Ticker

6/recent/ticker-posts

केंजळगड - Kenjalgad Fort Marathi

केंजळगड - Kenjalgad Fort Marathi

जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड! केंजळगड, भोरपासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा छोटेखानी किल्ला. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगररांगच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला भोर आहे. हा गिरीदुर्ग आपल्या लक्षात राहातो तो त्याच्या उभ्या कातळात खोदून काढलेल्या ५७ पायऱ्यांमुळे. आज याच केंजळगडा विषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.

गडाचे नाव- केंजळगड (Kenjalgad Fort)

किल्ल्याचा प्रकार- गिरिदुर्ग

समुद्रसपाटीपासून उंची- 1302 मी

चढाईची श्रेणी- कठीण

ठिकाण- केंजळमाची

तालुका- भोर

जिल्हा- 

 केंजळगड - Kenjalgad Fort Marathi


केंजळगडला भेट द्यायला कसे पोहोचाल? - How to reach Kenjalgad Fort?

केंजळगडास भेट देण्यासाठी आपणास प्रथम भोर हे गाव गाठावे लागते. भोरवरुन केंजळगडाच्या पायथ्याच्या कोर्ले गावासाठी दोन - दोन तासाच्या अंतरावर बस आहेत. हा १९ कि.मी. अंतराचा प्रवास करून आपण कोर्ले गावात पायउतार व्हायचे. येथून केंजळ गडाचा टोपीसारख्या आकाराचा डोंगर डोळयासमोर धरून आपण वाटचाल चालू ठेवायची. साधारण दीड तासाच्या वाटचालीनंतर आपण केंजळगडाच्या पायथ्याला असलेल्या केंजळमाची या गावात पोहोचतो. 


इथे असलेल्या मंदिरात तुम्ही मुक्काम करू शकता. मंदिराच्या भोवतीने घनदाट अशी झाडी आहे. गावातून उजव्या हाताने डोंगर चढून वर गेल्यावर आपण सपाटीवर येऊन पोहोचतो. केंजळगड चारी बाजूनी उभ्या कातळकड्यानी बेलाग बनला असून त्यास फक्त उत्तरेकडून रस्ता आहे. येथे आपण पोहोचताच या गडाचे एकमेव वैशिष्टय असलेल्या एवढया उंचीवर अरुंद उभ्या कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या आपणास दिसतात. 

केंजळगड - Kenjalgad Fort Marathi

एका बाजूस उत्तुंग कातळभिंत व दुसऱ्या बाजूस दरी अशी ही ५७ पायऱ्यांची बाट चढताना आपली चांगलीच दमछाक होते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजूंना देवड्याचे अवशेष असून वर आल्यावर पूर्वी दरवाजा होता हे सांगणारे जोते फक्त आपणास दिसतात. गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर बहुतांश ठिकाणी गवताचे माजलेले रान आपणास दिसते. त्यामुळे गडावरून फिरत असताना काळजी घेणे खूप गरजेचे असते.

हे नक्की वाचा- ट्रेकिंगला जाण्याआधीची तयारी, काळजी

वर आल्यावर डावीकडेच एक मध्यम आकाराचे पाण्याचे तळे असून या तळ्यापलीकडेच केंजळाई मातेचे छप्पर नसलेले छोटे देऊळ आहे. गडाच्या पश्चिम बाजूला जाताना वाटेवर आपणास चुना मळण्याच्या घाणीचे रिंगण व दगडी चाक पाहावयास मिळते. यावरून या गडावर शिवकाळात बऱ्यापैकी बांधकामे झाली असावीत असे अनुमान आपल्याला काढता येते. पुढे दगडात बांधलेले दारूकोठाराचे बांधकाम आपल्या नजरेस पडते. 

परतीसाठी आपण पलीकडच्या खवली गावात उतरून तेथून वाई गाठू शकतो किंवा याच डोंगरसोंडेवरुन सरळ दोन तासाभरात रायरेश्वर देवस्थान गाठू शकतो. 

पावसाळा संपल्यानंतर रायरेश्वरच्या पठाराचा सोनकीच्या पिवळ्याधम्मक फुलांनी बहरलेल्या निसर्गाशी गाठ बांधण्याची मजाच काहीशी वेगळी आहे.

इतर ऐतिहासिक ठिकाण

केंजळगड - Kenjalgad Fort Marathi

रोहिडा किंवा केंजळगडाच्या भेटीत आपण वाटेवरील कारी गावातील कान्होजी जेधेचा ऐतिहासिक वाडा तसेच आंबवडे येथील कान्होजी जेधेची व जिवा महालेंची समाधी, शंकराजी नारायण सचिव यांचे सुंदर स्मारक, प्रसिध्द श्री नागेश्वर महादेव मंदिर व झुलता पूल अशी बरीच ऐतिहासिक ठिकाणे पाहाता येतात.

केंजळगड किल्ल्याचा इतिहास- Kenjalgad Fort History

केंजळगडाचा इतिहास पाहायला गेल्यास १२ व्या शतकात पन्हाळयाच्या भोजराजाने हा किल्ला बांधला. पुढे शिवकाळात हा प्राचीन दुर्ग ओस पडला होता. हा ओस पडलेला गड शिवरायांनी १६५ ९ मध्ये बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडून नव्याने वसवून घेतला. त्यानंतर १६६६ मध्ये याचा ताबा आदिलशहाकडे गेला. पण २४ एप्रिल १६७४ रोजी मराठ्यांनी सुलतानढवा करुन केळंजा जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. एलफिन्स्टन नावाचा इंग्रज आधिकारी या किल्ल्याविषयी म्हणतो की "जर हा किल्ला दृढनिश्चयाने लढवला तर तो जिंकणे अशक्य आहे." शिवराय एका पत्रात म्हणतात, - "श्री रोहिडेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हांस यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करुन पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे." असे उद्गार शिवरायांनी ज्या ठिकाणाबद्दल काढले ते रायरेश्वराचे पवित्र गिरीस्थान व केंजळगड असा छोटा ट्रेक तुम्ही सोबत करू शकता.

राहण्याची व जेवणाची सोय

केंजळगड - Kenjalgad Fort Marathi

केंजळमाची गावात एक मुक्कामयोग्य मंदिरही आहे. गडावर मुक्कामाची सोय नसल्यामुळे मुक्काम करायचा झाल्यास ह्या ऐसपैस मंदिरात आपण करू शकतो. जेवणाची सोय देखील या गावात होईल.

Post a Comment

0 Comments