स्वराज्याचे आरमार - भाग १ (The Swarajya's Navy)
"ज्याचे आरमार त्याचा समुद्र", हे शिवाजी महाराजांनी पुरेपूर ओळखले होते. कोकणात स्वराज्याचा विस्तार करताना तिच्या व्यापारावर जर मराठी अंमल हवा असेल तर मराठी आरमार मजबूत हवे, हीच आरमार निर्मितीची धारणा असावी. सुरुवातीच्या काळात थेट समुद्रकिनाऱ्यावरील बंदरे आणि जलदुर्ग हे स्वराज्याच्या ताब्यात नसल्याने समुद्रापासून 40 किलोमीटर आत, वसईच्या खाडीत उल्हास नदीच्या काठावर दुर्गाडी येथे आणि नंतर धरमतर खाडीतून आत भोगावती नदीच्या काठी पेंड येथे शिवरायांनी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली. हिंदुस्थानात नौकानयनाचा आणि समुद्र व्यापाराचा प्राचीन इतिहास होता. पंधराव्या शतकात विशाळगड चे स्वामी शंकरराव मोरे यांचे तीनशे जहाजांचे आरमार होते. नंतरच्या शतकांमध्ये विदेशातून येणाऱ्या कारागिरांच्या अभावामुळे आणि त्या कलेच्या अभावामुळे जहाजांची निर्मिती करण्याची कला लोप पावली. त्यामुळेच या कार्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना युरोपियन तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागली. आरमार निर्मितीच्या कार्यात रुई लेंथोर व्हिएगश या पोर्तुगीज नाविक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात त्याचा पुत्र फेरनोग व्हिएगश यांच्यासह एकूण 340 युरोपीय, यात मुख्यतः पोर्तुगीज होते, हे मराठा आरमाराच्या साठी 20 युद्धनौका बांधत असल्याचा उल्लेख हा 9 जून 1959 रोजीच्या पत्रात आढळते. हे पत्र म्हणजे स्वराज्याच्या आरमाराची निर्मिती विषय इतिहास सर्वात जुना उल्लेख होय.
लवकरच पोर्तुगीजांनी मराठा आरमाराचा भविष्यातील धोका लक्षात घेऊन वसई येथील अधिकाऱ्यांच्या मार्फत रुईची मनधरणी सुरू केली. त्याला आणि त्याच्या हाताखालील कारागिरांना मनधरणी करून पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या मुंबईमध्ये आणले. एव्हाना स्थानील लोकांनी युद्धनौका बांधणीचे काही तंत्र आत्मसात केले होते. त्यामुळे आरमार निर्मितीच्या कार्यात तसा खंड पडला नाही. सुरुवातीला मराठा आरमारासाठी शिवाजी महाराजांनी छोट्या नावांसोबत गलबत आणि गुराब ही जहाजे बांधली. मराठा आरमारातील मोठी जहाजे ही 10-12 तोफा असणारी आणि सुमारे पन्नास सैनिक बसतील या क्षमतेची होती. याव्यतिरिक्त तारवे, मचवे प्रकारच्या छोट्या नावा देखील बांधण्यात आल्या. यामधून पाणी, रसद, संदेश नेने आणणे, ही कामे केली जात असत. मराठा आरमारात असणाऱ्या गलबतावर त्रिकोणी शिडे असत आणि गुराबावर दोन डौलकाठ्या असत. प्रत्येक डौलकाठीवर दोन चौकोनी शिडे असत. पुढे अनेक वर्षांनी शाहू महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वात मराठा आरमारात पाल सारखी मोठी युद्धनौका देखील दिसू लागली. या पाल म्हणजे गुराबासारख्याच परंतु आकारणे मोठ्या होत्या, पाल वर तीन डौलकाठ्या असत आणि तिन्ही डौलकाठ्यांवर गुराबा सारखे चौकोनी शिडे असत. यातील मुख्य फरक असा की पाल वर मधल्या डौलकाठी वर तीन चौकोनी शिडे असत आणि त्यामुळे वाऱ्याच्या अनुकूलते नुसार हिला अधिक वेळ मिळे.
पावसाळ्यात सुरुवातीला काही काळ नांगरलेल्या जहाजात पाणी शिरू नये म्हणून नारळाच्या झावळ्यानी ती गलबते झाकली जात. जहाज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडाच्या बद्दल देखील शिवाजी महाराजांनी दंडक घालून दिले होते.
इतर माहिती आपण पुढील भागांमध्ये जाणून घेऊयात….
0 Comments