२२ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 22 November ShivDinvishesh
२२ नोव्हेंबर इ.स.१६५६
शिवरायांचा मसुरवर हल्ला२२ नोव्हेंबर १६५६ च्या एका फर्मानात शिवरायांच्या मसूरवरील छाप्याचा उल्लेख सापडतो. आदिलशाही सरदार मुहम्मद इखलासखानला हे फर्मान मिळाले होते. त्याला कर्नाटकाचा सुभेदार नेमले होते व शिवरायांच्या त्या भागातील हलचालींवर पायबंद घालायचा आदेश त्याला दिला होता. आदिलशाहीतील घडामोडींच्यावेळेचा शिवरायांच्या हलचालींबाबतचा हा सगळ्यात जुना संदर्भ आहे.
मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन शिवरायांनी मासूरवरील छापा घातला असावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२२ नोव्हेंबर इ.स.१६६५
किल्ले पुरंदरच्या ऐतिहासिक तहामध्ये ठरल्याप्रमाणे विजापूरच्या मोहीमेसाठी छत्रपती शिवराय मुघलांकडून लढण्यासाठी "मिर्झाराजे जयसिंग" यांच्या छावणीत दाखल.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२२ नोव्हेंबर इ.स.१६७९
छत्रपती शिवराय "किल्ले पट्टा उर्फ विश्रामगड" वर आले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२२ नोव्हेंबर इ.स.१७५०
रामराजे आपल्याला जुमानत नाहीत, आपल्या आज्ञेत वागत नाहीत म्हटल्यावर ताराबाईंनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी वेगळीच योजना आखली. २२ नोव्हेंबर १७५० रोजी रामराजे यांना चंपाषष्टीनिमित्त पुजेला व भोजनाला किल्ल्यावर बोलावले. रामराजे यांनी किल्ल्यावर जाऊ नये असा सल्ला त्यांच्या सल्लागारांनी दिला, पण छत्रपतींनी तो मानला नाही. निमंत्रणाप्रमाणे ते किल्ल्यावर गेले आणि तेथील कार्यक्रम आटोपून परतू लागले असता त्यांना रोखून धरण्यात आले. दारे लावून घेण्यात आली. छत्रपती रामराजांना ताराबाईंनी बंदिस्त केले आणि सर्व कारभार आपल्या हाती घेतला. रामराजे अटकेत होते त्या काळात ताराबाईंनी त्यांना निरनिराळ्या प्रकारे समजावून सांगण्याचा आणि त्यांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. पण घडलेल्या घटना इतक्या चमत्कारीक होत्या कि रामराजेंच्या मनात ताराबाईंच्या विषयी प्रेम किंवा विश्वास वाटत नव्हता.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२२ नोव्हेंबर इ.स.१७६०
पानिपत येथील मुक्कामाच्या काळात अब्दालीशी ज्या दोन मोठ्या चकमकी झाल्या त्या केवळ शिंदे आणि होळकरांमुळे जिंकल्या गेल्या याबाबतही कोनाचे दुमत नाही. दोघांना तात्काळ राखीव कुमकेचे मदत मिळाली असती तर मराठे तेंव्हाच जिंकले असते याबद्दलही इतिहासकारांना संशय नाही. २२ नोव्हेंबर १७६० रोजी वजीर शहावलीखानाशी झालेले युद्ध निर्णायक ठरले असते. शिंदे-होळकरांनी पानिपत येथील मुक्कामाच्या काळात अब्दालीशी ज्या दोन मोठ्या चकमकी झाल्या त्या केवळ शिंदे आणि होळकरांमुळे जिंकल्या गेल्या याबाबतही कोनाचे दुमत नाही. दोघांना तात्काळ राखीव कुमकेचे मदत मिळाली असती तर मराठे तेंव्हाच जिंकले असते याबद्दलही इतिहासकारांना संशय नाही. २२ नोव्हेंबर १७६० रोजी वजीर शहावलीखानाशी झालेले युद्ध निर्णायक ठरले असते. शिंदे-होळकरांनी अफगानी फौज अक्षरश: कापुन काढली. सुजा व नजीबाने अधिकची कुमक पाठवुनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळावे लागले. शिंदे-होळकरांच्या फौजांनी त्यांचा पार अब्दालीच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. लष्कराची हे अवस्था पाहुन छावणीतील अफगान-रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली. फौज अक्षरश: कापुन काढली. सुजा व नजीबाने अधिकची कुमक पाठवुनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळावे लागले. शिंदे-होळकरांच्या फौजांनी त्यांचा पार अब्दालीच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. लष्कराची हे अवस्था पाहुन छावणीतील अफगान-रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
November 22, 1656
Shivaraya's attack on lentilsA decree dated 22nd November 1656 mentions Shivaraya's raid on lentils. Adilshahi Sardar Muhammad Ikhlas Khan had received this decree. He was appointed Subhedar of Karnataka and was ordered to put a stop to the movements of Shivaraya in that area. This is the oldest reference to Shivaraya's movements during the Adilshahi period.
Shivaraya had most of the ideas about the Adilshahi strife that arose after the death of Muhammad Adilshah. The above decree was written eighteen days after the death of Muhammad Adilshah. Therefore, taking advantage of the instability in Adilshahi, Shivaraya must have raided Masur.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
November 22, 1665
Chhatrapati Shivaji entered the camp of "Mirza Raje Jaisingh" to fight the Mughals for the expedition to Bijapur as decided in the historical fort of Fort Purandar.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
November 22, 1679
Chhatrapati Shivaji came to "Fort Patta aka Vishramgad".🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
November 22, 1750
When Ramaraja said that he was not obeying him, Tarabai came up with a different plan to take him into custody. On 22nd November 1750, Ramraje was invited to the fort for worship and dinner on the occasion of Champashti. Ramraje was advised not to go to the fort by his advisers, but Chhatrapati did not heed it. As per the invitation, they went to the fort and were stopped while returning from the program. The doors were slammed shut. Chhatrapati Ramraj was imprisoned by Tarabai and took charge of everything. During Ramraje's arrest, Tarabai tried to persuade him in various ways and bring him under her control. But the events were so miraculous that Ramaraj did not feel love or faith in Tarabai.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
November 22, 1760
There is no doubt that the two major encounters with Abdali during his stay in Panipat were won only by Shinde and Holkar. Historians also have no doubt that the Marathas would have won if the two had received immediate reserve help. The battle with Wazir Shahwali Khan on 22 November 1760 would have been decisive. There is no doubt that the two major encounters between Shinde and Holkar during their stay in Panipat were won only by Shinde and Holkar. Historians also have no doubt that the Marathas would have won if the two had received immediate reserve help. The battle with Wazir Shahwali Khan on 22 November 1760 would have been decisive. Shinde-Holkar literally cut off the Afghan army. Although Suja and Najiba sent more help, Wazir and his army had to flee. Shinde-Holkar's forces chased him to Par Abdali's camp. Seeing this state of the army, the Afghan-Rohillas in the camp also started fleeing. The army was literally cut off. Although Suja and Najiba sent more help, Wazir and his army had to flee. Shinde-Holkar's forces chased him to Par Abdali's camp. Seeing this state of the army, the Afghan-Rohillas in the camp also started fleeing.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments