१८ नोव्हेंबर शिवदिनविशेष !! 18 November ShivDinvishesh
१८ नोव्हेंबर इ.स.१६६७
पोर्तुगीज स्वराज्याच्या समुद्र किनाऱ्यावर येऊन त्यांचे आरमार उभे करत होते. तसे झाले तर तो स्वराज्यासाठी एक धोका होता. त्यांना शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी पोर्तुगीज व्हाॅइसराॅयला वकीलामार्फत पत्र पाठविले व तसे न करण्याचा इशारा दीला.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
१८ नोव्हेंबर इ.स.१६७५
द॥ बे॥ धनकोनाम जयचंदीभाई व जमा माव बाबानभाई मुकाम मलवडी यांस रिणको नाम बजाजी नाईक निंबाळकर व साविञीबाई महादजी नाईक निंबाळकर देसमुख प्रो। फलटण सु॥..कारणे लिहून दिला कर्जकतबा ऐसे जे,बदल खान अजम आबदलाखान(अफजलखान)यांसी पातशाहांनी साहेबी सिवाजी राजेवरी मसलत केली.ते वख्ती आबदलाखान कुचावर कुच करुन मलवडीस उतरले ते वख्ती आम्हाबदल सिवाजी राजे यांनी नाईकजी राजेस बहुत प्रकारे कागद लिहिला होता.तो आम्हास दस्त करून गल्यांत तोफ घालून सुनता करून हातीच्या पायाखाले घालून मारावे तो नाईकजीराजे यांनी बहुत काही आडमूड होऊन आबदलाखानास अर्ज केल्यावरी साठी हजारावरी करार करून होन ६०००० साठी हजारावर,दरम्यान नाईकजीराजे पांढरे जमान होऊन सोडविले.त्यास पंचोञा प्रमाणे व्याज करून मुदत दोन वर्षात तुमचे व्याज मुदल देऊ जर न देऊ तर आपले फलटणची देसमुखी तुमची असे काहीएक हरकत करू तरी श्री माहादेवाची व श्री विठोबाची आण असे.हा कतबा सही...गोही.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
१८ नोव्हेंबर इ.स.१६८१
संगमनेरचा ठाणेदार "नारोजी" याने मराठ्यांना अडविण्यासाठी "औंढा" पट्ट्यात वाटा रोखून धरल्या.पण मराठे हुशारीने तिकडे फिरकलेच नाहीत. उलटच्या दिशेने संगमनेरपासून २० कोसावर पुणे जिल्ह्याच्या सीमेलगत भोजपुऱ्यात चौथरा वसूल करत निघून गेले.
तिथे चकमकही झाली.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
१८ नोव्हेंबर इ.स.१७७२
श्रीमंत थोरले माधवराव यांचे निधन.वयाच्या २७ व्या वर्षीच त्यांनि इहलोकची यात्रा संपली . तसेच रमाबाई पण त्यांचे बरोबर सती गेल्या.
श्रीमंत माधवराव पेशवे यांचा १८ नोव्हेंबर १७७२ मध्ये क्षयरोगाने अकाली मृत्यू झाल्याने त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
१८ नोव्हेंबर इ.स.१९१०
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१०क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त ह्यांचा आज स्मृतिदिन ! (२० जुलै १९६५)
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता. कानपूरच्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटामुळे. तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
November 18, 1667
The Portuguese were coming to the shores of the Swarajya and building their fleet. If that happened then it would be a threat to Swarajya. To persuade him, Chhatrapati Shivaji sent a letter to the Portuguese viceroy through a lawyer and warned him not to do so.🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
November 18, 1675
द॥ Bay Bajaji Naik Nimbalkar and Savinibai Mahadji Naik Nimbalkar Desmukh Prof. Phaltan Su ॥..write down the reasons as such, Badal Khan Azam Abdalakhan (Afzal Khan) was consulted by Patshahs Sahebi Siwaji Rajevari. Naikji Raje was very upset and agreed to apply for Abdalakhana for Rs. 60,000 for a thousand rupees. Meanwhile, Naikji Raje released him on a white deposit of Rs. 60,000. Give him a term of interest for two years If you don't give it, even if your Phaltan desmukhi does something like this for you, it will be for Shri Mahadev and Shri Vithoba. This letter is signed ...Crocodile
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
November 18, 1681
Sangamner's Thanedar "Naroji" withheld his share in the "Aundha" belt to stop the Marathas.But the Marathas did not turn around cleverly. In the opposite direction, he left Sangamner at 20 kosa in Bhojpur near the border of Pune district.
There was a clash.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
November 18, 1772
Rich Thorale Madhavrao passed away.At the age of 27, he completed his journey to this world. Also Ramabai but Sati went with him.
Due to the untimely death of the wealthy Madhavrao Peshwa on 18th November 1772 due to tuberculosis, his younger brother Narayanrao Peshwa got the Peshwa robe.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
November 18, 1910
Batukeshwar Dutt was born on November 18, 1910Today is the memorial day of revolutionary Batukeshwar Dutt! (July 20, 1965)
Batukeshwar Dutt was born on 18 November 1910 in the village of Ori in Bengal. Kanpur's P.P.N. While studying in college, he met Bhagat Singh and was influenced by his ideas. He started working in the revolutionary organization 'Hindustan Socialist Republican Association'.
Batukeshwar Dutt is best known for the bombings he carried out with Bhagat Singh in the British Central Assembly (today's Parliament). The then British government had two bills in Parliament, the Public Safety Bill and the Trade Disputes Bill, which sought to restrict the workers' hunger strike and give the police unnecessary powers against the revolutionaries. As a protest against this, Bhagat Singh and Batukeshwar Dutt hurled bombs from the auditorium of the Parliament on April 8, 1929 in such a way that no one would be harmed.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments