Ticker

6/recent/ticker-posts

Shiv Rajyabhishek Sohala 2023 in Marathi || छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 शुभेच्छा संदेश

Shiv Rajyabhishek Sohala 2023 in Marathi || छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 शुभेच्छा संदेश

रायगडी तो सुवर्ण क्षण आला… न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला…डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! 

Shiv Rajyabhishek Sohala 2023 in Marathi || छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 शुभेच्छा संदेश

प्रत्येक वर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपण शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दीन म्हणून साजरा केला जातो. 6 जून 1674 रोजी इतिहासाने हा सुवर्णक्षण रायगडी अनुभवला. 

आज आपण या सुवर्णक्षणी जरी रायगडी जाऊ शकलो नसलो तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देऊन इतिहासाची माहिती आणि या सुवर्णक्षणी गोष्टी पाठवून जनजागृती करू शकतो. 

Shivrajyabhishek Din wishes in Marathi , Shivrajyabhishek Din, Shivrajyabhishek Din Quotes in Marathi, Shivrajyabhishek Din 2023 Messages in Marathi, Shivrajyabhishek Din Status story in Marathi

सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले

रायगडाचे माथे फुलांनी सजले

पाहून सोहळा छत्रपती पदाचा

33 कोटी देवही लाजले

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्या दिवसाची तमाम शिवभक्त पाहत होते वाट

त्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची झाली पहाट

रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट

डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ShivRajyabhishek Din 2023

मराठा राजा माझा म्हणती सारे माझा माझा

आजही गौरव गिते गाती ओवळूनी पंचारती

तो फक्त राजा शिवछत्रपती!

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा

थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास

रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस

मुघलांना वाटत होती ज्यांची भीती

असे आमचे शिवाजी राजे झाले आज छत्रपती

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सिहांसनी होतो आरूढ गर्व मराठ्यांचा

मुजरा तुजला आमचा प्रभो शिवाजी राजा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

न भूतो न भविष्यती असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा

या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा

या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन

शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

एक होऊनी करू उत्सव

शिवराज्याभिषेक दिनाचा

एक विचाराने चालवू वारसा

अवघ्या महाराष्ट्राचा

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,

सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,

शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना  हार्दिक शुभेच्छा!

मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्ता करण्यास

ज्यांनी जन्म घेतला या भुमीवरती

पोवाडे, गौरव गीतांमधून

आज घुमू दे त्यांची कीर्ती आसमंती

शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

1 Comments

  1. अप्रतिम आहेस शुभेच्छा वाचल्यानंतर शिवाजी महाराज किती मोठे राजे होते याची कल्पना येते.

    ReplyDelete