Ticker

6/recent/ticker-posts

९ जानेवारी शिव दिनविशेष !! 9 January ShivDinvishesh

९ जानेवारी शिव दिनविशेष !! 9 January ShivDinvishesh

९ जानेवारी शिव दिनविशेष !! 9 January ShivDinvishesh
९ जानेवारी शिव दिनविशेष !! 9 January ShivDinvishesh


९ जानेवारी इ.स.१६३६

शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१६५७

छत्रपती शिवरायांचा "गायकवाड" घराण्यातील "सकवारबाई" यांच्याशी विवाह.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१६६४

बहरोचहून मुघलांची फौज सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी छत्रपती शिवरायांना समजली, शिवरायांचे मावळ्यांना परतीच्या प्रवासासाठी तात्काळ लवाजमा बांधणीचे आदेश. ६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत लुटली. बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१६७१

बहादूरखान स्वराज्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

९ जानेवारी इ.स.१६८०

सिद्दीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. अर्थातच मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१७२२

पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह केला
सन १७२१ च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज यांच्याकडे बाजीरावची नजर वळली. या मोहिमेसाठी बाजीरावांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांची आरमारी मदत मागीतली. पोर्तुगीजांसमोर नवेच गंभीर संकट उभे ठाकले. निजाम, दाऊदखान पन्नी यांना धुळ चारणारा पेशवा आणि समुद्राचे अनभिषिक्त सम्राट सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समोर आपला अजिबात टिकाव लागणार नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी वरसोली (अलिबाग तालुक्यातील एक गाव) येथे युद्ध न करताच दिनांक ९ जानेवारी सन १७२२ रोजी तह केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१७३९ 

चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स १८१८ रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला १८६२ पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍याचा बंगला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१७६०

बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१७७९

पावसाळा संपल्या नंतर इंगजांनी मुंबई हून साधारण ४००० फोज घेत खंडाळ्याकडे प्रयाण केले. रघुनाथ रावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथ रावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांचा पणवेल मार्गे , कर्जत - खंडाळा - पुणे असा मार्ग होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकर ही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथ रावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्या सारख्या होत्या. का‍र्ले, खंडाळा, या भागात इंग्रज पोहोचे पर्यंत त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत चे गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिक कापुन जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून पाण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीवेळी सुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरु ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली.  जानेवारीला त्या कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शुर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजे कडुन मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली ९ जानेवारी १७७९, पण मराठयांनी तळेगाव सुद्धा रिकामे करुन जाळले होते, आणि पानवठे सुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

९ जानेवारी इ.स.१८८०

क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

January 9, 1636

Shah Jahan set out for his second expedition to the Deccan. He had set out with the aim of ending Nizamshahi. He crossed the Narmada near Handia in January 1636. From here, on January 9, Adilshah was reassured in a letter that the sardars who were with Shahaji Raja in the Nizamshahi should not get support. It was also written above that the annual ransom payable by him should be sent to Daulatabad by March 10, 1636. For this, Shah Jahan gave Solapur, its surroundings and part of Wangi to Adilshah from Nizamshahi.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1657

Chhatrapati Shivaji's marriage to "Sakwarbai" of "Gaikwad" family.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1664

Chhatrapati Shivaji understood the news that the Mughal army had marched towards Surat from Bahroch, and ordered Shivraj to immediately build an entourage for the return journey. From 6th January to 9th January 1664, the Maharaja plundered Surat. Badshah's face turned pale. Taking Dhanalakshmi of Surat, the Marathas reached Lohgad directly. Upon hearing the news of Shahaji Raja's death, Maharaj left Rajgadi.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1671

Bahadur Khan set out for Swarajya.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

January 9, 1680

Siddi took control of Underi Island and started building a fort. Of course, the Marathas made several attacks on Underi to prevent Siddi's plan from being carried out.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1722

The Portuguese made a treaty with the Marathas
At the end of 1721, Bajirao turned his attention to Govekar Portuguese. Bajirao enlisted the help of Sarkhel Kanhoji Angre for this expedition. The Portuguese faced a new and serious crisis. Recognizing that they would not be able to withstand the Nizam, Dawood Khan Panni, the dust-fed Peshwa and the uncrowned emperor of the sea, Sarkhel Kanhoji Angre, the Portuguese made a treaty on 9 January 1722 without a war at Versoli (a village in Alibag taluka).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1739

Under the leadership of Chimaji Appa, Pilaji Jadhav, Shankaraji Pant and with the help of 8,000 cavalry, 6,000 Hasham and 12 cannons besieged Mahim. He fired cannons at the fort walls, scattering them everywhere. Finally, on January 20, 1739, the fort came under the control of the Marathas. It was conquered by the British in 1818. Until 1862, there was a bungalow of the District Collector of Thane.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1760

The Afghans defeated the Marathas at Bararighat.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1779

After the monsoon ended, the British marched from Mumbai to Khandala with about 4,000 troops. Raghunath Rao's army was with him. The British army consisted of 600 Europeans and the rest Indian troops. Raghunath Rao and Ingja thought that Shinde and Holkar would come and meet him around Pune. The British route was via Panvel, Karjat-Khandala-Pune. The Maratha army was led by Mahadji Shinde, Holkar remained with the Maratha army. Therefore, Raghunath Rao's plan failed. At this time, the military movements of the Marathas were commendable. He persecuted them with guerrilla warfare until the British reached Carrell, Khandala. Constant guerrilla attacks on British troops cut off their supply routes. As the British army was advancing, the Marathas decimated all the villages along the way, cut down the crops and burnt them, moreover, the water bodies were not kept waterable by throwing poison, so the British army had to keep moving forward hoping for food. Even at night, small attacks continued to harass, but persistently the British army came to Khandala. She arrived in Carly in January. The so-called brave James Stuart, later painted by the British, was killed by Mahadji Shinde's forces in Carlyle 10 days before the main battle. As the Marathas cut off the supply route, the British army turned to Talegaon for food on January 9, 1779, but the Marathas had also emptied and burnt Talegaon, and Panwathe was also poisonous. Eventually the British withdrew without a fight.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 9, 1880

Revolutionary Vasudev Balwant Phadke sentenced to life imprisonment for treason
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments