Ticker

6/recent/ticker-posts

दिवाळी किल्ला आणि शिवकाळाशी संबंध || Diwali Forts and Shivaji Maharaj

दिवाळी किल्ला आणि शिवकाळाशी संबंध || Diwali Forts and Shivaji Maharaj

आपल्या सर्वांच्या मनात हे प्रश्न नक्कीच येत असतील की दिवाळीमध्ये किल्ला का केला जात असेल? ही प्रथा शिवकाळात होती का? आज आपण कशामुळे ही प्रथा पडली असावी? 

दिवाळी का साजरी केली जाते? या प्रश्नाला अनेक पौराणिक कथा आणि संबंध आहे. प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत आले तेव्हा पहिली दिवाळी साजरी केली गेली. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला ठार मारले आणि त्यानंतर सर्वदूर उत्सव साजरा केला गेला. सर्वत्र आनंदी आनंद झाला, न्यायाचे राज्य आले. त्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. 

दिवाळी किल्ला आणि शिवकाळाशी संबंध || Diwali Forts and Shivaji Maharaj

महाराजांविषयी अभ्यास करत असताना समकालीन साहित्य योग्य मानले जाते ते म्हणजे कविंद परमानंद गोविंद नेवासकर कृत शिवभारत! तर या शिवभारतात काही दिवाळीत बनविल्या जाणाऱ्या छोट्या किल्ल्यांचा उल्लेख सापडतो. शिवभारतात असलेल्या 7 व्या अध्यायात 27 व्या श्लोकात याविषयी आपल्याला उल्लेख मिळतो. यात स्पष्ट लिहिलेले आहे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या छोट्या सवंगड्यांसोबत मातीचे डोंगर बनवायचे. आणि हे माझे गड किंवा हे माझे किल्ले असे म्हणायचे. असे गडकिल्ले कायम खेळताना बनवले जायचे की फक्त दिवाळीला बनवले जायचे याविषयी शिवभारतात काही मुख्य उल्लेख मात्र नाही.

शिवाजी महाराज आणि दिवाळीतील किल्ले

दिवाळीत किल्ले बांधायची पद्धत कोणी सुरू केली याविषयी मात्र काही संदर्भ सापडत नाही. भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र यांनी अन्यायावर विजय मिळविला आणि सुराज्य आणले त्याप्रमानेच छत्रपती शिवरायांनी जुलमी सत्ताना उघड उघड आवाहन देऊन त्यांना नेस्तनाबूत केले. त्यासोबत हिंदवी स्वराज्य म्हणजे न्यायाचे राज्य आणले. महाराज या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले. महाराजांना या कार्यात निसर्गाने देखील साथ दिली. महाराजांच्या पाठीमागे सागर, सह्याद्री आणि मावळे खंबीरपणे उभे होते. 

सह्याद्री मध्ये अनेक गडकिल्ले आहेत. शिवाजी महाराजांनी हे किल्ले वापरून काही किल्ल्यांची डागडुजी करून काही नव्याने बांधून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. 

शिवाजी महाराज म्हणले की गडकिल्ले हे आलेच. या किल्ल्यांची मदत घेऊनच महाराजांनी अनेक शत्रूंना धूळ चारली. त्यात अफजलखान सारखे बलाढ्य शत्रू देखील महाराजांनी नेस्तनाबूत केले. महाराजांना गनिमीकावा हा पूर्णपणे किल्ल्यांवर आधारित असल्याने किल्ले हे मराठ्यांचे बलस्थान बनले होते. 

दिवाळीत किल्ले बनवायला कोणी सुरुवात केली?

असा उल्लेख आपल्याला स्पष्ट सापडत नाही. मागील शतकात हा प्रकार सुरू केलेला असेल. ज्यांनी कोणी ही प्रथा सुरू केली असेल त्याला आमचा मानाचा मुजरा! 

किल्ले बनवून काय मिळते?

शिवकाळाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला कळेल की किल्ले आपल्याला शिकवतात कणखर कसे राहावे... अतिशय बिकट परिस्थिती मध्ये लढावे कसे... आपल्यासमोर कितीही मोठे संकट उभे राहिले तरी गडकिल्ले हे बुलंद आणि बेलाग उभे होते. 

आपण जेव्हा दिवाळी साजरी करतो तेव्हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण आपल्या समोर राहावी म्हणून हे गडकिल्ले आपण दिवाळी मध्ये बनवत असतो. आपण कितीही पुढे गेलो तरी महाराजांच्या शिकवणी आपल्या मनावर अधिराज्य करत राहतील यात मात्र शंका नसावी. 

Post a Comment

0 Comments