Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे । The Horses of Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे । The Horses of Chatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे । The Horses of Chatrapati Shivaji Maharaj

जगाच्या इतिहासातील पराक्रमी, बुद्धिवंत आणि अद्वितीय राजा म्हणून आपल्या डोळ्यासमोर पहिले नाव उभे राहते छत्रपती शिवाजी महाराज! छत्रपती शिवरायांच्या आयुष्यामध्ये शिवराय किंवा त्यांचे मावळे शत्रूने पाठलाग केल्यानंतर कधीही त्यांना सापडले नाहीत. याचे संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळात असणाऱ्या सर्व नामांकित घोड्यांना जाते. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने जर शत्रू सैन्याचा पाठलाग केला तर ते शत्रू सैन्याला ताणून पकडत असत. याचे एक कारण म्हणजे स्वराज्याच्या घोडदळात असणारी घोडी होती.  स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली अथवा आणीबाणीची वेळ आली छत्रपती शिवाजी महाराज या घोडदळाचा वापर आवर्जून करत असत. स्वराज्याच्या प्रत्येक मोहिमेत आपल्याला घोड्यांचा वापर केलेला बघायला मिळतो. 

महाराजांनी वापरलेल्या घोड्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि एकंदरीत स्वराज्याच्या निर्मितीत, रक्षणात आणि विस्तारात खूप मोठा वाटा आहे. मग प्रश्न उभा राहतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आणि 34 वर्षांच्या धावपळीमध्ये फक्त एकच घोडा वापरला होता का? तर नाही! 

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एकूण सात घोडे वापरल्याचे आपल्याला उल्लेख आढळतात. यामध्ये मोती, विश्वास, धुरंगी, इंद्रायणी, गजरा, रनभीर आणि कृष्णा असे 7 घोडे महाराजांनी त्यांच्या एकंदरीत आयुष्यात वापरले होते असे इतिहासकार सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो शेवटचा घोडा वापरला होता त्याचे नाव होते कृष्णा. 

त्याचे इतिहासातील महत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर जसे ते हत्तीवर बसले होते, तसेच नंतर ते एका पांढऱ्याशुभ्र घोड्यावर देखील बसले होते. त्या घोड्याचे नाव होते कृष्णा! 

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, आपल्या आयुष्याचे स्वप्न आणि रयतेच्या मनातील ध्येय पूर्ण झाले याचा आनंद राजमाता जिजाऊंना झाला. त्यासाठी माँसाहेबांनी महाराजाना ज्या घोड्यावर आग्रहाने बसवले होते तो म्हणजे कृष्णा! 

महाराजांच्या आयुष्यातील बरीच अशी दुर्मिळ माहिती तुमच्या पर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहोत. 

त्यामुळे तुमचे अभिप्राय कमेंट करून सांगा.


Post a Comment

0 Comments