आपण सर्वात आधी हे अप्पा बळवंत नक्की कोण होते हे जाणून घेऊयात. अप्पा बळवंत यांचे खरे नाव हे कृष्णाजी बळवंत मेहेंदळे होय. बळवंतराव मेहेंदळे हे अप्पांच्या वडिलांचे नाव. गणपतराव हे अप्पा बळवंत यांचे आजोबा होते. 

बळवंतराव हे पेशव्यांकडे एक प्रमुख सेनापती म्हणून कार्यरत होते.बळवंतराव हे पेशवे सैन्यातील एक पराक्रमी विर म्हणून ओळखले जात. बळवंतराव यांच्या कारकिर्दीतील पराक्रम हा अखेरीस पानिपतच्या रणसंग्रामात शेवट झाला. बळवंतराव यांच्या पत्नी त्यावेळी सती गेल्याची नोंद इतिहासात सापडते.

अप्पा बळवंत तेव्हा खूप लहान होते. त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ही पूर्णपणे पेशव्यांनी घेतली. 


अप्पा बळवंत चौकाच्या नावाच्या मागे असलेली आख्यायिका - Story Behind Name Appa Balwant Chowk

अप्पा बळवंत चौक हे नाव एका आख्यायिकेनुसार खालील प्रमाणे पडलेले आहे,

एकदा सवाई माधवराव पेशवे हे पर्वती या ठिकाणावरून शनिवारवाड्याकडे जात होते. पेशवे त्या काळात हा प्रवास हत्ती वरून करत होते. त्यांचा हा प्रवास सध्याच्या अप्पा बळवंत चौकातून जाणार होता. पेशवे अंबारीतून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत काही खाजगी व्यक्ती सोबत असत. त्यावेळी अप्पा बळवंत हे सवाई माधवराव यांच्या सोबत होते. अचानक सवाई माधवराव यांना भोवळ आली आणि ते खाली पडणार इतक्यात अप्पा बळवंत यांनी प्रसंगावधान राखत त्यांना सावरले. 

अप्पा बळवंत यांच्या प्रसंगावधानामुळे आज सवाई माधवराव यांचा जीव वाचला. त्यामुळे पेशव्यांनी त्या जागेला अप्पा बळवंत यांचे नाव जाहीर केले. 


मेहेंदळे वाडा - Mehendale Wada in Appa Balwant Chowk

पूर्वी अप्पा बळवंत चौकात प्रभात चित्रपट गृह होते. आता त्याच ठिकाणी किबे लक्ष्मी चित्रपटगृह आहे. त्याच्या अगदी समोरच पूर्वी मेहेंदळे यांचा वाडा होता. त्या वाड्याचे स्वरूप म्हणजे हा तीन मजली , चार चौकात विभागलेला हा वाडा. 

आज वाडा पूर्णपणे आता पडला आहे. आज वाड्याच्या दरवाजावर आता फक्त एक गणेशपट्टी शिल्लक आहे.


आज मेहेंदळे यांचा वाडा जरी शिल्लक नसला तरी अप्पा बळवंत यांचे नाव मात्र अप्पा बळवंत चौक या निमित्ताने मात्र संपूर्ण राज्यात जिवंत आहे.

Post a Comment

0 Comments