Ticker

6/recent/ticker-posts

४ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 4 November ShivDinvishesh

४ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 4 November ShivDinvishesh


४ नोव्हेंबर इ.स. १६५६

छत्रपती शिवरायांचा मसुरतर्फेतवर हल्ला.
बादशहा मुहम्मद आदिलशहा मरण पावला.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

४ नोव्हेंबर इ.स. १६६७

औरंगाबाद येथे "संभाजीराजे" व महाराजा "जसवंतसिंह राठोड" यांची भेट झाली.
याच दिवशी शंभूराजांनी औरंगाबादहून प्रयाण केले व राजगडी दाखील झाले, शंभूराजांना राजगडावर पोहचवून 'प्रतापराव' व 'निराजी रावजी' यांना औरंगाबादेस पुन्हा "मुतालीक" म्हणून जायचे होते.यादरम्यान औरंगजेबाने शिवाजी महाराजांना "राजा" हा किताब दिला (शि.प.सं. लेख – १२००).
जवळ जवळ २ वर्षे महाराजांची फौज औरंगाबादेस होती यादरम्यान शिवाजी महाराजांनी मुअज्जम सोबत चांगलेच सख्या जमवले, दोघे एकमेकांना परस्परे वस्तभाव (विविध भेट वस्तू) पाठवू लागले हि बातमी औरंगजेबास समजताच त्यास शंका उत्पन्न झाली शिवाजी आणि शहजादा एक झाले तर कोणी तरी फितुरी करून आपणास दगा करेल, म्हणून औरंगजेबाने शहजादा मुअज्जम यास लिहले “शिवाजी हुशार आहे तिथे त्याचे सरदार निराजी व प्रतापराव दोघे आहेत त्या दोघास कैद करणे”, मुअज्जमचा वकील औरंगजेबाजवळ होता त्याने इशारतीने मुअज्जम याला कळवले तुम्ही हुशार राहणे हे वर्तमान समजताच मुअज्जम याने निराजी पंतास एकांती बोलवून हे वर्तमान सांगितले आणि वस्त्रे अलंकार देऊन निरोप दिला.
“तुम्ही उद्या रात्रीचे कुल फौजेनिशी उठून पळून जाणे तुमची बिशाद राहिली तर पावेल. दोन रोजात बादशहाचे कागद येतील मग तुम्हास कैद करावे लागेल म्हणून अगोदर निगुन जाणे”,
हे समजताच प्रतापराव आणि निराजी रावजी तयारी करून रात्री फौजेनिशी निघाले, मजल दरमजल करीत राजगडी पोचले महाराजांसोबत भेट झाली सगळे वर्तमान राजीयास सांगितले हे ऐकून राजे खुशाल झाले आणि बोलिले
“दोन वर्षे लष्कराचे पोट भरले, शहजादा मित्र जोडला हि बरी गोष्ट झाली”
(शिवकालीन पत्रसार संग्रह, शिवापूर दफ्तर यादी, सभासद बखर)
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

४ नोव्हेंबर इ.स. १६७९

छत्रपती शिवरायांच्या आदेशावरुन मराठ्यांनी मोगलाकडून "जालना" काबिज केले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

November 4, 1656

Chhatrapati Shivaji's attack on Masur.
Emperor Muhammad Adilshah died.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 4, 1667

In Aurangabad, "Sambhaji Raje" and Maharaja "Jaswant Singh Rathod" met.
On the same day, Shambhuraj left Aurangabad and entered Rajgadi. After taking Shambhuraj to Rajgad, 'Prataprao' and 'Niraji Raoji' wanted to go back to Aurangabad as "Mutalik". Meanwhile, Aurangzeb gave Shivaji Maharaj the book "Raja" - 1200).
Maharaj's army was in Aurangabad for almost 2 years. During this time, Shivaji Maharaj gathered a good number of people with Muazzam. So Aurangzeb wrote to Prince Muazzam, "Shivaji is clever to capture both Sardar Niraji and Prataprao where they are." Aurangzeb's lawyer was near Aurangzeb. Farewell with ornaments.
"If you have any worries about getting up and fleeing tomorrow night, you will be fine. The emperor's papers will come in two days, then you will have to be imprisoned, so go ahead first ",
As soon as Prataprao and Niraji Raoji understood this, they prepared and left with Faujeni at night. They reached Rajgadi step by step.
"For two years, the army was full, the prince added friends, it was a good thing"
(Shivkalin Patrasar Sangraha, Shivapur Daftar Yadi, Sabhasad Bakhar)
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

November 4, 1679

On the orders of Chhatrapati Shivaji, the Marathas captured "Jalna" from the Mughals.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments