Ticker

6/recent/ticker-posts

३० ऑगस्ट शिवदिनविशेष !! 30 August ShivDinvishesh

३० ऑगस्ट शिवदिनविशेष !! 30 August ShivDinvishesh

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

३० ऑगस्ट शिवदिनविशेष !! 30 August ShivDinvishesh

30 ऑगस्ट 1658

शिवरायांनी आपले वकील "सोनोपंत डबीर" यांना दिल्लीच्या औरंगजेब बादशहाकडे काही प्रश्नांसहीत पत्र घेऊन पाठवले.

३० ऑगस्ट १६५८ ला सोनाजीपंत दिल्लीला जायला निघाले व तिथे पोहोचल्यावर औरंगजेबला शिवाजीराजेंच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. ह्यावेळी शिवाजी राजेंनी पाठवलेले पत्र आज उपलब्ध नाही पण त्यावर औरंगजेबचे उत्तर उपलब्ध आहे.

शिवाजी राजेंनी त्याच्या पत्रात काही सवलती मागितल्या होत्या पण ते पत्र उपलब्ध नसल्याने नेमके काय मागितले होते ते कळत नाही.

शिवाजी राजेंनीे मुघल साम्राज्याप्रती निष्ठा दाखवावी अशी औरंगजेबची मागणी होती.

तसेच दख्खनचा मुघल सुभेदार शाहिस्तेखानच्या आदेशानुसार त्याला सहय्य करावे.

ह्या पत्रात दारा शुकोहला भक्करच्या सीमेवर पकडण्यात आले याचा उल्लेखही आहे.

हा सगळा पत्राचा खटाटोप उरकल्यावर सोनाजीपंत बरोबर औरंगजेबने शिवाजी महाराजांसाठी एक खास पोशाख पाठविला.

संदर्भग्रंथ✍️

(श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ट ८४९-८५१)

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

३० ऑगस्ट १६५९

रात्रीचा सुमार, औरंगजेबाचा गुलाम नजर बेग आणि त्याच्या साथीदारांनी दाराच्या तुरुंगाला भेट दिली. तेथे त्यांनी दाराच्या मुलाला दूर करून दाराचे जागच्या जागी तुकडे केले.

अश्या प्रकारे वारसाहक्काच्या युद्धात औरंगजेबाचा विजय झाला.

औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शुकोहची औरंगजेबाने मारेकरी घालून हत्या केली.

वारसाहक्काच्या या लढाईत औरंगजेबाच्या जागी जर दारा शुकोह बादशाह झाला असता तर पुढील सर्वच इतिहास बदलला असता.

ठार केल्यानंतर औरंगजेबाने दाराचे मस्तक कलम केले आणि एका ताटात ठेऊन वडील शहाजहानला "नजराणा" म्हणून पेश केले.

दाराचं शव हुमयूनच्या कबरीच्या आवारात पुरण्यात आलं !

गुस्ल नाही , दुवा नाही,

दोन आण्याचं कफनही प्रेताला लाभलं नाही

फातेहा न पढताच मुर्दा खड्ड्यात लोटण्यात आला व मातीनं बुजवण्यात आला.

विषेश म्हणजे, दाराला लढाईत हरवण्यासाठी औरंगजेबाने त्याचा भाऊच असलेल्या शहजादा मुराद बक्षची मदत घेतली आणि त्या मुरादबक्षलाही दोनच वर्षांनी ठार केले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

August 30, 1658

On the night of, Aurangzeb's slave Nazar Beg and his companions visited Dara's jail. There they removed the door boy and smashed the door in place. Thus Aurangzeb won the war of inheritance.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
   Jai Jagdamba Jai Jijau
   Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments