Ticker

6/recent/ticker-posts

रावरंभा चित्रपटाविषयी माहिती । रावरंभा चित्रपट कोणत्या इतिहासावर? । Ravrambha Marathi Movie

रावरंभा चित्रपटाविषयी माहिती । रावरंभा चित्रपट कोणत्या इतिहासावर? । Ravrambha Marathi Movie

रावरंभा चित्रपटाविषयी माहिती । रावरंभा चित्रपट कोणत्या इतिहासावर? । Ravrambha Marathi Movie


सध्या मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत चर्चा आहे ऐतिहासिक सिनेमांची! मागील काही वर्षात अनेक मराठी ऐतिहासिक सिनेमे मराठीतून देखील भेटीला आले. या सिनेमाना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद देखील मिळाला. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय असा पहिला चित्रपट, त्यात इतिहास नव्हता परंतु त्याला मिळालेला प्रतिसाद मग पुढे घेऊन गेला. फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड जंगजौहर सारखे चित्रपट येणार आहेत व तानाजी ने देखील कमाल केली होती. अशाच एका ऐतिहासिक कहानिवर आधारित रावरंभा : द ग्रेट वारीयर ऑफ 1674 (Ravrambha Marathi Cinema) हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

या सिनेमाचे टिझर पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांची सावली दिसत असून या सावलीत शत्रूकडून होणारे वार ढालीवर झेलणारा मावळा आणि त्याच्या बाजूला उभी असलेली एक स्त्री दिसते. स्वराज्यात घडलेली एक खरी प्रेमकहाणी या सिनेमातून बघायला मिळणार आहे असे या सिनेमाच्या पोस्टर वरून वाटते. या सिनेमाच्या पोस्टर वर "तलवारीच्या इतिहासात हरवून गेलेली बेधुंद प्रेमाची अबोल कहाणी" असे कॅप्शन दिलेले आहे. 

1674 साली इतिहासात घडलेली एक प्रेम कहाणी या चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रताप गंगावणे यांनी या सिनेमाचे लेखन केलेले असून अनुप अशोक जगदाळे हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या सिनेमात कोण कलाकार दिसणार हे अजून रिव्हील करण्यात आलेले नाही. शशिकांत पवार प्रोडक्शन्स ने या सिनेमाची निर्मिती केलेली आहे. 


रावरंभा इतिहास कथा (Ravrambha History story)

फलटणचे बजाजी निंबाळकरांचे पुत्र महादजी निंबाळकर आणि महादजींचे पुत्र म्हणजे रावरंभा! 

आपल्या इतिहासात जरी हे पान समोर आले नसले तरी देखील त्यांचे कार्य खूप मोठे आहे. इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. छत्रपती घराण्याच्या सोबत निंबाळकर घराणे देखील प्रसिद्ध होते. निंबाळकर घराण्याने स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावत लढाया केल्या आहेत. 

रावरंभा ही दिलेली पदवी आहे, त्यांचे मूळ नाव आहे रंभाजी बाजी! रावरंभा म्हणजे सतत जिंकणारा होय!

यांची प्रेमकथा कोणती होती हे अजून आम्हाला सापडले नाही त्यामुळे यांच्याच जीवनावर आधारित सिनेमा आहे का? याबाबत देखील संभ्रम आहे. कदाचित सतत जिंकणारा मावळा हा शब्द त्यांनी रावरंभा म्हणून वापरला असावा आणि स्टोरी ही वेगळ्या मावळ्यांची असावी, ही देखील शंका आहे. तरी आम्ही चित्रपटाची मूळ कथा तुमच्यासमोर आणण्याचा लवकर प्रयत्न करू!

त्यांच्या विषयी इतर माहिती सध्या उपलब्ध नाहीये परंतु लवकरच ती माहिती या पेजवर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू.

Post a Comment

0 Comments