Ticker

6/recent/ticker-posts

धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी !! कसे दिसायचे महाराज? वजन आणि उंची किती होती?

धर्मवीर छत्रपती शंभूराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी !! कसे दिसायचे महाराज? वजन आणि उंची किती होती?



छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील  अजिंक्य, पराक्रमी व बुद्धिमान योद्धाहोय. महाराजांचे पराक्रम, बुद्धिमत्ता आणि शौर्य संपूर्ण जगाला ठाऊक झाली परंतु शंभूराजे दिसायला कसे होते? त्यांचे वजन किती होते? व इतरही प्रश्न आजही सर्वांच्या मनात आहेत.

ऐतिहासिक बखरी व समकालीन साधनांतून, कादंबऱ्यांतून व इतर शिलालेखांतून या गोष्टी काहीशा समजून येतात , तर या नोंदींच्या आधारे महाराजांविषयी जाणून घेतलेली काही माहिती तुमच्यासमोर ठेवतो आहे.

बॉम्बे रेकॉर्ड्स, मद्रास रेकॉर्ड्स आणि पोर्तुगीज रेकॉर्ड्स यामध्ये महाराजांची स्तुती केलेली आहे. परंतु खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व संपूर्ण स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या टीम ने अथक प्रयत्न घेउपर्यंत तरी संभाजी राजांना रगेल आणि रंगेलच समजण्याची चूक आपण सर्व मराठ्यांनी देखील केलीये. आम्हाला संभाजी महाराज अगोदर दिसले कसे तर नाटकाच्या रंगमंचावर  हातात पेला घेऊन येणारे आणि थोरातांची कमळा या चित्रपटातून बाईचा नाद असलेले! परंतु त्याअगोदर देखील असलेले बॉम्बे रेकॉर्ड, मद्रास रेकॉर्ड आणि पोर्तुगीज रेकॉर्ड्स कोणाला वाचून महाराज समजून घ्यावे असे वाटले नसावे, हे आमचे दुर्दैव!

प्राध्यापक नितीन बानगुडे त्यांच्या व्याख्यानात म्हणतात की आम्हाला वाचनाची सवय लागली पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे हे देखील ते सांगतात त्याचे महत्व आज आपल्याला कळायलाच हवे. 

सुरुवातीला स्वराज्यरक्षक संभाजी महाराज या मालिकेच्या टीम चे आभार मानावे वाटतात कारण त्यांनी महाराजांविषयी लोकांपर्यंत सत्य पोहोचवले आणि आता सर्व नाही शक्य तरी देखील काही लोक तरी संभाजी महाराजांविषयी इतिहास शोधायला लागतील.

इटालियन इतिहासकार निकोलाओ मनुची त्याच्या ग्रंथात अस लिहितो कि त्याने शंभूराजांना लहानपणी व मोठेपणी देखील बघितले होते.मनुचीने पोर्तुगीजांच्या वतीने १६८५-८६ साली संभाजी महाराजांसोबत बोलणी देखील केली होती. मनुची संभाजी महाराजांविषयी अस लिहून ठेवतो, संभाजी महाराजांसारखा विनम्र, हुशार आणि आक्रमक माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात यापूर्वी पाहिला नाही.

शंभूराजे संस्कृत चे गाढे अभ्यासक होते. त्यांनी कमी वयातच बुधभूषणम, नाईकाभेद, नखशिखांत, सातसतक या चार ग्रंथांची रचना केली होती. शंभू राजांचे मित्र कवी कलश देखील त्यांच्या एका काव्य छंदात , अफाट बुद्धिमत्ता व सामर्थ्य यांचा संगम ज्यांच्या ठायी आहे अशा हनुमंताची उपमा महाराजांना देतात.

शंभूराजांनी त्यांच्या आयुष्यात १२० पेक्षा जास्त लढायांमध्ये स्वतः नेतृत्व केले होते व यातील एकाही लढाईत शंभू राजे पराभूत झाले नव्हते. प्रसिद्ध फ्रेंच प्रवासी व इतिहासतज्ञ एबे गेरेय याने १६७२ साली बागलाण रामनगर च्या मोहिमेवर असणाऱ्या १५ वर्षांच्या शंभूराजांना स्वतःच्या डोळ्यांनी समोरासमोर पाहिले होते. केवळ १५ वर्षांच्या शंभूराजांचे रूप, शरीरयष्टी , व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण आणि युद्धकौशल्य पाहून तो अगदी भारावून गेला होता. त्या संपूर्ण मोहिमेच नेतृत्व अवघे १५ वर्षाचे शंभूराजे करत होते याचे एबे ला कौतुक आणि आश्चर्य वाटत होत.

एबे गेरेय लिहितो की, हा युवराज लहान आहे पण धैर्यशील आणि आपल्या बापाच्या कीर्तीस साजे असा शुरवीर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला आहे. त्यामुळे चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची तो बरोबरी करेल इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिशय रूपवान आहे.त्याचं सौंदर्य आणि धिप्पाड देहयष्टी हा सैनिकांचा त्याच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे. त्याच व्यक्तिमत्व अस आहे कि त्याच्यवर सैनिकांचं त्याच्यावर प्रेम आहे. राजा शिवाजिंसारखाच मान ते संभाजीना देखील देतात.

१६६६ साली आग्र्याच्या नजरकैदेत असताना संपूर्ण आग्रा शहरात दख्खनचा सिंह छत्रपती  शिवाजी महाराज आणि त्यांचे तेजस्वी पुत्र छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दलच चर्चा होती. त्यावेळी अनेक दंतकथा, सत्यप्रसंग महाराजांविषयी आग्र्यामध्ये प्रसिद्ध होते. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, सुरत लुटली आणि धर्मांध औरंग्याच्या नाकावर टिच्चून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

शिवाजी महाराज जरी नजरकैदेत होते तरी देखील शंभूराजे मुक्तपणे वावरत होते. शंभूराजे मिर्झाराजाचा मुलगा असणाऱ्या रामसिंग बरोबर औरंगजेबाच्या दरबारात मनसबदार म्हणून ये जा करत होते. ज्या वेळी शंभू राजे दरबारात जायला निघायचे तेव्हा शेकडो लोक आग्र्याच्या बाजारपेठांमधून रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून शंभूराजांना बघण्यासाठी उभे राहायचे. पडद्याआडुन  सरदार, उमराव आणि धनिकांच्या महिला त्याचं तेजस्वी रूप पाहायला गोळा व्हायच्या. महाराजांचे त्यावेळीचे वय केल्वाल ९ वर्ष इतकंच, परंतु धिप्पाड शरीरयष्टी मुले शंभूराजे १२-१३ वर्षांचे भासायचे. नितळ गोरापान रंग, शिवरायांसारखेच लांबसडक गरुडाच्या चोचीसारखे बहारदार नाक, टपोरे पाणीदार डोळे, भव्य कपाळ, चेहऱ्यावर बिंधास्तपणा, भयंकर आत्मविश्वास आणि बोलण्यात बाणेदार पणा, स्वर्गीय सौदर्य आणि रुबाबदार शरीरयष्टी शंभूराजाना लाभली होती. डोक्यावर मोगली किमोंश (आग्राभेटीतील वर्णन असल्याने तेव्हा शंभूराजे मोघली मनसबदार होते), त्यावर रत्नजडीत मोत्याच पिंपळपान, भव्य कपाळावर रुपेरी रेखीव शिवगंध, कानातील मोत्याचे कुंडल, अंगावर सुंदर नक्षीकाम केलेला जामा, गळ्यामध्ये आई भवानीची कवड्यांची माळ, अंगावर उंची दागिने, रत्नजडीत मुठीची कमरेला छोटीशी तलवार! या उमद्या राजपुत्राच लोभसवाण रूप मनाला मोहिनी घालणारे होते.

शिवरायांसारखेच एक प्रसन्न स्मितहास्य नेहमी त्यांच्या चेहऱ्यावर होते. चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास होता पण इतर मोगली शह्जाद्यांसारखी मगरूरी आणि माजुरडेपणा नव्हता. यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाची लोकांना प्रचंड भुरळ पडायची. शंभूराजांचे रुबाबदार व्यक्तिमत्व पाहून खुद्द औरंगजेबदेखील सुरुवातीला थक्क झाला होता.

