Ticker

6/recent/ticker-posts

शंभूराजांना पकडण्यासाठी वापरलेले साखळदंड

शंभूराजांना पकडण्यासाठी वापरलेले साखळदंड

शंभूराजांना पकडण्यासाठी वापरलेले साखळदंड

१ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराजांना मुकररब खानाने संगमेश्वरी कैद केले. त्यावेळी कवी कलश आणि देखील कैद केले. दोरखंडाने जखडवून शंभूराजे आणि कवी कलश यांना बहादुरगडाकडे आणले जात होते. अरे छावा होता तो दोरखंड त्याला किती वेळ पकडवून ठेवणार! औरंगजेबाला हे कळून होते त्यामुळे औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शंभूराजे यांना पोलादी साखळदंडाने जखडून टाकले. ज्या साखळदंडात जखडून शंभूराजांना कैद करून औरंगजेबाच्या वढु तुळापुर येथील छावणीत आणले होते, ते हेच साखळदंड शंभूराज्यांच्या मृत्युनंतर तब्बल ३०० वर्षानंतर जिथे शंभूराजांना औरंगजेबाने ठार मारले, त्या वढु तुळापुर येथे सापडले.


संभाजी महाराजांच्या समाधी समोर खोदकाम करत असताना तेथे हे साखळदंड सापडले. १० डिसेंबर २०११ रोजी हे साखळदंड तुळापुर वासियांना सापडले. हे साखळदंड सर्वात आधी जेष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी लक्ष्मण नलावडे यांच्या समोर सादर केले. भगव्या कपड्यात गुंढाळलेले हे साखळदंड एका मातीच्या मडक्यात सापडले होते. लहान लहान आकाराचे एकूण १० तुकडे आणि एक मोठा साखळदंड, असे एकूण ११ तुकडे त्या मडक्यात होते. त्या साखळदंडाचा रंग तांबूस काळवंडलेला होता. इतिहास संशोधक दत्ताजी लक्ष्मण नलावडे यांनी ते साखळदंड बघून हे तेच साखळदंड आहेत याला दुजोरा दिला.


हे साखळदंड पोर्तुगीज बनावटीचे आहे असे इतिहास संशोधक सांगतात. सध्या हे साखळदंड महाराजांच्या समाधी जवळ आहेत.

नतमस्तक उभा महाराष्ट्र माझ्या शंभूराज्यांच्या चरणी
राजे मुजरा तुमच्या पोलादी देहाला
तुमच्या स्वराज्याप्रती असलेल्या अपार निष्ठेला
राजे मुजरा तुमच्या जखमातून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबा-थेंबाला
तुमच्या रांगड्या हिम्मतीला आणि सहनशक्तीला
राजे पुण्यवान समजतो, तुम्हाला जखडलेला हा साखळदंड देखील स्वतःला
कारण तुम्ही शूरवीर, तुम्हीच नरवीर ,
तुम्हीच होता या स्वराज्याचे खरे खुरे धर्मवीर !
मृत्यू सुद्धा घाबरला होता तुम्हाला हा साक्षात मृत्युचाच दावा आहे
या मातीला सदैव अभिमान ज्यांचा असा एकच छावा आहे
राजे हवेसारखी चालत होती तुमच्या तलवारीची पाती
शेवटी तुमच्याच रक्ताने भिजली या स्वराज्याची माती !!

Post a Comment

0 Comments