Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांची राजसभा कशी होती? (Rajsabha on Raigad in Marathi)

छत्रपती शिवाजी महाराजांची राजसभा कशी होती? (Rajsabha on Raigad in Marathi)

रायगडाला भेट दिल्यावर आपल्यापुढे यक्ष प्रश्न उभा राहतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजसभा अखेर होती कशी? याचेच उत्तर काही प्रमाणात देण्याचा प्रयत्न आज करतो आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांची राजसभा कशी होती? (Rajsabha on Raigad in Marathi)

आपण राजसभा असलेल्या ठिकाणी नगारखान्यातून आत येतो किंवा एका दरवाजा मधून आत येतो.ज्या दरवाजा मधून आत येतो त्या दरवाजाला पूर्णपणे भव्य कमान होती. बाबासाहेब पुरंदरे,गो. नि. दंडेकरांनी ती कमान बघितली होती. त्यांच्याकडे त्या अखंड कमानीचे काही फोटो देखील आहेत. तशी कमान आज पुन्हा रायगडावर उभी राहू शकते का? याचे उत्तर आमच्याकडे नाही. परंतु प्रयत्न केला तर त्यांच्यासारखी प्रतिकृती आपण बनवू शकतो पण त्याला त्या काळाची सर येणार नाही.
दरवाजाच्या विरुद्ध बाजूला आणखी एक दरवाजा होता आणि त्याला देखील एक कमान होती. मुख्य ओट्याच्या भिंतीच्या पाठीमागे दिवाने खास ही जागा आहे. खालचा ओटा आणि वरचा मुख्य ओटा यात काही बदल झालेले नाहीत. सध्या बाजूच्या काही विटांच्या भिंती मधल्या काळात यात जोडल्या गेल्या आहेत. 


राज्याभिषेक झाला त्यावेळी राजसभा कशी होती?

भिंतीच्या शेजारील बाहेरचा भाग हा त्याकाळात छप्पर घालून साकारलेला होता आणि मधील भाग हा तात्पुरत्या स्वरूपात मंडप घातलेला होता. त्या भागावर राज्यभिषेकासाठी मांडव घातलेला होता. दिवाने आम मध्ये 2 ते 3 वेळा दरबार भरला होता असा उल्लेख आहे. हे दरबार शक्यतो सण उत्सवांच्या वेळी भरत असे. त्यामुळे मधल्या भागात कधी पक्क बांधकाम नव्हते.
मुख्य ओट्यावर दुमजली बांधकाम होते. याला कमानींची रचना होती. सर्व बांधकाम हे लाकडात होते आणि समोरील बाजूला मोठ्या कमानीरुपी खिडक्या होत्या. सध्या ज्या छोट्या कमानी आपल्याला दिसतात त्याहून मोठ्या कमानी लाकडात बांधलेल्या होत्या. या कमानिरूपी खिडक्या आकाराणे मोठ्या असाव्यात जेणेकरून कुठेही बसलेल्या व्यक्तीला महाराज दिसू शकतील.
महाराजांच्या सिंहासन असलेल्या ओट्यावर येऊन कोणी नजराणे देऊ शकत नव्हते किंवा अडचणी मांडू शकत नव्हते. त्यासाठी अगदी समोर आपल्याला बांधकामाचे अवशेष दिसतात तिथे ओटा असावा आणि त्यावर उभे राहून तो व्यक्ती महाराजांसोबत संवाद साधत असावा. याचा उल्लेख ऑक्सइंडर याने केलेला आहे की तो महाराजांशी काही अंतरावरून बोलला. 


ओट्याच्या मागील बाजूला आपल्याला एक जागा दाखवली जाते आणि तिथे म्हणले जाते की तोफगोळा पडून त्या ओट्याच्या दगड वितळला आहे. तोफगोळा पडल्याने खालचा दगड वितळत नाही, दगड वितळण्यासाठी तापमान हे 1200 ते 1400 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत जावे लागते.
नगारखाना आणि इतर भाग यांच्यामध्ये सर्व भाग समान आहे आणि एकच दगड वर आलेला दिसतो. 


राजसभा म्हणजे गडावरील सर्वात उंच भाग! सर्व काही बांधकाम होण्याआधी ही पूर्ण जागा खडकाळ होती. तो खडक पूर्ण तासून राजसभेची सपाटी बनवण्यात आली. काढलेला दगड हा पुढे बांधकामांसाठी वापन्यात आला. तुम्ही बघाल तर संपूर्ण राजसभेची जागा ही दगड तासून सपाटी केलेली आहे आणि दगडावर छनी हातोड्याचे घाव आपल्याला बघायला मिळतील. 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि पुढे काहीच बांधकाम करायचे नाही असे ठरले नव्हते. पुढे बांधकाम होणार होते आणि गरजेनुसार वास्तू बांधल्या जाणार होत्या. त्यामुळे हा दगड तसाच ठेवलेला होता. या दगडाची प्रत चांगली असल्याने त्यांना तो वाया घालवायचा नव्हता त्यामुळे तो तसाच होता.
काही ठिकाणी गडावर ओटे हे आपल्याला दगड तासून बांधलेले सापडतात आणि तर काही ठिकाणी दगडावर दगड रचून बांधकाम आपल्याला बघायला मिळते. 


शंकर नारायण जोशी यांनी जी समकालीन पुस्तके प्रकाशित केली आहेत त्यात सिंहासनाच्या व्यवस्थेत आपल्याला माहिती मिळते की, तिथे ओट्यावर चादर असायची, दिवाबत्तीची सोय देखील तिथे होती, इथे भजने व्हायचे. सिंहसनाच्या जवळ चौकी पहारे होते, आणि इतरही माहिती आपल्याला पेशवेकाळात मिळतात परंतु सिंहासनाची शिवकाळातील व्यवस्था आपल्याला जास्त समजत नाही. 


सिंहासन कुठे गेले, कोणी नेले हा खूप यक्ष प्रश्न आहे परंतु पुराव्यानिशी आपण त्याविषयी बोलू शकत नाही.आख्यायिका आणि कादंबऱ्या आपल्याला माहिती देतात परंतु आपण त्यास पुरावा मानू शकत नाही.

Post a Comment

0 Comments