Ticker

6/recent/ticker-posts

शंभुराजांना ठार करण्यासाठी औरंगजेबाने तुळापुराची निवड का केली?

शंभुराजांना ठार करण्यासाठी औरंगजेबाने तुळापुराची निवड का केली?

शंभुराजांना ठार करण्यासाठी औरंगजेबाने तुळापुराची निवड का केली?

संभाजी महाराजांना संगमेश्वरी कैद केल्यावर मुकर्रबखान शंभुराजांना आणि कवी कलशांना घेऊन औरंगजेबाच्या आज्ञेवरून अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगड या भुईकोट किल्ल्यावर आला. दोन दिवस शंभुराजांना बहादूरगडावर ठेवण्यात आले. पुढे औरंगजेबाने बहादूरगड सोडून आपली छावणी तुळापूर कडे हलवली. संभाजी महाराजांना औरंगेजबाने ठार मारण्यासाठी तुळापुरची निवड का केली असावी?

बहादूरगड वर औरंगजेबाचा एक विश्वासू मंत्री सांगत होता, बहादूरगड संभाजी महाराजांना ठेवण्यासाठी सुरक्षित नाही. मराठ्यांना खबर लागली तर ते गनिमीकावा इथेही करून छावणीत घुसून मारतील. संभाजी महाराजाना कधी सोडवून घेऊन जातील याची कानोकान खबरही आपल्याला लागणार नाही. औरंगजेबाने विचार केला, एकदा आग्र्याला कैदेतून बाप-लेक सही सलामत सुटलेत. त्यानंतर दख्खनेत अक्षरशः सळो की पळो करून सोडले आहे आपल्याला! आणि आता जर संभाजी सुटले तर आपली कबर याच बहादूरगडावर खोदली जाईल. 

औरंगजेबाने माणसे कामाला लावली, शोधा अस एखादं गुप्त ठिकाण जिथे मावळे सहजासहजी पोहोचू शकणार नाहीत. औरंगजेबाने दिलेल्या आज्ञेवरून माणसे कामाला लागली. 

ठिकाण शोधलं इंद्रायणी भीमेच्या संगमावर असलेले तुळापूर हे गाव! तुळापुरची औरंगजेबाने निवड का करावी?  याचे महत्वाचे कारण म्हणजे बहादूरगडावर औरंगजेबाच्या पाच लाखांच्या सैन्याला ऐन उन्हाळ्यात तंबू ठोकण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वन-वन भटकावे लागले असते. या उलट इंद्रायणी भीमेच्या डोहात मुबलक पाण्याची सोय होती. घोडी पाण्यावाचून मरणार नाही, सैन्य पाण्यावाचून व्याकुळ होणार नाही असे हे इंद्रायणी भीमेच्या तिरावरचे तुळापूर हे गाव औरंगजेबाला सुरक्षित वाटले. 

विशेष म्हणजे बहादूरगड प्रमाणे तुळापूरच्या आजूबाजूला कुठलाही गडकोट अथवा मराठी साम्राज्याच्या मोठ्या अशा खाणाखुणा नाहीत. त्यामुळे गनिमी काव्याचा वापर करून मराठे तुळापूर वर हल्ला करू शकणार नाहीत.

औरंगेजबला त्याच्या विश्वासू मंत्र्यांनी दिलेला हा सल्ला पटला. औरंगजेब शंभुराजांना आणि कवी कलशांना घेऊन आपल्या सर्व फौजेनिशी तुळापूर ला रवाना झाला. इथेच औरंगजेबाने  छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांना तब्बल 40 दिवसांचा अत्याचार सहन करून ठार मारले. 

Post a Comment

0 Comments