४ फेब्रुवारी शिवदिनविशेष !! 4 February ShivDinvishesh
४ फेब्रुवारी इ.स.१६६०
कोकणातील "दाभोळ" बंदर छत्रपती शिवरायांच्या ताब्यात आले.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇४ फेब्रुवारी इ.स.१६७०
"गड आला पण सिंह गेला"नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे लढता लढता धारातीर्थी पडले ते किल्ले कोंढाण्यावर भगवा फडकवूनच. ४ फेब्रुवारीला संध्याकाळी तानाजीने सर्व मावळ्यांसह राजगड सोडला व सर्वजण खिंडीत येऊन पोचले. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरीच्या कड्याजवळ आले, २ मावळ्यांना तो कडा त्याच्या खाचाखोचासहीत माहीत होता.त्यातील "यशवंत घोरपडे" हे वीर कमरेला दोर बांधून कडा चढून वर गेले. ("यंशवंती" नावाची घोरपड नव्हती) त्यांच्या मागून वर येताना 6 मावळे खाली पडून मरण पावले.पण तेवढ्यात किल्लेदार "उदयभान राठोड" ला खबर मिळाली की कोणीतरी दोर चढून वर येत आहे. तेवढ्यात "हर हर महादेव" चा एल्गार झाला व मराठे गनिमांवर तुटून पडले. उदयभान व तानाजी यांच्यात जोरदार युद्ध झाले, त्यात वार झेलत असताना तानाजींची ढाल तुटली व मर्मस्थानी लार बसून तानाजी धारातीर्थी पडले. तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चलबीचल झाली पण त्याच वेळी सुर्याजींनी मावळ्यांना धीर दिला मग त्वेषाने मराठे तुटून पडले व "शेलार मामा" नी उदयभान राठोड ला संपवला. मराठ्यांची फत्ते झाली, गड ताब्यात आला पण तानाजीसारखा सिंह मात्र गेला.🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजेFebruary 4, 1660
The port of "Dabhol" in Konkan came under the control of Chhatrapati Shivaji.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
February 4, 1670
"The fort came but the lion went"
Narveer Subhedar Tanaji Malusare, while fighting, fell to the ground, throwing saffron on the fort. On the evening of February 4, Tanaji left Rajgad with all the Mavals and all of them reached the gorge. After midnight, all of them came near Donagiri's ridge, 2 Mavals knew that ridge with its notch. The hero "Yashwant Ghorpade" tied a rope around his waist and went up the ridge. (There was no scorpion named "Yashwanti") 6 Mavals fell down and died while coming up behind them. But at that moment the fort keeper "Udaybhan Rathod" got the news that someone was coming up the rope. At that time, "Har Har Mahadev" became an elgar and the Marathas fell on the ganim. There was a fierce battle between Udayabhan and Tanaji, during which Tanaji's shield was broken and Tanaji fell to the ground. After the fall of Tanaji, the Marathi army became restless, but at the same time, Suryaji reassured the Mavals, then the Marathas fell apart with hatred and "Shelar Mama" killed Udaybhan Rathore. The Marathas were defeated, the fort was captured but a lion like Tanaji was gone.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
Jai Jagdamba Jai Jijau
Jai Shivrai Jai Shambhuraje
0 Comments