१५ जानेवारी शिव दिनविशेष !! 15 January ShivDinvishesh
![]() |
१५ जानेवारी शिव दिनविशेष !! 15 January ShivDinvishesh |
१५ जानेवारी इ.स.१६५६
छत्रपती शिवरायांनी छापा घालुन "जावळी" काबीज केली, या लढाईत "हणुमंतराव मोरे" ठार झाला. तिथला उन्मत्त सुभेदार "चंद्रराव मोरे" जावळीतुन किल्ले रायगडावर फरार झाला. शिवाजी महाराजांना जावळीच्या विजयासोबत "चंद्रराव मोरे" च्या तुऱ्यातील एक अमुल्य रत्न मिळाले. याच रत्नाचं नाव होतं "वीर मुरारबाजी देशपांडे". पुढे पुरंदरच्या लढाईत हेच "वीर मुरारबाजी देशपांडे" स्वराज्यासाठी धारातीर्थी पडले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇१५ जानेवारी इ.स.१७६१
#पानिपतचे_तिसरे_युध्दरोजी मराठे सदशिवराव पेशवे "भाऊ" आणि अफगाण घुसखोर अहमद शहा अब्दाली यांच्यातझाले. या कालखंडात सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. या भीषण युद्धात मराठे पराभूत झाले, तसेच अब्दालीचीहि मोठी हानी झाली. या युद्धाबाबत अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे-"दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असमान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा,अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य". खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. या युद्धामुळे मराठ्यांचे लश्करी वर्चस्व संपुष्टात आले. ज्याचा फायदा इंग्रजाना भारतात सत्ता फोफवण्यास झाला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१५ जानेवारी इ.स.१९१९
कोल्हापूरचे"राजर्षि शाहू महाराज" यांनी आदेश काढुन स्प्रुश्य-अस्प्रुश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था करुन दीली.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेJanuary 15, 1656
Chhatrapati Shivaji raided and captured "Jawali", in which "Hanumantrao More" was killed. The frantic Subhedar "Chandrarao More" escaped from Jawali to Fort Raigad. Shivaji Maharaj got an invaluable gem in the trumpet of "Chandrarao More" with the victory of Jawali. The name of this gem was "Veer Murarbaji Deshpande". Later in the battle of Purandar, it was this "Veer Murarbaji Deshpande" who fought for Swarajya.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
# Panipat's_Third_War
January 15, 1761
On the day, the Maratha Sadashivrao Peshwa was "brother" and the Afghan infiltrator Ahmed Shah Abdali. There is no other example of such a fierce, fierce, deadly war taking place in a short span of one day from nine in the morning to five and a half in the evening, in which one and a half lakh people and eighty thousand animals were killed on both sides. In this war, every household in Maharashtra was flooded with kumkum. The Marathas were defeated in this fierce battle and Abdali also suffered heavy losses. Ahmed Abdali himself has written about this war- "The southerners (Marathas) had set up a strong camp at Panipat. On the day of the battle they attacked our army again and again with extreme force. They would have put their fingers in their mouths in amazement at the great deeds of the Marathas. It is impossible for such a longing for war like the Marathas, such fervor and such bravery to be seen or seen by others ". He was so terrified of the dreaded Maratha swords that even after his victory, he did not have the courage to invade India again. Due to this war, the military dominance of the Marathas came to an end. Which benefited the British to seize power in India.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
January 15, 1919
"Rajarshi Shahu Maharaj" of Kolhapur issued an order and arranged for the education of untouchable students in the same school.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments