१६ जानेवारी शिव दिनविशेष !! 16 January ShivDinvishesh
![]() |
| १६ जानेवारी शिव दिनविशेष !! 16 January ShivDinvishesh |
१६ जानेवारी इ.स.१६८१
संभाजी महाराज छत्रपती झाले. शिवरायांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती “हंबीरराव मोहिते” यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली. शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक करण्यात आला.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩१६ जानेवारी इ.स.१६६०
अफजलखान वधानंतर पन्हाळगड , कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम उघडली .रुस्तुम झमान, फाझल खान शिवरायांवर चालून आले असता त्यांचा पराभव होऊन त्यांनी पुन्हा विजापूरची वाट धरली🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩१६ जानेवारी इ.स.१६६६
पहाटे ३ वाजता... शिवरायांचा पन्हाळगडावर पराभव. १००० मावळे ठार. शिवरायांचे विशाळगडाकडे पलायन. या घटनेने हिंदुपतपातशाहीतील समिकरणे बदलली. नेतोजी पालकर शिवरायांना वेळेवर कुमक करू शकले नाहीत, म्हणून नेतोजी पालकरांना शिवरायांनी बडतर्फ केले. कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबती दिली.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩१६ जानेवारी इ.स.१६८१
औरंगजेबावर चाल करून आलेला त्याचा पुत्र अकबरास औरंगजेबाने पुरते तोंडघशी पाडले त्यामुळे अकबरास जे राजपूत मदत करीत होते त्यांनी अकबराची पाठ सोडली व १६ जानेवारी रोजी सकाळी लढाईस तोंड उघडले त्यावेळी अकबराकडून थोडेच सैन्य रणांगणावर होते तथापि दुर्गादासने अकबरास अंतर दिले नाही. आपल्या पित्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी पळ काढला आणि दक्षिणेत शिवाजीपुत्र संभाजी प्रबळ आहे त्याच्याशी राजपुतांचे संगनमत करून औरंगजेबाचा डाव हाणून पडावा असा विचार करण्यात आला.🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
January 16, 1681
Sambhaji Maharaj became Chhatrapati. After the death of Shivaraya, the Commander-in-Chief of Swarajya "Hambirrao Mohite" arrested Annajipant and Moropant. Sambhaji Maharaj, the eldest son of Shivaraya, was crowned to be the second Chhatrapati of Swarajya.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 16, 1660
After the assassination of Afzal Khan, Adilshah, who had lost the Panhalgad and Kolhapur provinces, launched another campaign against the Marathas.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 16, 1666
3 am ... Shivaraya defeated at Panhalgad. 1000 Mavals killed. Shivaraya's escape to Vishalgad. This incident changed the equations in Hindutva. Netoji Palkar could not help Shivaraya in time, so Shivaraya sent Netoji Palkar to Bad. Kudtoji gave the title of 'Prataprao' to the Gujaratis.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
January 16, 1681
His son Akbar, who had marched on Aurangzeb, was killed by Aurangzeb, so the Rajputs who were helping him abandoned him and when the battle broke out on the morning of January 16, Akbar had a small army on the battlefield, but Durgadas did not give Akbar away. He fled to escape the clutches of his father, Aurangzeb.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje


0 Comments