Ticker

6/recent/ticker-posts

१० जानेवारी शिव दिनविशेष !! 10 January ShivDinvishesh

१० जानेवारी शिव दिनविशेष !! 10 January ShivDinvishesh

१० जानेवारी शिव दिनविशेष !! 10 January ShivDinvishesh
१० जानेवारी शिव दिनविशेष !! 10 January ShivDinvishesh


१० जानेवारी इ.स.१६६४

शिवाजी महाराज सूरतेहून राजगडाकडे निघाले. महाबत खान सुरतेच्या बचावासाठी येत असल्याने ४ दिवस सूरत लुटल्यानंतर जमा झालेली अर्धी लुट जमीन मार्गाने राजगडाकडे चालवली तर बाकीची अर्धी सागरी मार्गाने कोकणात. ह्या लुटीमधून उभे राहणार होते दुर्गम असे जलदुर्ग आणि अनेक इतर किल्ल्यांची दुरुस्ती होणार होती.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७२४

बाजीराव-पोर्तुगिज यांच्यात तह झाला.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७३०

शनिवारवाड्याचे बांधकाम १७३०ला सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तूशांत करण्यात आली.शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत, पेशव्यांचा दरबारच येथे होता. पेशव्यांच्या घरातील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७३४

बाजीरावाविरुद्ध लढताना सिद्दी अंबर अफबानीचा रायगडाखाली पराभव होऊन मृत्यू.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७३९

इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.केळवे पाणकोटा प्रमाणे हा किल्ला सुध्दा इतिहासकालात समुद्रात होता. पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भूईकोटाचे स्वरुप प्राप्त झालेले आहे. काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्ण वाळूखाली गाढला गेला होता. ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत २००८-०९ साली या किल्ल्याभोवतीची वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७६१

बचेंगे तो और भी लढेंगे - दत्ताजी शिंदेंना वीरमरणसंक्रातीचा सण असून मराठी फौज सकाळी स्नान करून, तिळगुळ खाऊन तयारीने बसली होती. सकाळी नजरेच्या टप्प्यात यायच्या आत गिलचे चारही घाटांवर ८ मैलांवर आले आणि त्यांनी तोफांच्या सहाय्याने मराठ्यांवर हल्ला चढवला. पाठोपाठ बंदुकधारी रोहील्यांचे पायदळ नदीपार करण्यास पुढे येऊ लागले. बुराडी घाटावर जानराव वाबळे याची नेमणूक केलेली होती. मराठी सैनाची मुख्य शस्त्रे म्हणजे तलवारी, भाले असून फार कमी शिपाई बंदुका वापरीत. त्याउलट रोहिले - अफगाण बंदुकधारी असून जोडीला त्यांनी तोफखाना देखील आणला होता. मराठ्यांचा तोफखाना मुख्य तळावर राहिल्याने शत्रूच्या हल्ल्याला त्यांना समर्थपणे तोंड देता आले नाही. अफगाणी सेनेच्या तोफांनी बुराडी घाटावर जानरावचे शंभर - दीडशे शिपाई मारले गेले.दत्ताजी बुराडी घाटावर आला. दत्ताजी आल्याने सैन्याला धीर मिळाला व ते शत्रूचा नेटाने मुकाबला करू लागले.आपली तलवार गाजवू लागला परंतु दुदैवाने रोहील्यांच्या गोळीबारात मराठ्यांचा हा रणशूर सेनानी घोड्यावरून खाली आला.दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला," क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उदगारले,"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगे ऽऽऽऽ!"कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्‍यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले। खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्‍या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्‍यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.त्या दिवशी महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळूनपोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता !🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

१० जानेवारी इ.स.१७७५

दुसर्‍या बाजीरावाचा जन्म, बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला. इतर पेशव्‍यांना जसे लष्‍करी पद्धतीचे शिक्षण मिळाले होते व त्‍यांचे व्‍यक्तिमत्त्व जसे बहुआयामी घडले होते तसे व्‍यक्तिमत्त्व दुसरा बाजीराव यांस मिळाले नाही कारण त्‍याचे शिक्षण मुख्‍यतः फक्‍त भिक्षुकी शिक्षण झाले.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩जय जगदंब जय जिजाऊ  जय शिवराय जय शंभूराजे

January 10, 1664

Shivaji Maharaj left Surat for Rajgad. Since Mahabat Khan was coming to the rescue of Surat, after looting Surat for 4 days, half of the loot was taken to Rajgad by land and the other half by sea to Konkan. The fort was to be repaired and many other forts were to be repaired.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 10, 1724

A treaty was signed between Bajirao and the Portuguese.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 10, 1730

Construction of Shaniwarwada started in 1730, while Shaniwarwada was completed on 22nd January 1732.There are many incidents and accidents related to Saturday. Many heroes and diplomats came to the Peshwa's office in the palace. Politics flourished here, the Peshwa's court was here. The marriages of the children of the Peshwa family took place in this palace. Troops gathered for the expedition in front of Shaniwarwada.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 10, 1734

While fighting against Bajirao, Siddi Amber Afbani was defeated under Raigad and died.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 10, 1739

After the conquest of Mahim fort in Vasai campaign of 1739, on 10th January 1739, Kelve fort came under the control of Marathas.Like Kelve Pankota, this fort was also in the sea in history. But due to the retreat of the sea, the fort has acquired the appearance of a bhuikota. The fort was buried under complete sand a few years ago. The first floor of the fort has been cleared by removing the sand around the fort in 2008-09 under 'Fort Vasai Campaign'.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 10, 1761

If you survive, you will fight even more - Dattaji Shinde's heroic deathIt is the festival of Sankrati and the Marathi army had bathed in the morning, eaten sesame seeds and sat ready. Before reaching the stage of sighting in the morning, Gill reached 8 miles on all four ghats and attacked the Marathas with the help of guns. The Rohilya infantry followed with guns. Janrao Wable was posted at Buradi Ghat. The main weapons of the Marathi army are swords and spears and very few soldiers use guns. Rohile, on the other hand, is an Afghan gunman who also brought artillery to the couple. As the artillery of the Marathas remained at the main base, they could not withstand the onslaught of the enemy. One hundred and fifty Janrao soldiers were killed at Buradi Ghat by Afghan army artillery.Dattaji came to Buradi Ghat. With the arrival of Dattaji, the army got courage and started fighting the enemy with their nets. Qutbshah sneered and said,"Why Patel, and fight?"Dattaji gathered his cold and fading voice and exclaimed,"Why not? If you survive, you will fight even more ऽऽऽऽ!"Qutb Shah and Najib got angry and sat on Dattaji's lap. An Khanjira slit Dattaji's neck. Najeeb went to Abdali dancing Dattaji's gigantic head with the tip of his spear.On that day, a fierce chase of Marathas was going on all day long. People like chickens and goats were being picked up and killed. The banks of the Yamuna were draining with blood.In the frightening darkness of the night, the Marathas pulled out Dattaji's hidden body. We collected the wood of the cracked gun. The shelter was built in the sand of Yamuna. As there was no shroud in the forest, the companions left Nesuchi's dhotre. Ranveera's naked body was covered. The leaves and leaves in the bag were placed on the bed. Dattaji's broken part of the neck, the esophagus, the mouth was water. The corpses drank water in the noisy winds of the frightening night and the roar of the river Yamuna. The fire started in the open.On that day in Maharashtra, on the day of Sankranti, sesame seeds were being distributed. The people of Sanasudi were exhausted after eating a lot. Then the Shindyas of Kanherkhed playing in the soil of KrishnakathThe nourished body was burning endlessly in the sand of Yamuna!🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

January 10, 1775

The birth of the second Bajirao,Bajirao was the son of Raghunathrao and Anandibai. Anandibai was detained at Dhar Fort in Malwa region on charges of murdering Narayanrao Peshwa. It was here that he gave birth to Bajirao on January 10, 1775. Bajirao grew up in captivity from birth to the age of 19. Bajirao II did not get the personality of other Peshwas as he had received military education and his personality was as multi-faceted as his education was mainly monastic education.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩Jai Jagdamba Jai ​​Jijau  Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments