Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवरायांचे बालपणीचे वास्तव्य | Chatrapati Shivaji Maharaj Childhood Abode

छत्रपती शिवरायांचे बालपणीचे वास्तव्य | Chhatrapati Shivaji Maharaj Childhood Abode


छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी येथे झाला हे सर्वांना माहीत आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यातील लाल महालात त्यांचे बालपण घालविले आणि पुढे मावळ प्रांतात त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. हे तीन प्रसंग कदाचित सर्वांना माहिती असतात मात्र शिवजन्म ते रायरेश्वर येथे घेतलेली स्वराज्य स्थापनेची शपथ हा कालखंड बहुतेक लोकांना माहिती नसतो.

छत्रपती शिवरायांचे बालपणीचे वास्तव्य | Chatrapati Shivaji Maharaj Childhood Abode

आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊयात की शिवरायांचा जन्म शिवनेरी येथे झाल्यापासून त्यांचा स्वराज्य स्थापनेच्या शपथ घेण्यापर्यंतचा प्रवास नक्की कसा होता. कारण स्वराज्याच्या निर्मितीच्या आधीची ही पूर्वतयारी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक नक्की असेल.

(माहिती आभार - मराठेशाही प्रवीण भोसले सर)

थोडक्यात शिवरायांचे बालपण (Shivray Childhood Life in Short)

(इ. स. 1630 ते 1645)

काळ

राहण्याचे ठिकाण

1630 ते 1632

शिवनेरी गडावरील वाड्यात

1632 ते 1634

जाधवराव वाडा सिंदखेड राजा

1634 ते 1636

शिवनेरी गडावर

1636

काही काळ माहुली गडावर, शहापुर जिल्हा ठाणे

1637 ते 1640

देशपांडे वाडा खेड शिवापूर -> स्वतंत्र वाडा खेड शिवापूर

1640 ते 1642

बेंगलोर येथे शहाजी राजे यांच्या सोबत

1642 ते 1645

पुण्यात लाल महाल आणि खेड येथील वाड्यात वास्तव्य


शिवजन्म - किल्ले शिवनेरी

19 फेब्रुवारी 1630… शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी शिवसुर्यांचा जन्म झाला. जन्म आणि नाव यांचे शिवाई देवीच्या नावाचे संदर्भ तुम्हाला माहिती असतीलच.

शिवनेरी ते सिंदखेडराजा 

पुढील काळात म्हणजे 1632 मध्ये शिवराय फक्त 2 वर्षांचे असताना माँसाहेब जिजाऊ बाळ शिवरायांना घेऊन त्यांचे माहेर असलेल्या सिंदखेड राजा येथे गेल्या. 

(संदर्भ - सिंदखेडकर जाधवराव यांच्या पदरी असलेल्या बजरंग आणि रामसिंग या दोन भाटांच्या कवणातून समजते. हे दोन्ही भाट जाधवराव यांच्या पदरी त्याच काळी होते.) 


भाटांच्या कवणाला महत्व देण्याचे कारण म्हणजे याच दोन भा कवनातून आपल्याला सिंदखेड च्या जाधवराव यांच्या वाड्यातील जिजाऊ यांच्या जन्म ठिकाणाची आणि जन्मतारीख ही महत्वाची माहिती समजली आहे. ते कवन होते,

जगदंब कृपेने झाली मुलगी म्हाळसा राणीला

तीच जिजाबाई प्रसिद्ध सर्वाला

फसली सन 1007 ला, पौष पौर्णिमा सूर्योदयाला

राणी म्हाळसा महालाला, चौकाचे नैऋत्य कोनाला


जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवराय हे सिंदखेड राजा येथे जवळपास 2 वर्षे राहिल्याची माहिती या भाटांच्या कवनातून समजते. 

भाटांनी गायलेले कवन म्हणजे,

राजे जगदेवराव यांनी पत्र लिहिले जिजाबाईला
तुम्ही यावे भेटीला | पत्र वाचून आनंद झाला जिजाबाईला 
बालराजे बरोबर घेऊन आली सिंदखेडराजाला |
गावी येता राजे जगदेव सामोरे गेले
महाली आणण्या जिजाबाई आणि शिवाजी राजाला |
हे घडले 1042 फसलीला
दोन वर्षांचा मुक्काम झाला सिंदखेडराजाला |


सिंदखेड राजा ते शिवनेरी

सिंदखेड राजा येथून मासाहेब जिजाऊ आणि शिवराय शिवनेरीला परत आले. हा काळ होता शहाजी राजे आणि मोघल व आदिलशाही यांच्या लढाईचा. शहाजी राजे या वेळी धामधुमीत व्यस्थ होते. जिजाऊ 1636 सालाच्या सुरुवाती पर्यंत शिवनेरी गडावर सुरक्षिततेच्या कारणास्तव होत्या. 

खान जमान या मुघल सरदाराने शहाजी राजांना शह देण्यासाठी निर्णायक असा वेढा जुन्नर शहराला घातला. 
Badshahnama by Abdul Hamid Lahori

हा वेढा शिवनेरी गडाला पडला होता. वेढ्यात जिजाऊ आणि बाल शिवराय शिवनेरी किल्ल्यावर होते असा उल्लेख सापडत नाही. 

शिवनेरी ते माहुली गड

शहाजी राजे या काळात माहुली या ठाणे जिल्ह्यातील गडावर होते. 
Badshahnama by Abdul Hamid Lahori

शहाजहान चा इतिहास म्हणजेच बादशहानामा किंवा पातशहानामा मध्ये आलेल्या उल्लेखनुसार शहाजी राजे जेव्हा माहुली गडावर गेले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा पुत्र आणि सामान असल्याचा उल्लेख आढळतो. 

वेढा अपडून शिवराय आणि जिजाऊ माँसाहेब त्यात अडकु नयेत ही दूरदृष्टी ठेवून शहाजी राजांनी आधीच त्यांना आपल्या सोबत माहुली गडावर नक्की नेले असावे.

Badshahnama by Abdul Hamid Lahori

माहुली गडाला लगेच पुढील काळात मुघल आणि आदिलशाही सैन्याचा वेढा पडला. खान जमान देखील या वेढ्यात पुढे होता. अफाट सैन्य असल्याने शहाजी राजे यांनी माघार घेतली. 

Badshahnama by Abdul Hamid Lahori

शहाजी राजे पुढे आदिलशाही सरदार झाले. हे सर्व तहानुसार झाले. शहाजी राजांना सरळ विजापूरला जावे लागले. 

माहुली ते खेडेबारे गाव

शहाजी राजे जरी विजापूरला गेले असले तरी देखील त्यांनी राजमाता जिजाऊ आणि बाळ शिवबा यांना त्यांच्या पुणे जहागिरी मध्ये असलेल्या खेडे बारे या गावी ठेवले होते. म्हणजे 1637 साली शिवराय हे खेडेबारे गावी आले. 

शहाजी राजे माहुली वरून शिवनेरी गेल्याचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे शिवराय काही काळ तरी माहुली गडावर असावेत ही शक्यता टाळता येत नाही. 
Khedebare Deshpande's Shivkalin Karina

खेडेबारे येथे शहाजी राजे यांचा वाडा नसल्याने धामधुमीच्या काळात बापूजी देशपांडे यांच्या वाड्यात जिजाऊ आणि शिवराय राहिले. खेडेबारे येथे जिजाऊ यांनी जमीन घेऊन स्वतःचा वाडा बांधला. याच वाड्यात इ. स. 1640 पर्यंत जिजाऊ आणि शिवराय राहिले. 
Khedebare Deshpande's Shivkalin Karina

खेडेबारे ते बेंगलोर 

1640 मध्ये शिवरायांचा विवाह सईबाई यांच्याशी झाला. त्यानंतर लगेच जिजाऊ आणि शिवराय हे सईबाई सोबत(?) शहाजी राजांकडे म्हणजेच बेंगलोरला गेले. पुढील 2 वर्षांचा काळ जिजाऊ आणि शिवरायांना शहाजी राजांच्या सहवासात घालविता आला. 

बेंगलोर वरून पुन्हा पुणे

शिवराय 12 वर्षांचे असताना जिजाऊ आणि शिवरायांना शहाजी राजांनी पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी बेंगलोर वरून पुण्याकडे पाठविले. शिवाजी महाराज यांना इथेच राजाचा मान प्राप्त झाला होता कारण शहाजी राजे यांनी त्यांना एक छोटस मंत्रिमंडळ आणि स्वतंत्र झेंडा देऊन पाठवले होते. 

Shivbharat By Rajkavi Parmanand

पुणे प्रांत हा एका आदिलशाही सरदाराने जाळून नष्ट केलेला होता. जिजाऊ माँसाहेब यांनी पहिले हे सर्व काही पुन्हा वसवले. याच काळात त्यांच्या राहण्यासाठी लाल महाल बांधण्यासाठी सुरुवात झाली. आता महालाचे बांधकाम पूर्ण होत होते तोपर्यंत ते खेड येथे त्यांच्या वाड्यात राहत होते. 


महाराजांनी इथून च पुढे सुरुवात करत मावळ भागातील देशमुख आणि इतर सोबती शोधून स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला. 1645 साली श्री रायरेश्वर मंदिरात महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला. 

Post a Comment

0 Comments