शंभूराजांचे बोलणे अतिशय मधाळ आणि वागणे अतिशय रुबाबदार होते. आग्र्याहून सुटकेच्या वेळी शिवरायांना संभाजी महाराजांनी देखील फार मोठी मदत केली होती. एक युवराज म्हणून शंभू राजे स्वराज्याच्या सर्व जबाबदाऱ्या अगदी चोखपणे पार पाडत होते. कवीमनाचे शंभूराजे अगदी शिवरायांसारखेच मुत्सद्दी, शूर आणि कार्यकुशल होते. शंभूराजे सतत कार्यात गुंतलेले असायचे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची बरीचशी जबाबदारी स्वतः शंभूराजांनी पार पाडली होती. मोठ्या आत्मविश्वासाने परदेशी वकिलांशी बोलणी करणाऱ्या १६ वर्षांच्या शंभूराजांना विविध भाषांची अफाट माहिती होती. त्यांची बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता पाहून परदेशी वकील देखील थक्क होते. 

१६ वर्षांच्या शंभूराजांचे वर्णन एका पोर्तुगीज वकिलाने असे केले आहे कि, वॉर लाईक प्रिन्स! भारतात असणाऱ्या आमच्या सत्तेवर घोंघावणारे वादळ अस जणू पोर्तुगीजांना वाटत होते. १६ वर्षांच्या शंभूराजांचा इतका धसका त्यावेळी पोर्तुगीजांनी घेतला होता. 

शंभूराजांना वयाच्या २३ व्या वर्षी स्वराज्याची सूत्रे स्वतःच्या हाती घ्यावी लागली. तब्बल ९ वर्ष एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, मोघल, सिद्दी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज्यातील गद्दार या सर्वांना शंभूराजांनी एकाचवेळी मात दिली. या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याचा विस्तार केला, गडकिल्ल्यांची डागडुजी व नवीन भर देखील घातली. या काळात आपल्या काव्य छंदाची उपासना देखील केली.

शिवरायांसारखेच शंभूराजांचे देखील चारित्र्य निष्कलंक होते, हे वा.सी. बेंद्रे, नरहर कुरुमकर, कमल गोखले, सदाशिव शिवदे अशा अनेक विद्वान लेखकांनी आपल्या आयुष्यातील खूप सारी वर्षे संशोधन करून ती लिखित, ऐतिहासिक आणि वास्तवजण्य पुराव्यानिशी सिद्ध केले आहे. 

छत्रपती संभाजी महाराजांची वजन आणि उंची निश्चित किती होती याची माहिती उपलब्ध नाही. परंतु प्रत्येक प्रमुख इतिहासकाराचे याविषयी एकमत आहे कि शंभूराजांची शरीरयष्टी फारच मजबूत आणि धिप्पाड होती. काही इतिहासकारांनी आपले असे मत व्यक्त केले आहे की शंभूराजांची उंची हि ६ फुट २ इंच किंवा ६ फुट ३ इंच इतकी असावी, तर म,महाराजांचे वजन निश्चितपणे १०० किलो पेक्षा जास्तच असावे.

शंभूराजांची समकालीन असू शकतील अशी २ चित्रे आज उपलब्ध आहेत. दोन्ही चित्रांची प्रत इथे इंटरनेटवर उपलब्ध आहे तर त्यातील एक मूळ चित्र ब्रिटीश लायब्ररीमध्ये आहे, दुसरे मुळ चित्र जहागीरदार पारसनीस यांच्या संग्रहालयात आहे. (आम्हाला त्या प्रती सापडत नाहीयेत, ज्या भेटताय त्यात संभ्रम आहे त्यामुळे तुम्हाला १००% माहित असेल तर आम्हाला तो फोटो आणि त्याची सत्यता garvanemarathi@gmail.com वर नक्की कळवा)

सरतेशेवटी आपल्या गर्वाने मराठी परिवाराकडून शिवपुत्र धर्मवीर स्वराज्यरक्षक शंभूराजांना मानाचा मुजरा!  


Post a Comment

1 Comments