Ticker

6/recent/ticker-posts

१७ डिसेंबर शिवदिनविशेष !! 17 December ShivDinvishesh

१७ डिसेंबर शिवदिनविशेष !! 17 December ShivDinvishesh


१७ डिसेंबर इ.स. १६४५

छत्रपती शिवरायांनी दादाजी नरसप्रभुंना पत्र पाठविले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१७ डिसेंबर इ.स.१६७०

शिवराय दमण येथे पोहोचले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१७ डिसेंबर इ.स.१७४०

चिमाजी अप्पा ऊर्फ चिमणाजी अप्पा स्मृतिदिन
(इ.स. १७०७ - १७ डिसेंबर, इ.स. १७४०)
हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१७ डिसेंबर इ.स.१९२३

छत्रपती राजाराम महाराजांना मानपत्र
(जन्म ३१ जुलै १८९७ - मृत्यू २६ नोव्हेंबर १९४०)
बेळगाव येथे १७ डिसेंबर १९२३ ला कर्नाटक बहिष्कृत समाजातर्फे छत्रपती राजाराम महाराजांना मानपत्र देण्यात आले होते. त्यावेळी महाराज आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात, 'अस्पृश्य मानलेल्या जातीत ज्या अनेक जातींचा समावेश होतो, त्या सर्वांनी एकोप्याने व एकजुटीने राहिले पाहिजे. तुम्ही तुमच्यातील शूद्र भेद मनात आणून 'मी जातीने मोठा व तू लहान' अशा प्रकारच्या हलक्या विचारांना बिलकूल धारा देऊ नये. तुम्ही एकजुटीने राहून कार्य केल्यास तुमची सर्व प्रकारे उन्नती होण्यास मुळीच अवधी लागणार नाही, अशी मला खात्री वाटत आहे. तुम्ही आज जो माझा सन्मान केला त्याबद्दल आणखी एकवार आपले आभार मानून व मानवी समतेच्या तत्त्वावर तुमची लवकरच पूर्ण उन्नती होवो अशी त्या जगन्नियंत्याजवळ प्रार्थना करून मी आपली रजा घेतो.'
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

१७ डिसेंबर इ.स.१६८१

छत्रपती संभाजी महाराजांच्या दहशतीने बहादूरगडावरुन अहमदनगरच्या किल्ल्यात जास्तीचे गोळाबारुद मागवनारे पत्र मुघलांनी रवाना केले.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे

December 17 1645

Chhatrapati Shivaji sent a letter to Dadaji Narasaprabhu.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

December 17, 1670

Shivrai reached Daman.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

December 17, 1740

Chimaji Appa aka Chimanaji Appa Smritidin
(1707 - December 17, 1740)
He was the son of Peshwa Balaji Vishwanath Bhat and younger brother of Bajirao Peshwa. He carried out a successful campaign to liberate the west coast of Maharashtra from Portuguese domination. He fought for 2 years and conquered Vasai fort and established Maratha rule over Sashti islands.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

December 17, 1923

Honors to Chhatrapati Rajaram Maharaj
(Born July 31, 1897 - Died November 26, 1940)
Chhatrapati Rajaram Maharaj was honored by the Karnataka Excluded Society on December 17, 1923 at Belgaum. Expressing his feelings at that time, Maharaj says, 'All the castes which are considered untouchable should live in unity. You should not bring such Shudra differences in your mind and give light to such light thoughts as 'I am big by caste and you are small'. I am sure that if you work together, it will not take long for you to prosper in all respects. I take my leave, thanking you once again for the honor you have bestowed on me today, and praying to the Lord of the Universe that you may soon be fully prosperous on the principle of human equality. '
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳

December 17, 1681

In fear of Chhatrapati Sambhaji Maharaj, the Mughals sent a letter from Bahadurgarh to the fort of Ahmednagar asking for extra ammunition.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳
Jai Jagdamba Jai ​​Jijau
  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments