Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले तुंग ऊर्फ कठीणगड - Tung (Kathingad) Fort Information in Marathi

किल्ले तुंग ऊर्फ कठीणगड - Tung (Kathingad) Fort Information in Marathi

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशांपैकी एक प्रदेश म्हणजेच पवन मावळ ! याच पवन मावळ मध्ये वसलेला तुंग! तुंग या किल्ल्यास कठीणगड असेही म्हणतात. 

पूर्वीच्या काळी पवन मावळतील हालचालीवर व बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत. आज याच तुंग किल्ल्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. 

kille tung kathingad fort

गडाचे नाव - तुंग ऊर्फ कठीणगड  (Tung / Kathingad)

किल्ल्याचा प्रकार- गिरीदुर्ग

समुद्रसपाटीपासून उंची - ३५२७ फूट (१०७५ मी) 

चढायची श्रेणी - सोपी 

ठिकाण - तुंग 

तालुका - मावळ 

जिल्हा - पुणे 

तुंग किल्ल्याला भेट द्यायला कसे पोहोचाल? How to reach Tung Fort ? 

किल्ल्यावर थेट वाहतूक उपलब्ध नसल्या कारणाने लोणावळ्या पडून  सार्वजनिक वाहतूक वापरून गडापर्यंत पोहचावे लागते. गडा वर  जाण्यासाठी आधी घुसळखांब हे गाव गाठावे लागेल . या गावापासून गड सुमारे १.५ किमी अंतरावर आहे.  घुसळखांब या गावा पर्यंत स्थानिक बस उपलब्ध असून तेथून पुढे तुंगी या गावा पर्यंत पायी प्रवास करावा लागतो. तुंगी हे गाव गडाच्या मुख्य द्वारापासून 300 मीटर अंतरावर आहे.

तुंग किल्ल्याचा इतिहास - Tung Fort History in Marathi

वैभवशाली परंपरा असलेला हा किल्ला घाट रक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. तुंग किल्ला शंकूच्या आकाराचा असून डोंगराच्या काठावर अतिशय रुंद वाटेने उंच चढण आहे. अंडाकृती आकार, जाड भिंती, असंख्य बुरुज आणि खडकाळ जिना अनेक फूट खाली पाण्याच्या साठा कडे घेऊन जातो. गडाच्या माथ्यावरून लोहगड विसापूर तिकोना आणि कोरीगड हे किल्ले स्पष्ट दिसतात.  

आदिलशहा घरण्यानी १६०० मध्ये बांधले गेलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये तुंग किल्ला स्वराज्यात सामील केला. बोरघाट मार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी तुंग गडाचा उपयोग करण्यात येई. १६६० मध्ये याच भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती करण्यात आली. तुंग किल्ल्याचा उपयोग पूर्वी टेहळणी बुरुज म्हणून करत असे कारण गडाच्या माथ्यावरून पवना आणि मुळशी खोऱ्यातील मावळ भागातील बराच भाग दिसतो आणि त्यामुळे गडाच्या माथ्यावरून या भागांवर लक्ष ठेवता येते . तुंग किल्ल्यामुळे लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांवर आक्रमण होण्याआधीच माहित व्हायचे व त्यामुळे लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांवर रसद पोहोचवणे सोपे जायचे. ६ मे १६६५ मध्ये मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान यांनी आक्रमण करून तुंग आणि तिकोना या किल्ल्यां भोवतालची गावे नष्ट केली. १२ जून १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानुसार २३ किल्ले औरंगजेबाला देण्याचे ठरवल्या नंतर १८ जून १६६५ मध्ये कुबडखानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत हा किल्ला ताब्यात घेतला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात घेऊन १८१८ पर्यंत हा किल्ला मराठा साम्राज्यात होता. त्यानंतर हा किल्ला ब्रिटिशांकडे गेला. 

गडावरील पाहण्यासारखे ठिकाणे- Places to Visit on Fort Tung

१. हनुमान मंदीर- गडाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. 

२. गणेश दरवाजा-  ४०० मीटर चढाई केल्यानंतर एक प्राचीन  प्रवेशद्वार दिसते. ते गोमुखी पद्धतीचे प्रवेशद्वार आहे.

३. हनुमान दरवाजा - गणेश दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर हनुमान दरवाजा दिसतो . या दरवाजाजवळ हनुमान यांची मूर्ती कोरलेली दिसते तसेच दरवाजामध्ये सैनिकांच्या राहण्याची देवडी आहे. 

४. तलाव- प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर एक छोटासा तलाव पाहायला मिळतो पूर्वीच्या काळी या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाई. 

५. गणेश मंदिर-  प्रवेशद्वार ओलांडून किल्ल्याच्या आत आपल्याला एक गणेश मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या मागच्या बाजूस खंदक बघण्यास मिळतो. 

६. सदर - किल्ल्यामध्ये एक इमारत पाहायला मिळते ही इमारत म्हणजेच सदर.  पूर्वीच्या काळी गुप्त खलबत ह्या इमारतीत होत असावी. 

७. तुंगी देवीचे मंदिर - बालेकिल्ल्यावरती हे मंदिर आहे. मंदिरासमोर जमिनीत खोदलेली गुहा दिसते या गुहेमध्ये पावसाळ्याशिवाय इतर ऋतू २-३ जणांची राहायची सोय होऊ शकते.

राहण्याची व जेवणाची सोय 

किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच तुंगवाडीत हनुमान मंदिराजवळ ५ ते ६ जणांना मुक्कामी राहता येऊ शकते. तसेच तेथे भैरोबाचे मंदिर देखील आहे त्यात २ जणांना राहता येऊ शकते. किल्ल्यावर तुंगी देवीचे मंदिरा जवळ खोदलेली एक गुहा आहे या गुहेमध्ये पावसाळ्याशिवाय इतर ऋतूंमध्ये २-३ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. 

तुंगवाडी मध्ये पाणी व जेवणाची सोय उपलब्ध आहे गडावर कोणत्याही प्रकारचे दुकाने किंवा जेवणाची सोय नाही. फक्यर पावसाळ्यात गडावरील टाक्यांमध्ये पाणी उपलब्ध असते.


Post a Comment

0 Comments