२ जानेवारी शिव दिनविशेष !! 2 January Shiv Dinvishesh
![]() |
२ जानेवारी शिव दिनविशेष
|
२ जानेवारी इ.स.१६६१
मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे. या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इ.स. २ जानेवारी १६६१. मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे. केवढी महत्वाची जबाबदारी ही ? अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद. पण मोरोपंतांचे क्षात्रतेज लपू शकले नाही. जमा - खर्च प्रामाणिकपणे पाहाण्याच्याइतकीच तरवार चालवण्याची धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत, हे पूढील वर्षभरातच 'पेशवे' झाले (दि.०३/०४/१६६२).
मोरोपंत पेशवे पंतप्रधान - ते हेच. स्वराज्यस्थापनेच्या काळापासून सतत शिवकार्याचे पाईक ठरलेले हे एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१६८४
किल्ले फोंड्याच्या बचावासाठी सुरवातीला मराठ्यांना आपला फिरंगी दारूगोळ्यापुढे निभाव लागणार नाही असे वाटले होते, फोंडा हा गड मराठ्यांच्या ताब्यात रहावा, तो शत्रूच्या हाती पडू नये, स्वामींची फत्ते व्हावी म्हणून तेथील हवालदार, सरनौबत, सबनीस, नाईकवाडी हे फोंड्याच्या ‘पिराला’ नवस बोलले होते. स्वामींची फत्ते झाल्यावर आजच्या दिवशी कवी कलशाने धर्माजी नागनाथाला लिहून पिरास दरवर्षी ५० होण उदफूल, दिवाबत्ती साठी दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१६७१
१६७१ ते १६७४ युवराजांनी जिजाऊ आउसाहेबांच्या वृद्धापकाळात मुलकी कारभार सांभाळला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१६७१
सरदार सुर्यजी काकडे यांना वीरमरण
साल्हेरच्या युद्धात जय मिळाला, पण आनंदाच्याबरोबर युद्धातील विजय दु:ख घेऊनच येतो. या युद्धात महाराजांचा एक अत्यंत आवडता, शूर जिवलग सूर्याजी काकडे हा मारला गेला. महाराजांना अपार दु:ख झाले. त्यांच्या तोंडूनउद्गार बाहेर पडले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा महा भारतातील कर्ण होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१७५८
मराठी सैन्याने नळदुर्ग किल्ला जिंकला
नळ राजाने हा किल्ला बांधला व त्यावरूनच ह्याला नळदुर्ग नाव प्राप्त झाले असे म्हटले जाते. सहाव्या शतकात हा चालुक्यांकडे होता. त्यानंतर सन १३५१ पासून ते सन १४८० पर्यंत तो बहमनी राजवटीखाली होता. पुढे तो आदिलशाहीकडे गेला. सन १५५८ मध्ये स्वतः आदिलशाहने ह्याला भेट दिली व त्याची पाहाणी केल्याचे म्हटले जाते.
सध्याचे बांधकाम सुलतान अबुल मुझफ्फर अली आदिलशाहने सन १५६० च्या आसपास केल्याचे म्हटले जाते. त्यावेळी ह्याला शाहदुर्ग असे नाव दिले गेले होते. सन १६७७ मध्ये मुघलांनी हा जिंकला व नंतर औरंगजेबने तो हैदराबादच्या निजामाला दिला. २ जानेवारी १७५८ ला नानासाहेब पेशवा, विश्वासराव, सदाशिवराव व दत्ताजी शिंदे च्या मराठी सैन्याने हा किल्ला जिंकला. मराठेशाहीच्या शेवटी निजामने हा परत जिंकून घेतला.
सन १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेलांच्या लढ्यानंतर हा किल्ला भारतात विलीन झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१७६६
राजारामांच्या मृत्यूनंतर कोल्हापूरातून ताराराणी स्वराज्याचा कारभार पाहात होती. शाहू आणि ताराबाई यांच्यात झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. मालवण समुद्रावर चाचेगिरीला ऊत आला होता. मेजर गॉर्डन व कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग ताब्यात घेतला. त्यावेळी किल्ल्यातील दारुखाना जळून खाक झाला इंग्रजांनी किल्ल्याचे नाव ठेवले.‘‘फोर्ट ऑगस्टस‘‘ कोल्हापूरच्या राणी जिजाबाई व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील करारानुसार २ जानेवारी १७६६ रोजी सिंधुदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात आला. निपाणिच्या देसाई विरूद्ध इंग्रजांनी करवीरकरांना मदत केली. त्याच्या मोबदल्यात १७९२ ला हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१८४८
क्रांतिकारक राघोजी भांगरेंना अटक
इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने चंद्रभागेच्या काठी राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता राघोजीने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्याला आणले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या निधड्या छातीच्या शूर वीराचे वकील पत्र घ्यायला कोणीही पुढे आले नाही. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मांडली जाताच एकतर्फी सुनावणी झाली! राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१७५७
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१८८८
तळेगाव ढमढेरे येथे क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळेंचा जन्म झाला.
अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना झाली आणि गदर पार्टीच्या कामाने आतंरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची प्रतिमा उजळून निघाली. हे म्हणण्याच स्वच्छ कारण की आजही अमेरिकेतल्या अनेक websites वर गदर पार्टीच्या इतिहासाची माहिती उपलब्ध आहे. गदर पार्टीच्या कामामध्ये लाला हरदयाळ, सोहनसिंग भकना, भाई परमानंद, डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे हे अर्ध्वयू होते. पण या सगळ्यांमध्ये खूपदा भूमिगत काम कराव लागत असल्याने महाराष्ट्रात फारसे प्रसिद्ध नसलेले पण महाराष्ट्रातील अगदी पुण्याजवळील तळेगाव ढमढेरे येथे जन्माला आलेले 'क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे' ह्यांच चरित्र अनन्यसाधारण आहे. त्यांच्या गदर पार्टीमधल्या कामाचा खुद्द सर मायकेल ओडवायर प्रशंसक होता. त्यांची दुर्दम्य स्वातंत्र्यलालसा,शस्त्रे नि स्फोटके हाताळण्यातील प्राविण्य, संकटात बेधडक उडी घेण्याची धडाडी, भविष्याविषयी प्रचंड बेफिकीर पणा, मरणाला निर्भिड पणे सामोरे जाण्याची ताकद यांमुळे ते खरोखर एक क्रांतिरत्न होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२ जानेवारी इ.स.१९४३
पहाटे मुरबाड जवळील सिध्दगडाच्या पायथ्याशी एका ओढ्याकाठी वीरभाई कोतवाल त्यांचे सहकारी व इंग्रज यांच्यात रणसंग्राम सुरू होता . यामध्ये वीरभाई कोतवाल व त्यांचे सहकारी हिराजी पाटील शहीद झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
January 2, 1661
Moropant Trimbak Pingale was awarded Mujumdari by Shivaji Maharaj. Moropant Trimal Pingale. A page of honor in Shivshahi. An unusual personality who came forward on the strength of selfishness. The fort which got the honor of being the capital of Hinduism is Rajgad. Moropant Pingale is the Vibhuti who successfully took the responsibility of building this fort. After meditating on the deeds of these Moropant Pingalas on the occasion of Afjalswari, Shivaraya bestowed Mujumdari on them. That day is January 2, 1661. Muzumdari is to look after the accumulated expenditure of the state. How important is this responsibility? An important position in the Ashta Pradhan Mandal. But Moropant's fielding could not be hidden. Accumulation - Moropant, who had the courage to wield a sword as much as to see the expenses honestly and gained a good diplomacy, became a 'Peshwa' within the next year (03/04/1662).
Moropant Peshwa Prime Minister - that's it. He is a supernatural personality who has been a devotee of Sivakarya since the establishment of Swarajya.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1684
Initially, the Marathas did not think that they would have to rely on Firangi ammunition for the defense of the fort Fonda. On this day, after the victory of Swamiji, the poet Kalsha wrote to Dharmaji Nagnath and gave Piras 50 hons every year for Udful and Divabatti.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1671
From 1671 to 1674, the prince ruled the country in the old age of Jijau Ausaheb.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1671
Veermaran to Sardar Suryaji Kakade
The battle of Salher was won, but with joy comes victory in battle. Suryaji Kakade, one of the Maharaja's favorite, was killed in this battle. The maharaja was very sad. An exclamation came out of their mouths, 'My sun has set. He was like Karna in Maha Bharat.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1758
Marathi army conquered Naldurg fort
It is said that the fort was built by the Nala king and hence the name Naldurg. It belonged to the Chalukyas in the sixth century. After that from 1351 to 1480 it was under Bahamani rule. Next he went to Adilshahi. It is said that Adilshah himself visited it in 1558 and inspected it.
The present construction is said to have been done by Sultan Abul Muzaffar Ali Adilshah around the year 1560. At that time it was named as Shahdurg. It was conquered by the Mughals in 1677 and later handed over to the Nizam of Hyderabad by Aurangzeb. On January 2, 1758, the fort was conquered by the Marathi forces of Nanasaheb Peshwa, Vishwasrao, Sadashivrao and Dattaji Shinde. At the end of Maratha rule, the Nizam won it back.
After independence in 1947, the fort was merged with India after the struggle of the then Home Minister Vallabhbhai Patel.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1766
After Rajaram's death, Tararani was in charge of Swarajya from Kolhapur. According to the Warne Tahan between Shahu and Tarabai, the control of Malvan area came to Tararani. The Malvan sea was infested with pirates. Major Gordon and Captain Watson captured Sindhudurg. At that time, the fort's barracks was burnt down and the fort was renamed by the British. The British helped Karveerkar against Nipani's Desai. In return, the fort fell to the British in 1792.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1848
Revolutionary Raghoji Bhangre arrested
Lieutenant Gayle, a British officer, arrested Raghoji at Chandrabhaga. Raghoji surrendered to the police without any protest. He was chained and brought to Thane. He was charged with treason. The treason case was heard before a special judge. Unfortunately, no one came forward to take the letter from the lawyer of this brave hero. A one-sided hearing was held as Raghoji was not represented due to lack of counsel. Raghoji was convicted. He was sentenced to death.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1757
In the battle of Plassey, the British defeated the Nawab of Bengal. This victory laid the foundation of the East India Company government and the British East India Company captured Kolkata.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1888
Krantiratna Vishnu Ganesh Pingale was born at Talegaon Dhamdhere.
The Ghadar Party was formed in the United States and the work of the Ghadar Party raised the image of India's freedom struggle internationally. It is safe to say that the history of the Ghadar Party is still available on many American websites. Lala Hardayal, Sohansingh Bhakna, Bhai Parmanand, Dr. Pandurang Sadashiv Khankhoje was Ardhvayu. However, the character of 'Krantiratna Vishnu Ganesh Pingale', who was not very famous in Maharashtra but was born in Talegaon Dhamdhere near Pune in Maharashtra, is unique. Sir Michael O'Dwyer himself was an admirer of his Ghadar Party work. He was truly a revolutionary because of his relentless desire for freedom, his prowess in handling weapons and explosives, his courage to jump into adversity, his fearlessness about the future, and his strength to face death fearlessly.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 2, 1943
In the morning, Virbhai Kotwal was fighting with his colleagues and the British at a stream at the foot of Siddhagad near Murbad. Virbhai Kotwal and his colleague Hiraji Patil were martyred.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments