Ticker

6/recent/ticker-posts

५ मार्च शिवदिनविशेष !! 5 March ShivDinvishesh

५ मार्च शिवदिनविशेष !! 5 March ShivDinvishesh

5 मार्च शिवदिनविशेष

५ मार्च इ.स.१६५९

दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार खेमसावंता नी महाराजांना नजर केली.या तलवारीची खासियत छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती. तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते... अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती. याशिवाय तलवारीची धार अफलातून होती. तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची.महाराजांना गनिमांना संपवायचे होते येथे रयतेचे राज्य उभारायचे होते त्यासाठी महाराजांना अशी वजनाने हलकी, धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती. त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली. (३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये)छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार, तिची नोंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते (इन्कम अॅन्ड एक्स्पेंडीचर अकौंट) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबद गोंधळ माजू नये, यासाठी प्रबंध करून ठेवला आहे...🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च इ.स.१६५९

कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा -ता. ५ मार्च १६५९श्रीसन १०६८ फसलीतहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफप्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च इ.स.१६६६

औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर. आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजांसह !!!🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

५ मार्च इ.स.१८७९

१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇जय जगदंब जय जिजाऊजय शिवराय जय शंभूराजे


March 5, 1659

On March 5, 1659, Maharaj Wadiche came to Kudal with Sawant's companion, where Khemsavanta saw this sword made in Portugal.
Chhatrapati Shivaji Maharaj knew the specialty of this sword accurately. The sword was light in weight but very heavy in price. It was made of a special metal that does not rust. Although its leaves are thin, it was made of a special steel that does not break ... This modern sword was even more valuable because it was made of diamond fist and gold metal. Besides, the edge of the sword was sharp. Such a haircut that you will lose your life in the moment you come in front of the sword.
The maharaja wanted to put an end to the looting and establish a ryota kingdom here. For this maharaja, he needed a sword that could carry such a light weight, sharp edge and unbreakable swords. At that time, the Maharaja bought the sword in cash for Rs. (300 hon = one thousand and fifty rupees at that time)
A good example of how Chhatrapati Shivaji Maharaj was very accurate in his accounting during the administration of Swarajya is the sword which Maharaj bought at the rate of 300 hons. Arrangements have been made for Maju not to ...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

March 5, 1659

While Chhatrapati Shivaji Maharaj's horse race was going on in Konkan, Adilshah sent a chief named Rustumajma to quell the revolt of Desai Lakham Sawant of Kudal. Lakham Sawant tried to defend himself by resisting Nikra but Rustumajma made the situation of Lakham Sawant worse by blockading everywhere. In order to face this crisis, Maharaj made a pact with the Maharaja on this day and took the mandal of the Maharajah.
Tahnama between Chhatrapati Shivaji Maharaj and Kudalkar Sawant -
Ta. March 5, 1659
Mr.
The year 1068 fell
Tahanama Rajshri Khem Sawant and Lakham Sawant Desai Bahadur Pitambar Shenwai Karbal from Kudal Yanj came and passed the resolution.
Provinces are running text palaces and so on. It should be replaced by half a Huzur every year, three thousand people should be kept in it, and when the Huzur is called, it should be served with three thousand people. Khansa must be coming when there is a need to come by caste. Section 1
Fort Fonde province should be kept in Hujar by taking the taluka and it should be supported on every occasion. Bidnur etc. will be invaded to get the ransom of the Sansthan. Section 1
Swarajya Sadhana should be done in the presence of a lawyer and should be done by the Turks. Section 1
Huzur Amal should be informed about the appointment of clerks and people who will stay in the provinces. Section 1
Your country and the brave book Azra [Marha] will work. The forts, forts and fortresses have been handed over to you. There should be saved by gloves. The clerk of the lord and the people should come there. Section 1
Shake 1580 Vilambinam Sanvatsare Falgun Vadya 7. "Mortab."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

March 5, 1666

Chhatrapati Shivaji Maharaj's departure from Rajgad to Agra for Aurangzeb's visit. He was accompanied by 9 year old Shambhu Raje, Sarjerao Jedhe, Heroji Farjad, Nirajipant, Madari Mehtar. What will be the mood of Ausaheb today? Just imagine! Shivaji Maharaj was going to enter the brink of death today, with 9 year old Yuvraj !!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

March 5, 1879

After 1879, Phadke's work began. He carried out the first robbery at Dhamri village near Loni with the help of Daulatrao Naik. In this he got only three thousand rupees. Then in February 1879, Loni and Khed were robbed and looted. On March 5, 1879, a robbery took place at Walhe village near Jejuri. He was robbed of four guns, three hundred rupees and one hundred rupees. 'S clothes. After this, they started preparing for an armed uprising against the government. Initially, he sought help from well-educated and wealthy Indians in Pune, Mumbai and other cities, but received no response.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
Jai Jagdamba Jai ​​Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje

Post a Comment

0 Comments