Ticker

6/recent/ticker-posts

५ जानेवारी शिव दिनविशेष !! 5 January Shiv Dinvishesh

५ जानेवारी शिव दिनविशेष !! 5 January Shiv Dinvishesh

५ जानेवारी शिव दिनविशेष !! 5 January Shiv Dinvishesh
५ जानेवारी शिव दिनविशेष !! 5 January Shiv Dinvishesh


५ जानेवारी इ.स.१५९२

शाह जहानचा जन्म
खुर्रम, लाहोर, पंजाब (पाकिस्तान) येथे मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई यांच्या पोटी अल्-सुलतान अल्-आझम वल् खचान अल्-मुकर्रम खुश्रु-इ-गीती पनाह अबू-उल्-फतह् नूरुद्दिन मुहम्मद "जहांगीर" पादशाह गाझी यांजकडून गियासुद्दीन मुहम्मद म्हणजे शाह जहान नामक पुत्र जन्माला आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

५ जानेवारी इ.स.१६५७

आदिलसाही सैन्याबरोबर मासूरजवळ झटापट
मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मासूरवरील छापा घातला.  हा भाग शिवरायांच्या मुलुखापासून बराच दूर आहे. त्यामुळे हा छापा प्रदेश जिंकण्यासाठी नसून खंडणीसाठी असावा हे जास्त संयुक्तिक वाटते. अशावेळी शिवरायांची नीति कमीतकमी जीवहानी व जास्तीजास्त धनलाभ अशीच होती. त्यामुळे ज्याला आदिलशाही फरमानात पराभव म्हटले आहे ती खरतर यशस्वी माघार असावी असे दिसते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

५ जानेवारी इ.स.१६५८

शिवरायांनी माहुलीला वेढा घातला
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

५ जानेवारी इ.स.१६६४

#सुरतेवरील_पहिला_स्वारी
सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला सुरतेची पोथी त्याने महाराजांपुढे वाचली आणि म्हणाला की, सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल, असे सांगितले त्याजवरून राजीयांनी विचार केला, आणि बेत निघाला सुरत बद् सुरत करण्याच्या
सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैसच होती. दिल्ली खालो खाल दिमाख होता सुरतेचा अशा ह्या सुरतेत औरंगजेबाच्या ५ हजार सैनिकांचा जागता पहारा. सुरतेभोवती अभेद्य तटबंदी राजगडापासून अंदाजे ३२५ किलोमीटर उत्तरेला असलेल्या ह्या सुरतेच्या प्रत्येक घराची खडान खडा माहिती राजांना होती कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतेवर पाळत ठेवून होता तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक.
सुरत म्हणजे ऐश्वर्य. अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठ्या घडामोडी इथे चालत अठरा टोपीकर , इराणी ,हाफ्शी, तुराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफघाणी, मुघली इत्यादी परदेशी व्यापारीहि इथून व्यापार करत असत. ह्या लोकांनी सुरत भरून गेली होती.
औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती नागवली होती ह्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती
सुरतेवर निघण्याची तयारी जय्यत झाली आठ हजार घोडेस्वार तयार झाले निघण्याचा दिवस ठरला १५ डिसेंबर १६६३. आईं जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले. मजल दरमजल करत ५ जानेवारी १६६४, मंगळवार
शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही."
पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायतखान बहादूर याने महाराजांचे सौजण्यशील फर्मान धुडकावून लाविलेत्या मगरूरी मुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली.
सावकारांचे वाडे काबीज करून सोन, रूपे, मोतीं, पोवळे,माणीक, हिरे, पाचू, गोमेदराज, ,असे नवरत्ने; नाणे, मोहोरा, पुतळ्या , इभ्राम्या, सतराम्या,असफ्या, होन, नाणे नाना जातींचे इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड भांडे तांब्याचे
वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले (सभासद बखरीतील वर्णन)
सुरत मनसोक्त लुटून महराज आल्या मार्गानेच निसटले.
इतिहास काळापासूनचं लुट ह्या शब्दानेच अंगावरती काटे उभे राहतात, अर्थातच भयावह असणाऱ्या ह्या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळाच अर्थ दिला. लुट म्हटली की कत्तली ह्या अग्रभागीच कुणाचीच गय त्यात केली जात नाही. कुठलेही ठिकाण सोडले जात नाही पण परधर्माची मंदिरेच काय साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लुट घडविले माझ्या राजाने
आज दिनांक ५ जानेवारी १६६४ पासून पुढे ४ दिवस हि लुट चालू होती, पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ जानेवारी इ.स.१६७१

शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे (पेशवे) पंतप्रधान यांनी साल्हेर जिंकला. साल्हेरवर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराठ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच हा ठार झाला. दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार साल्हेर वाचवण्यासाठी फर्रादपूराहून निघाला, पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली.
या युद्धामध्ये हजर असलेल्या काही मोजक्या योध्यांची नावे - मोरोपंत, प्रतापराव सरनौबत, आनंदराव मकाजी, व्यंकोजी दत्तो, रुपजी भोसले, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप, गोंदाजी जगताप, संताजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ आदी.
यात आवर्जून घेतले जाणारे परंतु याच लढाईत वीरमरण पावलेले पंचहजारी लष्करी अधिकारी, शिवरायांचे लहानपणीचे सवंगडी सूर्यराव काकडे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

५ जानेवारी इ.स.१६९३

देसूर मुक्कामी जुल्फिकारचा समाचार
हा काळ होता १६९२चा मराठे पळवून पळवून मोगलांना मारत होते. संताजी धनाजी, असे सारेच वीर शर्थीने राज्य राखत होते. मराठ्यांचा तिसरा छत्रपती राजे राजाराम महाराज यावेळी जिंजीस होते आणि जिंजीस औरंगजेबाचा पुत्र कामबक्ष याचे वेढे पडले होते परंतू त्याचे आणि राजाराम महाराजांचे संबंध अगदी चांगले झाले होते. *(बापाच्या मृत्यू पश्चात गादीसाठी होणाऱ्या भांडणामध्ये मराठ्यांनी आपली बाजू धरावी यासाठी ) त्यामुळे तो वेढा देऊन बसलाय असे कधी वाटच नसे.
जिंजी पासून वांदीवॉश हे ठिकाण सुमारे २५ मैल दूर आहे. तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती मराठे मोगलांनी तिथपर्यंत जाऊ देत नव्हते मोगलांचे पहिले २ प्रयत्न फसले पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांना यश आले. जुल्फिकार खान. ते अन्नधान्य घेऊन पुन्हा आपल्या तळाकडे निघाला. मार्गात देसूर *(जिंजीपासून १३ मैल ईशान्येस) या ठिकाणी संताजीने आपल्या २० हजार सैन्यानिशी खानावर हल्ला चढविला
मोठी तेज लढाई झाली भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या वेळी हजर होता. त्याने ही लढाई प्रत्यक्षात पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास अधिक महत्व प्राप्त झाले आहे.
भीमसेन लिहितो.
....जुल्फिकार खान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली. मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते. त्यांनी मोगलांची वाट अडविली. मोगलांपाशी बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती. राव दलपतने सैन्याची उजवी बाजू सांभाळलीआणि त्याने शत्रूंना हटविले इतक्यात रात्र झाली. मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसऱ्याच दिसावी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले. त्यांनी निकराचे हल्ले चढविले. त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगलांच्या सोबत अस्केके वंजारी हवालदिल झाले. मराठ्यांची बंदुकी मोगल सरदारांच्या हत्तींवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या. जुल्फिकारखान व राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्या. आम्ही कुच करीत असताना. वाटेत भातशेते लागली आमच्या सैन्यातील कितीतरी बैल. आणि उंट चिखलात अडकले. घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले. आमच्यापाशी दारूगोळ्याचा तुटवडा पडला. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती झाली .
पळता भुई थोडी केली या मोगलांची मराठ्यांनी सह्याद्रीच्या कुशितले हे वाघबच्चे कर्नाटक जिंजी सारख्या परराज्यात देखील पराक्रमाचे तमाशे दाखवीत होते आपली तलवार गाजवीत होते. गुलामी मराठ्यांच्या रक्तातच नाही म्हणून राजाशिवाय प्रजा कित्येक काळ झगडत होती. त्या रावदलपत ला सुचेना काय करायचे. जुल्फिकारखान तर पाठीला पाय लावून पळत सुटला त्यांचे सैन्य चहू बाजूला आपला जीव मुठीत धरून पळत सुटले होते पळताना सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य होते
भागो ....! भागो... संताजी आया
ही लढाई घडली जेव्हा घडली तेव्हा तारीख होती. ५ जानेवारी १६९३...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

January 5, 1592

Shah Jahan was born
Al-Sultan Al-Azam Valkhachan Al-Mukarram Khushru-i-Geeti Panah Abu-ul-Fathnuruddin Muhammad "Jahangir" Padshah Ghazi Yanj Giasuddin Muhammad, the son of Shah Jahan, was born.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 5, 1657

Fighting near Adur with Adilsahi army
Shivaraya had most of the ideas about the Adilshahi strife that arose after the death of Muhammad Adilshah. The above decree was written eighteen days after the death of Muhammad Adilshah. Therefore, taking advantage of the instability in Adilshahi, Shivaraya raided Masur. This part is very far from the root of Shivaraya. So it seems more convincing that this raid should be for ransom and not for winning territory. At that time, Shivaraya's policy was to minimize the loss of life and maximize the gain. So what is called defeat in the Adilshahi decree seems to be a successful retreat.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 5, 1658

Shivaraya surrounded Mahuli
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 5, 1664

#First_swari on Surat
Bahirji Naik came from Surat. He read the book of Surat in front of the Maharaja and said that by killing Surat, innumerable substances would be found. He said that the Rajyas thought about it, and set out to make Surat Bad Surat.
Surat was the dead milk buffalo at Aurangzeb's doorstep. Delhi was the heart of Surat. In this Surat, watch over the world of 5,000 soldiers of Aurangzeb. The impenetrable ramparts around Surat, about 325 km north of Rajgad, were known to the kings of every house in Surat, as the third eye of the king was guarding Surat, the third eye being Bahirji Naik.
Surat means Aishwarya. Eighteen topikars, Irani, Hafshi, Turani, Baghdadi, Arabic, Bohra, Khoja, Jews, Afghanis, Mughals, etc., were also traded here. These people had filled Surat.
Maharaj wanted wealth in Surat to compensate for the destruction of Rayat by Aurangzeb's army for 3 years.
Preparations for departure to Surat were successful. Eight thousand horsemen were ready. The day of departure was 15th December 1663. The kings left after visiting Mother Jagdamba and receiving blessings from Aau Saheb. Going from floor to floor, January 5, 1664, Tuesday
Shivaji Maharaj came to Ghandevi near Surat and struck. (Around 10 o'clock in the morning) From there they reached Udhanya. From Udhan, Shivaji Maharaj sent his lawyer Inayat Khan to Subhedara. The lawyer said, "Inayat Khan Subhedara and the well-known merchants of Surat should make arrangements to pay as much ransom as the Maharaj says. Otherwise, if Surat becomes ugly, we are not responsible for it."
But due to the arrogance of Inayat Khan Bahadur, who disobeyed the courtesy order of the Maharajah, the Maharajah ordered the plunder of Surat.
Navratnas like gold, silver, pearls, corals, rubies, diamonds, pachu, onyx, Coins, mohoras, statues, Ibharamya, Sataramya, Asafya, Hon, Nane were filled with so many kinds of goods. Cloth pot copper
The city was plundered day and night for four days without being touched by any other commodity. (Description in Member Bakhari)
Surat was looted and escaped on the way to Maharaj.
The word 'loot' has been a thorn in the side of history for a long time. Of course, Maharaj also gave a different meaning to this word which is frightening. Loot said that no one was killed in the forefront of the massacre. No place is left, but my king plundered the temples of other religions so that even simple animals would not be harmed.
Today, from 5th January 1664 onwards, the looting was going on for 4 days.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

January 5, 1671

Salher was won by Shivaji Maharaj and Moropant Pingale (Peshwa) Prime Minister. Fattullah Khan was the chief of Salher. He was killed on the first day of the Maratha attack. Dawood Khan Qureshi, the Mughal chief, left Farradpur to rescue Salher, but he understood the story of Salher's departure on the way.
The names of the few warriors present in this war - Moropant, Prataprao Sarnaubat, Anandrao Makaji, Vyankoji Dutto, Rupji Bhosale, Shidoji Nimbalkar, Khandoji Jagtap, Gondaji Jagtap, Santaji Jagtap, Manaji More, Visaji Ballal, Moro Nagnath, Mukunda.
Suryarao Kakade, Shivaraya's childhood friend, is one of the five thousand military officers who died in this battle.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 5, 1693

News of Desur Mukkami Zulfiqar
This was the time when the Marathas of 1692 were fleeing and killing the Mughals. Santaji Dhanaji was ruling the country with such a heroic condition. Rajaram Maharaj, the third Chhatrapati king of the Marathas, was Jinjis at this time and Jinjis was surrounded by Aurangzeb's son Kambaksh, but his relationship with Rajaram Maharaj was very good. * (In order for the Marathas to take their side in the quarrel for the throne after the death of their father) Therefore, he never felt that he was under siege.
Vandiwash is about 25 miles from Jinji. The Mughals did not allow the Mughals to go there. The first two attempts of the Mughals failed but they succeeded in the third attempt. Zulfiqar Khan. He took the food and went back to his bottom. On the way, Santaji attacked Khan at Desur * (13 miles northeast of Jinji) with his 20,000 troops.
A great battle took place. Bhimsen Saxena, a Mughal historian, was present at the time of this battle. His character has gained more importance since he actually saw this battle.
Bhimsen writes.
.... Zulfiqar Khan set out to return. The Marathas started attacking from Chohi. The Marathas had gathered at Desur Mukkami. They blocked the Mughals. The Mughals did not have an army of more than twelve hundred. It was night when Rao Dalpat took the right side of the army and wiped out the enemy. The Mughal army camped at the foot of the fort.
The next morning, a large army of Marathas camped at the foot of the fort. On the second morning, the Marathas brought a large army. They mounted a barrage of attacks. They fired so many bullets that Askeke Vanjari became enraged with the Mughals. The Marathas started firing at the elephants of the Mughal chiefs. The elephants of Zulfiqar Khan and Rao Dalpat received several bullets. While we were marching. On the way there were paddy fields and many oxen in our army. And the camels got stuck in the mud. The horses crossed with great difficulty. We had a shortage of ammunition. This led to a very difficult situation.
The Marathas, who had run away for a while, were showing their prowess even in foreign lands like Karnataka Jinji, the tiger cubs of Kushitale of Sahyadri, were brandishing their swords. Slavery is not in the blood of Marathas so the people were fighting for a long time without a king. What do you want to do? Zulfiqar Khan, on the other hand, ran away with his feet on his back. His army was running away with their lives in their hands.
Run ....! Run ... Santaji came
This was the date when the battle took place. January 5, 1693 ...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
  Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments